Gardening Tips esakal
लाइफस्टाइल

Gardening Tips : पहिल्यांदाच होम गार्डनिंग करताय? मग ‘या’ टिप्सच्या मदतीने ठेवा तुमचा बगीचा हिरवागार

आपली गॅलरी किंवा बगिचा हा हिरवाईने नटलेला असावा, यासाठी अनेक जण प्रयत्न करतात.

Monika Lonkar –Kumbhar

Gardening Tips : आपल्या घराजवळ छोटीशी बाग असावी आणि ती नेहमी हिरवाईने नटलेली असावी असे प्रत्येकाला वाटते. गावाकडे परसबाग फुलवली जाते किंवा मोठ्या आंब्याच्या झाडांची बाग फुलवली जाते.

आजकाल शहरात बागेसाठी किंवा बगीच्यासाठी (garden) जागा अपुरी पडत असल्यामुळे फक्त शो ची किंवा फुलांची झाडे(Flower trees) लावली जातात. मात्र, अनेक ठिकाणी पुरेशी जागा असेल तर भरपूर प्रकारची झाडे लावली जातात. यामध्ये फुलांच्या झाडांसोबत हिरव्या पालेभाज्यांची ही झाडे लावली जातात.

थोडक्यात काय तर आपली गॅलरी किंवा बगीचा हा हिरवाईने नटलेला असावा, यासाठी अनेक जण प्रयत्न करतात. त्यासाठी काही खास टिप्स आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर तुमचा बगीचा हा नेहमी हिरवागार राहील यात काही शंका नाही.

जागा योग्य निवडा

तुम्हाला जर तुमचा बगीचा हिरवागार(Green Garden) ठेवायचा असेल, तर त्यासाठी आधी तुम्ही योग्य जागेची निवड करा. जिथे झाडांची योग्य प्रकारे वाढ होईल. जर तुमच्याकडे पुरेशी जागा उपलब्ध नसेल तर तुम्ही तुमच्या घराच्या गॅलरीमध्ये देखील तुमचा बगीचा फुलवू शकता. त्यासाठी, झाडांच्या मातीच्या किंवा प्लॅस्टिकच्या कुंड्या घेऊन या.

योग्य मातीची निवड करा

झाडांची योग्य आणि चांगली वाढ व्हावी, असे जर तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी तुम्ही झाडांसाठी चांगली माती देखील वापरणे आवश्यक आहे. माती जर उत्तम दर्जाची असेल तर त्यामध्ये झाडांची ही वाढ चांगली होईल, यात काही शंका नाही. (Choose the right soil)

झाडांना वेळेवर पाणी द्या

झाडांची चांगली वाढ व्हावी, असे जर तुम्हाला वाटत असेल तर त्यांना वेळच्या वेळी पाणी देणे गरजेचे आहे. पाण्यामुळे झाडांची वाढ चांगल्या प्रकारे होते. त्यामुळे, झाडांना पाणी द्यायला अजिबात विसरू नका. (Water the plants on time)

मातीच्या कुंड्यांची निवड कधी करावी ?

जर तुम्ही तुमच्या बगीच्यामध्ये किंवा गॅलरीमध्ये हिरव्या पालेभाज्या किंवा फळांची लागवड करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी मातीच्या कुंड्या बेस्ट आहेत. कारण, या प्रकारच्या कुंड्यांमध्ये हिरव्या पालेभाज्यांची आणि फळांची चांगल्या प्रकारे वाढ होते. त्यामुळे, अशा परिस्थितीमध्ये मातीच्या कुंड्यांची निवड नक्की करा. (choose clay pots)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आमदार कल्याणशेट्टींना मिळणार वाढीव पोलिस बंदोबस्त! जीवे मारण्याच्या धमकीनंतर पोलिस अधीक्षक कार्यालयाने मागविला अक्कलकोट उत्तर पोलिसांकडून अहवाल, वाचा...

माझी भूमिका : ‘वैयक्तिक आयुष्यातही सकारात्मक बदल’

१३ ऑगस्ट २०२६ पंचांग! श्रावणमासाला आजपासून सुरुवात; जाणून घ्या शुभ-अशुभ वेळा

आजचे राशिभविष्य - 13 ऑगस्ट 2026

Green Moong Dal Ladoo: साखर-गूळ नाही तरी चव भन्नाट! असे बनवा हिरव्या मूगडाळीचे प्रोटीनयुक्त लाडू

SCROLL FOR NEXT