Health Care esakal
लाइफस्टाइल

Health Care : फ्रीजमध्ये चुकूनही ठेऊ नका ‘ही’ फळे अन्यथा आरोग्याचे होईल नुकसान

सर्व प्रकारची फळे फ्रीजमध्ये न ठेवता निवडक फळे फ्रीजमध्ये ठेवू शकता.

Monika Lonkar –Kumbhar

Health Care : फ्रीजमध्ये आपण अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ ठेवतो. या खाद्यपदार्थांसोबत अनेक प्रकारच्या खायच्या गोष्टी, पेये आणि फळे देखील आपण फ्रीजमध्ये ठेवतो. मात्र, फ्रीजमध्ये सर्वच प्रकारची फळे ठेवणे हे चुकीचे आणि आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

फ्रीजमध्ये फळे ठेवल्याने ही फळे फ्रेश आणि ताजी राहतात, असा काहींचा गैरसमज असतो. मात्र, काही फळे फ्रीजमध्ये ठेवल्याने ती खराब आणि त्यावर प्रक्रिया होऊन ती विषारी होण्याचा धोका असतो. त्यामुळे, सर्व प्रकारची फळे फ्रीजमध्ये न ठेवता तुम्ही निवडक फळे फ्रीजमध्ये ठेवू शकता.

पल्प असणारी फळे शक्यतो फ्रीजमध्ये ठेवणे टाळावे. या प्रकारची फळे फ्रीजमध्ये ठेवल्याने आपल्या आरोग्याला फायदे होण्याऐवजी नुकसानच जास्त होते. त्यामुळे, कोणती फळे फ्रीजमध्ये ठेवू नये? त्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.

संत्रा

संत्र्यामध्ये व्हिटॅमीन सी चे प्रमाण भरपूर आढळून येते. संत्र्यामध्ये अ‍ॅसिडचे प्रमाण आढळून येते. त्यामुळे, संत्रा फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यातील पोषकघटक संपुष्टात येण्याचा धोका असतो.

शिवाय, त्यातील अ‍ॅसिडमुळे संत्रा हे फळ खराब आणि विषारी होऊ शकते. फ्रीजमध्ये बराच काळ ठेवल्याने संत्र्याची चव देखील बदलते. त्यामुळे, संत्र्याचे फळ फ्रीजमध्ये कधीच ठेवू नका.

सफरचंद

सफरचंदामध्ये आढळून येणाऱ्या पोषकघटकांमुळे आणि सक्रिय Enzymes मुळे सफरचंद फ्रीजमध्ये ठेवल्यावर लवकर पिकते. परिणामी हे फळ लवकर पिकल्यामुळे ते खराब होण्याचा धोका असतो.

सफरचंदाला फ्रीजमधील थंड हवा सहन होत नाही. जर तुम्हाला ४-५ दिवसांसाठी सफरचंद फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचे, असल्यास तुम्ही कागदामध्ये रॅप करून किंवा गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवू शकता.

केळी

केळी फ्रीजमध्ये कधीच ठेवू नये. केळी फ्रीजमध्ये ठेवल्यास ती काळी पडण्याचा धोका असतो, आणि त्यावर रासायनिक प्रक्रिया होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

केळी फ्रीजमध्ये ठेवल्याने केळ्यातील देठातून इथिलीन गॅस बाहेर पडतो. हा गॅस बाहेर पडल्यामुळे, फ्रीजमधील इतर फळे देखील लवकर पिकतात. त्यामुळे, केळी कधीच फ्रीजमध्ये ठेवू नयेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Bus Rules: मनमानीला पूर्णविराम! शाळा बस भाडे प्रादेशिक परिवहन प्राधिकरण ठरवणार; महाराष्ट्रात नवीन नियमांमुळे चित्र बदलणार

CSK vs DC Controversy: फुल्ल राडा! नितीश राणासह दिल्लीचे कोच अम्पायरला भिडले; सीमारेषेवर भांडण, नेमकं काय घडलं? Video

Mumbai News: मुंबईतील सर्वात मोठ्या डेपोचा ‘टर्निंग पॉइंट’! ‘क्लीन-अप’चा मार्ग मोकळा; स्वच्छतेमुळे बदलणार परिसराचं चित्र

CSK vs DC Live: संजू सॅमसनचे शतक, सर्फराज खानचा अविश्वसनीय झेल अन्...; चेन्नईचा पहिला विजय, IPL 2026 Point Table मध्ये बदल

Vande Bharat Express : पुणे-बंगळूरसाठी आता वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस; १३ तासांत पोहोचणार

SCROLL FOR NEXT