Face Exercises esakal
लाइफस्टाइल

Face Exercises : डबल चिन कमी करायचीयं? ‘हे’ सोपे व्यायाम ठरतील फायदेशीर

चेहऱ्यावर जमा होणारे फॅट्स आणि डबल चिनचे प्रमाण वाढले आहे.

Monika Lonkar –Kumbhar

आपला चेहरा सुंदर आणि आकर्षक दिसावा हे प्रत्येकालाच वाटते. चेहऱ्यावर पिंपल्स, पुरळ आल्यावर आपण लगेच त्यावर उपाय करतो. फेस पॅक किंवा इतर स्किनकेअर प्रॉडक्टची आपण मदत घेतो.

मात्र, चेहऱ्यावर फॅट्स आणि डबल चिन वाढली की यावर काय उपाय करता येईल ? असा प्रश्न अनेकांना पडतो. मागील काही वर्षांमध्ये चेहऱ्यावर फॅट्सचे प्रमाण वाढले आहे. महिलांसोबत पुरुषांमध्ये ही समस्या दिसून येत आहे.

चेहऱ्यावरील हे फॅट्स आणि वाढलेली डबल चिन कमी करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही व्यायाम प्रकार सांगणार आहोत. हे व्यायाम प्रकार केल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील डबल चिन आणि फॅट्स कमी होण्यास नक्कीच मदत मिळू शकेल.

फिश पोझ

या व्यायाम प्रकारचे नाव फिश पोझ असे आहे. फिश पोझ एक्सरसाईज हा एक उत्तम फेस एक्सरसाईज आहे. हा व्यायाम केल्यामुळे आपल्या गालांची हाडे हायलाईट करण्यास मदत होते.

या व्यायाम प्रकारामुळे गालांवर जमा झालेली चरबी कमी होण्यास मदत मिळेल. दुसरे म्हणजे या व्यायामामुळे गालांची चरबी कमी होऊन चेहऱ्याला छान आकार मिळू शकेल.

अशा पद्धतीने करा हा फिश पोझ एक्सरसाईज

  • सर्वात आधी तुमच्या चेहऱ्यावरील मसल्स रिलॅक्स होऊ द्या.

  • त्यानंतर आता तुमचे दोन्ही गाल माशाच्या तोंडाप्रमाणे आत घ्या.

  • तुम्हाला जितके शक्य असेल तितके गाल आत घेण्याचा प्रयत्न करा.

  • आता तुमच्या चेहऱ्याचा आकार फिश पोझसारखा दिसेल.

  • आता या स्थितीमध्ये ३ सेकंदांपर्यंत राहण्याचा प्रयत्न करा.

  • हा व्यायाम प्रकार तुम्ही दिवसातून ३ वेळा करण्याचा प्रयत्न करा.

सिंह मुद्रा

आजकाल चेहऱ्यावर डबल चिन येण्याची समस्या वाढली आहे. डबल चिन म्हणजे गालावर जास्तीचे फॅट्स जमा झाल्यामुळे गालांजवळ पडलेली घडी होयं. पुरूष आणि स्त्रियांमध्ये डबल चिनची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. हा व्यायाम प्रकार केल्यामुळे चेहऱ्यावरील डबल चिन कमी होण्यास मदत मिळते. चेहऱ्याला छान आकार मिळण्यास मदत होते.

अशा पद्धतीने करा सिंह मुद्रा

  • या व्यायाम प्रकारामध्ये सिंहाच्या जबड्याप्रमाणे तुमच्या चेहऱ्याची स्थिती ठेवायची असते.

  • यासाठी सर्वात आधी तुमची जीभ बाहेर काढा.

  • त्यानंतर, तुमचा जबडा जितका तुम्हाला मोठा करता येईल तितका करण्याचा प्रयत्न करा.

  • आता, तुमच्या चेहऱ्याचा आकार सिंहाच्या जबड्याप्रमाणे झाल्यासारखा दिसेल.

  • आता, या स्थितीमध्ये तुम्हाला तुमची नजर स्थिर ठेवावी लागेल.

  • या पोझमध्ये ३०-४० सेकंद थांबण्याचा प्रयत्न करा.

  • हा व्यायाम प्रकार केल्यामुळे डबल चिन कमी होते. तसेच, चेहऱ्याच्या मसल्सना चांगल्या प्रकारे ताण बसतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video Viral : अद्भूत! सौदी अरेबियात ११५० फूट उंचीवर उभारलं जातंय "sky stadium”, २०३४ च्या Fifa World Cup ची तयारी

Kolhapur Politics : असला सरपंच आम्हाला नको!, कोल्हापुरातील 'या' गावाने थेट संरपंचांविरोधात अविश्वास ठरावासाठी केलं मतदान

लेकीला उपचारासाठी घेऊन आलेल्या बापाला महिला डॉक्टरनं मारली कानाखाली; सरकारी दवाखान्यातला VIDEO VIRAL

World Cup 2025: प्रतिका रावलला नेमकं काय झालं, तिच्या जागेवर कोण खेळणार? BCCI ने अखेर दिले महत्त्वाचे अपडेट्स

Latest Marathi News Live Update : हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेसचा पक्ष प्रवेश सोहळा

SCROLL FOR NEXT