Winter Skin Care esakal
लाइफस्टाइल

Winter Skin Care : अंघोळ केल्यानंतर त्वचेला खाज सुटते; मग, ‘या’ घरगुती उपायांची घ्या मदत

त्वचेवर खाज सुटणे आणि त्वचा कोरडी होणे या समस्या हिवाळ्यात सुरू होतात.

Monika Lonkar –Kumbhar

Winter Skin Care : हिवाळ्यात आरोग्यावर आणि त्वचेवर अनेक परिणाम होतात. त्यामुळे, या दिवसांमध्ये त्वचेची आणि आरोग्याची खास काळजी घ्यावी लागते. हिवाळा सुरू झाला की, सर्दी, खोकला आणि ताप इत्यादी आजार सुरू होतात.

या आजारांसोबतच आणखी एक समस्या निर्माण होते. ती समस्या म्हणजे अंघोळ केल्यानंतर त्वचेवर खाज सुटणे आणि त्वचा कोरडी होणे. ऐन हिवाळ्यात ही समस्या सुरू झाल्यामुळे, अनेक जण त्रस्त होतात.

या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायांची मदत घेऊ शकता. कोणते आहेत हे घरगुती उपाय? चला तर मग जाणून घेऊयात.  

लिंबाचा रस

लिंबाचा रस हा आपल्या त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर आहे. त्वचेवर खाज येण्याच्या समस्येपासून सुटका करून घेण्यासाठी तुम्ही अर्धा चमचा बेकिंग सोड्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस मिसळून त्याची पेस्ट तयार करा.

आता ही पेस्ट तुम्ही खाज आलेल्या भागावर लावू शकता. यामुळे, त्वचेला आराम मिळेल आणि कोरड्या त्वचेची समस्या ही दूर होण्यास मदत होईल.

कोरफड जेल

कोरफड ही आपल्या आरोग्यासाठी, त्वचेसाठी आणि केसांसाठी अतिशय फायदेशीर आहे. कोरफड अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांनी समृद्ध असल्यामुळे, ती त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर आहे.

त्वचा कोरडी होणे, त्वचेला खाज येणे आणि पिंपल्सची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही कोरफड जेलचा वापर करू शकता. यासाठी, एका वाटीत ओटमील घ्या. त्यामध्ये कोरफडचा गर किंवा कोरफड जेल मिसळा.

आता ही पेस्ट अंघोळ करण्यापूर्वी शरीराच्या ज्या भागावर खाज येते तिथे लावा. त्यानंतर, स्वच्छ पाण्याने ती जागा धुवून टाका. यामुळे, तुमची खाज येण्याची आणि कोरड्या त्वचेची समस्या दूर होण्यास मदत होईल.

कडुलिंबाची पाने

बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध घालण्याचे काम कडुलिंब करते. कडुलिंब हे आपल्या आरोग्यासाठी, त्वचेसाठी आणि केसांसाठी अतिशय फायदेशीर आहे. त्वचेतील कोरडेपणा आणि खाज येण्याची समस्या दूर करण्यासाठी कडुलिंबाच्या पानांची तुम्ही मदत घेऊ शकता.

यासाठी कडुलिंबाची पाने धुवून घ्या. नंतर, ही पाने कोरडी करून घ्या. त्यानंतर, मोहरीच्या तेलात १५-२० कडुलिंबाची पाने घालून ती उकळण्यासाठी ठेवा. त्यानंतर, तेल थंड झाल्यावर हे मिश्रण गाळून घ्या आणि ज्या भागावर खाज येते तिथे लावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT