Oily and Greasy Hair Problems esakal
लाइफस्टाइल

Oily and Greasy Hair Problems : तेलकट आणि चिकट केसांपासून सुटका करायची आहे? मग, ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय

तेलकट आणि चिकट केसांमुळे हेअरस्टाईल करणे अवघड होऊन बसते.

Monika Lonkar –Kumbhar

Oily and Greasy Hair Problems : चमकदार आणि सिल्की केस असावेत, असे प्रत्येक महिलेला वाटते. त्यासाठी, आपण केसांवर अनेक उपाय करतो. मात्र, खास करून हिवाळ्यात अनेक महिलांचे केस हे चिकट आणि तेलकट होतात. त्यामुळे, अशा केसांची हेअरस्टाईल करणे देखील अवघड होऊन बसते.

मग, या तेलकट आणि चिकट केसांपासून सुटका करून घेण्यासाठी महिलांची धडपड सुरू होते. या केसांपासून सुटका करून घेण्यासाठी मग विविध प्रकारच्या महागड्या शॅंम्पू आणि कंडिशनर्सची मदत घेतली जाते. मात्र, आता तुम्हाल हे सर्व करण्याची गरज पडणार नाही.

तुम्ही यावर काही घरगुती उपाय करू शकता. कोणते आहेत ते घरगुती उपाय? चला तर मग जाणून घेऊयात.

शिकाकाई आणि दही

शिकाकई ही वनस्पती केसांसाठी अतिशय फायदेशीर आहे. आयुर्वेदामध्ये या वनस्पतीचे महत्व सांगण्यात आले आहे. शिकाकाई ही वनस्पती आपल्या केसांसाठी नैसर्गिक क्लिंजर म्हणून काम करते.

त्यामुळे, केसांमधील आणि टाळूवरील अतिरिक्त तेलकटपणा निघून जाण्यास मदत होते. केसगळतीसाठी देखील शिकाकाई उपयुक्त आहे. त्यामुळे, केस धुण्यासाठी शिकाकाईचा वापर केला जातो. आजकाल बाजारात शिकाकाईची पावडर देखील मिळते. या पावडरचा वापर तुम्ही केस धुण्यासाठी करू शकता.

तेलकट आणि चिकट केसांची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही एका बाऊलमध्ये शिकाकाई पावडर घ्या. त्यामध्ये २-३ चमचे दही मिक्स करा. आता ही पेसट केसांवर हेअरपॅकच्या रूपात लावा. ३० मिनिटांनी केस धुवा. अधिक चांगल्या परिणामांसाठी तुम्ही हा हेअरपॅक आठवड्यातून एकदा केसांना लावू शकता.

कोरफड

कोरफड ही केसांसाठी आणि त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहे. केसांमधील अतिरिक्त तेल काढून टाकण्यासाठी आणि चिकट केसांची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही कोरफडीचा वापर करू शकता.

कोरफडमध्ये आढळून येणारे पोषकघटक आपल्या तेलकट केसांमधील सीबमचे उत्पादन नियंत्रित करण्यास मदत करतात. सीबमचे उत्पादन संतुलित करून ते टाळूला कोरडे न करता अतिरिक्त तेल काढून टाकण्यास मदत करतात. त्यामुळे, केसांमधील तेलकटपणा आणि चिकटपणा काढून टाकण्यासाठी तुम्ही कोरफड जेलचा वापर करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT