Foods For High BP  esakal
लाइफस्टाइल

Foods For High BP : उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर आहेत 'हे' खाद्यपदार्थ, हृदय ही राहील निरोगी

Foods For High BP : सध्याचे धावपळीचे जीवन, बिघडलेला आहार, व्यायामाचा अभाव आणि चुकीच्या सवयींमुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत.

Monika Lonkar –Kumbhar

Foods For High BP : सध्याचे धावपळीचे जीवन, बिघडलेला आहार, व्यायामाचा अभाव आणि चुकीच्या सवयींमुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत. या समस्यांमध्ये उच्च रक्तदाबाची समस्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. उच्च रक्तदाब ही त्यापैकीच एक गंभीर समस्या आहे. ज्यामुळे, आजकाल अनेक लोक त्रस्त आहेत.

उच्च रक्तदाब आजकाल तरूणांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांमध्ये आढळतोय. ही समस्या सायलेंट किलर म्हणून ही ओळखली जाते, जी आरोग्यासाठी प्राणघातक ठरू शकते. उच्च रक्तदाबामुळे तुम्हाला भविष्यात हृदयविकार होण्याची शक्यता असते.

उच्च रक्तदाबाच्या समस्येमध्ये एखाद्या व्यक्तीची रक्तदाबाची पातळी सामान्यापेक्षा जास्त होते आणि त्यामुळे, रक्तवाहिन्यांवर दबाव येऊ लागतो. ज्यामुळे, हृदयविकारासारख्या समस्या उद्भवण्याची शक्यता असते.

अशा परिस्थितीमध्ये तुम्ही उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी योग्य आहार घेणे गरजेचे आहे. त्यासाठी तुम्ही आहारात काही खाद्यपदार्थांचा समावेश करू शकता. या खाद्यपदार्थांमुळे तुमचा रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होऊ शकेल. कोणते आहेत हे खाद्यपदार्थ? चला तर मग जाणून घेऊयात.

हिरव्या पालेभाज्या

हिरव्या पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात पोषकघटकांचा समावेश आढळून येतो. त्यामुळे, या भाज्या आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. खनिजे आणि जीवनसत्वांच्या विपुल प्रमाणामुळे शरीराला ऊर्जा मिळते. हिरव्या पालेभाज्यांचे सेवन केल्याने आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात.

या हिरव्या पालेभाज्यांपैकी एक असलेल्या पालक आणि मेथीमध्ये मॅग्नेशिअम आणि पोटॅशिअमचे मुबलक प्रमाण आढळते. त्यामुळे, या भाज्यांचे सेवन केल्याने उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत होते. (Green Vegetables)

टोमॅटो

टोमॅटोचा वापर करून आपण कितीतरी प्रकारचे खाद्यपदार्थ बनवतो. अनेक भाज्यांमध्ये, करीमध्ये, सॉसेसमध्ये टोमॅटोचा प्रामुख्याने वापर केला जातो. टोमॅटोमध्ये मुबलक प्रमाणात पोषकघटकांचा समावेश आढळून येतो.

टोमॅटो आणि टोमॅटो आधारित खाद्यपदार्थांमध्ये पोटॅशिअम, कॅरोटीनॉईड आणि लाईकोपीनचे प्रमाण आढळते. जे आपले हृदय निरोगी ठेवण्यास फायदेशीर आहे. यामुळे उच्च रक्तदाबासारख्या आणि हृदयाला हानिकारक ठरणाऱ्या घटकांचा धोका ही कमी होतो. त्यामुळे, तुमच्या आहारात टोमॅटोचा आणि टोमॅटोवर आधारित असणाऱ्या खाद्यपदार्थांचा जरूर समावेश करा. (Tomato)

सॅलमन

मासे खायला अनेकांना आवडते. सॅलमन हा मासा जगभरात मोठ्या प्रमाणात आढळून येतो. हा मासा चवीने खाल्ला जातो. सॅलमनमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड आढळून येते. ज्यामुळे, आपल्या हृदयाचे आरोग्य निरोगी राहते. शिवाय, सॅलमनचे सेवन केल्याने रक्तदाब नियंत्रणात येण्यास मदत होऊ शकते. (salmon Fish)

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT