Face Packs For Sensitive Skin Esakal
लाइफस्टाइल

Face Packs For Sensitive Skin : संवेदनशील त्वचेमुळे त्रस्त आहात? बदाम आहे मदतीला! जाणून घ्या ‘हे’ होममेड फेसपॅक्स

संवेदनशील त्वचेची देखभाल करणे हे वाटते तितके सोपे नाही.

Monika Lonkar –Kumbhar

Face Packs For Sensitive Skin : त्वचेच्या समस्या आजकाल सामान्य झाल्या आहेत. कोरडी त्वचा असो की तेलकट प्रत्येक त्वचेच्या समस्या वेगवेगळ्या आहेत. या सगळ्यांमध्ये संवेदनशील त्वचा म्हणजेच Sensitive Skin ची खास काळजी घ्यावी लागते.

या त्वचेची देखभाल करणे हे वाटते तितके सोपे नाही. पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा अशा सर्व ऋतूंमध्ये संवेदनशील त्वचेची काळजी घ्यावी लागते. शिवाय, या त्वचेचे सौंदर्य टिकवून ठेवणे हे सोपे काम नाही. यासाठी योग्य आहार, त्वचेची काळजी आणि योग्य स्किनकेअर रूटीन फॉलो करावे लागते.

संवेदनशील त्वचा असणाऱ्या व्यक्तींना अतिनील किरणांमुळे आणि त्वचेशी संबंधीत असलेल्या टॅन, लालसरपणा, पुरळ, काळे डाग इत्यादी समस्यांचा सामना करावा लागतो. आज आपण संवेदनशील त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर असणाऱ्या घरगुती फेसपॅक्सबद्दल जाणून घेणार आहोत.

अंडी आणि बदाम

हा फेसपॅक बनवण्यासाठी ६-७ बदाम घ्या. ते रात्रभर पाण्यात भिजवा. त्यानंतर त्याची बारीक पेस्ट करा. आता १ अंड फेटून घ्या. आता हे दोन्ही घटक एकत्र करा. त्यामध्ये १ चमचा गुलाबजल मिक्स करा. आता तुमचा फेसपॅक तयार आहे. हा फेसपॅक चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. २०-२५ मिनिटांनंतर चेहरा धुवा.

कोरफड आणि मध

कोरफड ही सर्व त्वचा प्रकारांसाठी फायदेशीर आहे. हा फेस पॅक तयार करण्यासाठी ३ चमचे कोरफड जेल किंवा कोरफडचा गर घ्या. यामध्ये १ चमचा मध मिक्स करा. आता हे दोन्ही घटक एकत्र करून चेहऱ्यावर लावा. २० मिनिटांनी चेहरा धुवा.

हळद आणि दूध

संवेदनशील त्वचेसाठी हळद आणि दूधाचा हा फेसपॅक अतिशय फायदेशीर आहे. हा फेस पॅक तयार करण्यासाठी एका बाऊलमध्ये २ चमचे कच्चे दूध घ्या. आता यामध्ये १ चमचा लिंबाचा रस आणि चिमूटभर हळद घाला.

आता एका कॉटनच्या मदतीने हा फेस पॅक चेहऱ्यावर लावा. १५ मिनिटे बोटांच्या सहाय्याने चेहऱ्यावर मसाज करा. त्यानंतर २० मिनिटे फेसपॅक चेहऱ्यावर तसाच ठेवा. त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत सेनाभवनासमोर राडा! शिवसैनिक पोलिसांच्या ताब्यात, आदित्य-तेजस ठाकरे आक्रमक

CJP Protest Streets Again : "आंदोलन करणार नाही अशी कोणत्याच बॉण्डवर सही केली नाही; पुन्हा रस्त्यावर उतरणार!"; अभिजीत दिपके यांचा थेट इशारा

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

Beed Jeweller Fraud: साेन्याची मोड तपासली, तरी फसवणूक झाली; धारूरच्या सराफाला १७.५० लाखांना गंडा, नेमकं काय घडलं?

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याच्या मतमोजणीसाठी वाहतुकीत बदल; बारामती-निरा मार्गावरील रस्ता २४ तास बंद, नेमका कसा असेल बदल?

SCROLL FOR NEXT