Combination Skin Facepack
Combination Skin Facepack esakal
लाइफस्टाइल

Combination Skin Face packs : मिश्र त्वचेमुळे त्रस्त आहात ? कोरफड आहे मदतीला! जाणून घ्या ‘हे’ होममेड फेसपॅक्स

सकाळ डिजिटल टीम

Combination Skin Face packs : प्रत्येकाची त्वचा वेगळी असते. कुणाची तेलकट तर कुणाची कोरडी असते, तर कुणाची मिश्र त्वचा असते. त्वचा कोणत्याही प्रकारची असो तिची काळजी घेणे महत्वाचे आहे. ज्यांची त्वचा मिश्र आहे त्यांना तर त्वचेची खूप काळजी घ्यावी लागते.

मिश्र प्रकारची त्वचा (Combination Skin) ही कधी तेलकट असते तर कधी कोरडी असते. वातावरणात ज्या प्रकारे बदल होत असतात अगदी त्याच प्रमाणे या मिश्र त्वचेमध्ये बदल होत असतात.

त्यामुळे, नेमकं कोणत्या प्रकारचे स्किनकेअर प्रॉडक्ट्स वापरावे ? की घरगुती उपाय करावे ? असे प्रश्न मिश्र त्वचा असणाऱ्यांना पडतात. आज आपण खास मिश्र त्वचेसाठी उपयुक्त असलेल्या होममेड फेसपॅक्सबद्दल जाणून घेणार आहोत.

दही आणि गुलाबजल

दह्यामध्ये असलेल्या पोषकघटकांमुळे त्वचा मऊ होण्यास मदत मिळते. दही त्वचेला मॉईश्चराईझ करण्याचे काम करते. गुलाबपाणी मिश्र त्वचेसाठी जादूई पद्धतीने काम करते. गुलाबपाण्यातील गुणधर्मांमुळे त्वचेची जळजळ कमी होण्यास मदत मिळते.

असा करा फेसपॅक

  • दही आणि गुलाबजलचा फेस पॅक बनवण्यासाठी २ चमचे दही घ्या. त्यामध्ये १ चमचा गुलाबजल मिसळा.

  • आता हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि २० मिनिटांनी चेहरा धुवून टाका.

  • दही त्वचेला मॉईश्चराईझ करते आणि गुलाबजल त्वचेचे संरक्षण करण्यास मदत करते.

कोरफड आणि तांदळाचे पीठ

कोरफड ही प्रत्येक प्रकारच्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. मिश्र त्वचेला ओलसरपणा देण्याचे काम कोरफड करते तर तांदळाचे पीठ हे त्वचेला एक्सफोलिएट करते. चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल काढण्याचे काम तांदळाचे पीठ करते. त्यामुळे, मिश्र त्वचेसाठी हा फेसपॅक सर्वोत्तम असल्याचे सांगितले जाते.

असा तयार करा फेसपॅक

  • कोरफडीचा गर काढून घ्या. त्यामध्ये २ चमचे तांदळाचे पीठ मिक्स करा. तुमचा फेसपॅक तयार आहे.

  • आता हा फेसपॅक चेहऱ्यावर ३० मिनिटांसाठी ठेवा. त्यानंतर, चेहरा धुवून टाका.

  • या फेसपॅकमुळे चेहऱ्यावर चमक येते आणि चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स, अतिरिक्त तेल निघून जाण्यास मदत होते.

कच्चे दूध आणि तांदळाचे पीठ

त्वचेला पोषण देण्याचे काम कच्चे दूध करते. चेहऱ्यावरील छिद्रांमधील घाण काढून टाकण्याचे काम कच्चे दूध करते आणि त्वचा मॉईश्चराईझ करते. तांदळाचे पीठ त्वचेला एक्सफोलिएट करण्याचे काम करते. त्यामुळे, हे दोन्ही घटक मिश्र त्वचेसाठी फायदेशीर आहेत.

असा बनवा फेसपॅक

  • ३ चमचे कच्चे दूध घ्या. त्यामध्ये, २ चमचे तांदळाचे पीठ मिक्स करा.

  • त्यामध्ये तुम्ही पीठीसाखर ही घालू शकता. आता तुमचा फेसपॅक तयार आहे.

  • हा फेसपॅक चेहऱ्यावर कॉटनच्या मदतीने लावा. त्यानंतर,२० मिनिटे चेहऱ्यावर ते तसेच ठेवा.

  • नंतर, गरम पाण्याने चेहरा धुवून टाका आणि चेहऱ्यावर मॉईश्चरायझर लावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray: मतदानाचा टक्का का कमी होतोय?, आदित्य ठाकरेंनी सांगितलं कारण! निवडणूक आयोगाला दाखवला आरसा

Aadesh Bandekar: पवईतील मतदान केंद्रातील EVM मशीन बंद; आदेश बांदेकर 3 तास रांगेत उभे, मतदार संतापले

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अमिर खान, किरण राय यांनी बजावला मतदानाचा हक्क

CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात मतदानाचा टक्का जास्त; दुपारी 1 पर्यंत झाले 29.88 टक्के मतदान

Latest Marathi Live News Update: मुख्यमंत्री शिंदे यांचा अचानक मीरा-भाईंदर शहरात दौरा, कार्यकर्त्यांच्या घेतल्या धावत्या भेटी

SCROLL FOR NEXT