High Cholesterol esakal
लाइफस्टाइल

High Cholesterol : वाढत्या कॉलेस्ट्रॉलमुळे त्रस्त आहात? मग, आहारात ‘या’ पदार्थांचा करा समावेश

सध्याचे धकाधकीचे जीवन, बिघडलेला आहार आणि व्यायामाचा अभाव इत्यादी कारणांमुळे आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. या समस्यांमध्ये कॉलेस्ट्रॉलचा ही समावेश आहे.

Monika Lonkar –Kumbhar

High Cholesterol : सध्याचे धकाधकीचे जीवन, बिघडलेला आहार आणि व्यायामाचा अभाव इत्यादी कारणांमुळे आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. या समस्यांमध्ये कॉलेस्ट्रॉलचा ही समावेश आहे. बाहेरचे विविध प्रकारचे फास्टफूड्स आणि तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे शरीरातील कॉलेस्ट्रॉलची पातळी वाढते.

कॉलेस्ट्रॉलची पातळी वाढली की, हृदयविकाराचा धोका संभवतो. शरीरातील कॉलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यामुळे हृदयरोगासोबतच इतर ही आरोग्याच्या समस्या सुरू होतात.

अशा परिस्थितीमध्ये काही खाद्यपदार्थांचा आहारात समावेश केल्याने कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी व्हायला मदत होते. कोणते आहेत हे खाद्यपदार्थ? जे शरीरातील कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत. चला तर मग जाणून घेऊयात या खाद्यपदार्थांबद्दल

आवळा

आवळ्यामध्ये पोषकघटकांचे भरपूर प्रमाण आढळून येते. त्यामुळे, आवळ्याचे सेवन करणे हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. आरोग्यासोबतच आपल्या केसांसाठी आणि त्वचेसाठी आवळा फायदेशीर आहे. आवळ्यामध्ये ‘व्हिटॅमिन सी’ चे भरपूर प्रमाण आढळून येते. (Amla)

औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असलेल्या या आवळ्यामध्ये अमिनो अ‍ॅसिड आणि खनिजे मोठ्या प्रमाणात असतात. जर तुम्ही नियमितपणे आणि योग्य प्रमाणात आवळ्याचे सेवन केले तर शरीरातील कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. यासोबतच तुम्ही १-२ चमचे आवळ्याचा रस एक ग्लास कोमट पाण्यात मिसळून घेतल्यास कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते.

लसूण

आपल्या भारतीय स्वयंपाकघरात विविध प्रकारच्या मसाल्यांसोबत लसणाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. लसणामध्ये पोषकघटक, खनिजे, अमिनो अ‍ॅसिड आणि अ‍ॅलिसिन नावाचे संयुग भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे, लसणाचा आहारात समावेश करणे, हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. (Garlic)

शरीरातील खराब कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्याचे काम लसूण करते. जर तुम्ही रोज एक कच्चा लसणाची पाकळी किंवा अर्धा लसूण खाल्ला तर कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी होऊ शकते.

मेथीचे दाणे

थंडीच्या दिवसांमध्ये खास करून मेथीचे लाडू बनवले जातात. मेथीच्या दाण्यांमध्ये पोषकघटकांचे भरपूर प्रमाणा आढळून येते. यासोबतच मेथीचे लाडू खाल्ल्यामुळे शरीराला ऊब मिळते आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. (Fenugreek seeds)

मेथीच्या दाण्यांमध्ये फायबर्सचे भरपूर प्रमाण आढळून येते. या फायबर्समुळे शरीरातील कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. मेथीच्या दाण्यांचा आहारात समावेश करण्यासोबतच तुम्ही अर्धा ते १ चमचा मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्या. शरीरातील खराब कॉलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी हा उपाय फायदेशीर ठरतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs UAE Update: पाकिस्तानची लाचारी पुन्हा दिसली... पैशांसाठी आत्मसन्मान ठेवला गहाण; Jay Shah यांनी कान टोचताच खेळायला तयार

Municipal Corporation Election : महापालिका निवडणुकीसाठी लागणार २४ हजार कर्मचारी

Latest Marathi News Updates : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात भव्य ड्रोन शो

Kannad News : हैदराबाद गँझेटीयरनुसार बंजारा समाजाला आरक्षण द्या; मुख्यमंत्री फडणवीसांकडे निवेदन देऊन केली मागणी

Kunbi Certificates: ''भुजबळांना कुणबी प्रमाणपत्रांबद्दल आक्षेप असेल तर..'', फडणवीसांनी स्पष्टच शब्दात सांगितलं

SCROLL FOR NEXT