लाइफस्टाइल

Jaggery Benefits : हिवाळ्यात यावेळी गुळ खाल्ल्यास होतील ‘हे’ आश्चर्यकारक फायदे, जाणून घ्या

हिवाळ्यात गुळ खाणे खूप फायदेशीर, 'या' आजारांपासून मिळेल सुटका

Aishwarya Musale

ऋतूनुसार आहारात बदल करणे अत्यंत आवश्यक आहे. हिवाळ्यात गूळ खूप फायदेशीर आहे. त्यात कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोहासह अनेक पोषक घटक आढळतात. याशिवाय गुळात अँटीऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात. थंडीत रिकाम्या पोटी गूळ खाल्ल्याने अनेक फायदे होतात.

रक्तदाब

रक्तदाबाच्या रुग्णांसाठी गुळाचे सेवन खूप फायदेशीर आहे. हे पोटॅशियमचा चांगला स्रोत मानला जातो. रोज रिकाम्या पोटी गूळ खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो.

अशक्तपणा

गुळामध्ये लोह आणि फोलेट मुबलक प्रमाणात आढळतात. ज्या लोकांच्या शरीरात अशक्तपणा आहे त्यांनी रिकाम्या पोटी गुळाचे सेवन करावे. याच्या सेवनाने शरीरातील लोहाची कमतरता देखील दूर होते.

हाडांसाठी

गुळामध्ये कॅल्शियम आणि लोह आढळते जे हाडांसाठी खूप उपयुक्त आहे. हाडांशी संबंधित कोणत्याही आजाराने त्रस्त असलेल्यांनी गुळाचे सेवन करावे. यामुळे हाडे मजबूत होतात आणि सांधेदुखीपासूनही आराम मिळतो.

आळस निघून जातो

गुळामध्ये कार्बोहायड्रेट्स मुबलक प्रमाणात असतात जे शरीरातील आळस आणि थकवा दूर करतात आणि त्वरित ऊर्जा प्रदान करतात. दररोज रिकाम्या पोटी गूळ खाल्ल्याने दिवसभर ऊर्जा टिकून राहते आणि ऊर्जावान वाटते.

पोटाशी संबंधित रोग

गुळामध्ये फ्रक्टोज नावाची नैसर्गिक साखर असते जी पोटासाठी खूप चांगली असते. यामुळे पोटातील एंजाइम सक्रिय होतात. रोज गूळ खाल्ल्याने पोटाशी संबंधित आजार जसे अपचन, बद्धकोष्ठता, पोटदुखी दूर राहते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT