homemade face scrubs esakal
लाइफस्टाइल

Face Scrubs : चेहऱ्याची चमक वाढवतील 'हे' होममेड स्क्रब्स, जाणून घ्या बनवण्याची पद्धत

सध्याच्या वातावरणातील बदलांचा त्वचेवर अधिक परिणाम होतो. त्वचा अधिक कोरडी आणि निस्तेज दिसू लागते. त्यामुळे, त्वचेच्या अनेक समस्या देखील निर्माण होतात.

Monika Lonkar –Kumbhar

Face Scrubs : आजकालचे धावपळीचे जीवन, असंतुलित आहार आणि व्यायामाचा अभाव यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. या सर्व गोष्टींचा आरोग्यावर परिणाम होण्यासोबतच त्वचेवर ही याचा परिणाम होतो.

सध्याच्या वातावरणातील बदलांचा त्वचेवर अधिक परिणाम होतो. त्वचा अधिक कोरडी आणि निस्तेज दिसू लागते. त्यामुळे, त्वचेच्या समस्या देखील निर्माण होतात. त्यामुळे, या थंडीच्या दिवसांमध्ये त्वचेची खास काळजी घेणे गरजेचे आहे.

यासाठी अनेक जण मार्केटमधील महागड्या क्रीम्स, लोशन्स आणि स्क्रब्सचा वापर करतात. परंतु, यामुळे त्वचेवर तात्पुरता फरक दिसून येतो. याऐवजी तुम्ही घरच्या घरी साखरेच्या मदतीने होममेड स्क्रब्स बनवू शकता. या स्क्रब्सचा वापर केल्याने त्वचेवर छान चमक येते. चला तर मग जाणून घेऊयात या स्क्रब्सविषयी.

ग्रीन टी आणि साखर

ग्रीन टीमध्ये अनेक प्रकारचे पोषकघटक आढळून येतात. हे घटक त्वचेला चमकदार बनवण्यासाठी मदत करतात. ग्रीन टी पासून तुम्ही होममेड स्क्रब बनवू शकता. हे स्क्रब बनवण्यासाठी एका बाऊलमध्ये ग्रीन टी घ्या.

त्यात एक चमचा साखर मिसळा. आता या पेस्टच्या मदतीने चेहऱ्यावर मसाज करा आणि त्यानंतर चेहरा धुवा. या होममेड स्क्रबने चेहऱ्यावर चमक तर येतेच शिवाय, चेहऱ्यावरील पिंपल्सची समस्या देखील दूर होते.

हळद आणि साखर

स्वयंपाकघरात हमखास वापरली जाणारी गोष्ट म्हणजे हळद होय. हळद ही आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. यासोबतच ती त्वचेसाठी देखील लाभदायी आहे.

हळद आणि साखरेचे हे फेसस्क्रब बनवण्यासाठी एका बाऊलमध्ये १ चमचा हळद घ्या. त्यामध्ये १ चमचा मध आणि साखर मिसळा. तुमचे फेसस्क्रब तयार आहे. या स्क्रबच्या मदतीने चेहऱ्यावर मसाज करा, त्यानंतर १५ मिनिटांनी चेहरा गरम पाण्याने धुवून टाका. या स्क्रबमुळे चेहऱ्यावर छान ग्लो येईल आणि त्वचेच्या समस्या दूर होण्यास मदत होईल.

लिंबू आणि साखर

लिंबू हे आपल्या आरोग्यासोबतच त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. लिंबामध्ये ‘व्हिटॅमीन सी’ चे भरपूर प्रमाण आढळून येते. या व्हिटॅमीन सी मुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.

लिंबू आणि साखरेचे हे फेसस्क्रब बनवण्यासाठी एका बाऊलमध्ये १ चमचा साखर घ्या. त्यामध्ये लिंबाचा रस मिसळून त्याची पेस्ट बनवा. या पेस्टच्या मदतीने चेहऱ्यावर मसाज करा आणि १५-२० मिनिटांनी चेहरा धुवून टाका. या फेसस्क्रबमुळे चेहऱ्याचे टॅनिंग देखील कमी होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New CJI Appointment 2025 : कोण होणार देशाचे नवे सरन्यायाधीश? बीआर गवई यांनी केली नावाची घोषणा...

INDW vs BANW: राधा यादवसह भारतीय गोलंदाजांचा बांगलादेशविरुद्ध तिखट मारा, वर्ल्ड कप सेमीफायनलपूर्वी सोप्या विजयाची संधी

Noida International Airport : नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाची तारीख लवकरच ठरणार! मोदी करणार उद्घाटन?

Uttar Pradesh News : उत्तर प्रदेशात धान्य खरेदीसाठी १.५४ लाखांहून अधिक शेतकऱ्यांची नोंदणी! हा आहे टोल फ्री क्रमांक

Anna Hazare : ''माझी गाडी लोक वर्गणीतून घेतलेली, लोकपाल सदस्यांना कशाला हव्यात महागड्या गाड्या?'', अण्णा हजारेंनी व्यक्त केली नाराजी...

SCROLL FOR NEXT