Winter Skin Care esakal
लाइफस्टाइल

Winter Skin Care : हिवाळ्यात घरच्या घरी बनवा 'हे' खास फेस सीरम्स, जाणून घ्या बनवण्याची पद्धत

हिवाळ्यात त्वचेला हायड्रेटेड ठेवण्यासाठी स्किनकेअर रूटीन परफेक्ट असणे गरजेचे आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Winter Skin Care : थंडीच्या दिवसांमध्ये आरोग्यासोबतच त्वचेची देखील काळजी घ्यावी लागते. या दिवसांमध्ये त्वचा अधिक कोरडी आणि रूक्ष होण्याचा धोका असतो. त्यामुळे, त्वचेला हायड्रेटेड ठेवण्यासाठी या दिवसांमध्ये तुमचे स्किनकेअर रूटीन परफेक्ट असणे गरजेचे आहे.

या स्किनकेअर रूटीनमध्ये फेस सीरम तर असायलाच हवे. हिवाळ्यातच नाही तर कोणताही ऋतु असला तरी सुद्धा फेस सीरमचा स्किनकेअर रूटीनमध्ये समावेश असणे फायद्याचे ठरते. फेस सीरममुळे पिंपल्स, चेहऱ्यावरील डाग आणि धूलिकण काढून टाकण्यास मदत होते. शिवाय, त्वचा हायड्रेटेड राहते.

मात्र, तुम्हाला हे माहित आहे का? की, खास हिवाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही घरच्या घरी फेस सीरम बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊयात हे फेस सीरम बनवण्याची योग्य पद्धत कोणती?

ब्रायटनिंग सीरम

ब्रायटनिंग सीरम हे त्वचेवर उजळपणा देण्यास मदत तर करतेच, सोबतच त्वचेवरील डार्क स्पॉट्स आणि काळ्या वांगांची समस्या, रेड रॅशेस दूर करण्यास मदत करते. त्यामुळे, थंडीच्या दिवसांमध्ये या सीरमचा अवश्य वापर करा.

हे सीरम बनवण्यासाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे :

  • १ चमचा गुलाबाचे तेल

  • २-३ चमचे कडुलिंबाचे तेल

  • व्हिटॅमिन सी पावडर १ चमचा (पाण्यात विरघळलेली)

हे सीरम बनवण्याची पद्धत खालीलप्रमाणे :

  • एक काचेची ड्रॉपर बॉटल घ्या.

  • आता, त्यामध्ये हे सर्व साहित्य एकत्रितपणे मिसळा.

  • तुमचे फेस सीरम तयार आहे.

  • चेहऱ्यावर मॉईश्चरायझर लावण्यापूर्वी हे फेस सीरम अवश्य लावा.

हायड्रेटिंग सीरम

हिवाळ्यात त्वचा हायड्रेट ठेवणे हे फार अवघड काम असते. त्यातल्या त्यात जर तुमची कोरडी त्वचा असेल तर, अशा व्यक्तींना कोरड्या त्वचेमुळे हिवाळ्यात जास्त त्रास होतो.

त्यामुळे, या दिवसांमध्ये कोरड्या त्वचेची अधिक काळजी घ्यावी लागते. त्वचेला हायड्रेट ठेवावे लागते. हे हायड्रेटिंग सीरम कोरड्या त्वचेसाठी आणि इतर त्वचा प्रकारांसाठी अतिशय लाभदायी आहे.

हायड्रेटिंग सीरम बनवण्यासाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे :

  • १ चमचा कोरफड जेल

  • १ चमचा ग्लिसरीन

  • गुलाबतेलाचे ३-४ थेंब

हायड्रेटिंग सीरम बनवण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे :

  • वरील सर्व साहित्य हे एका ड्रॉपर बॉटलमध्ये एकत्रित करा.

  • हे सर्व मिश्रण स्टोअर करण्यासाठी शक्यतो डार्क रंगाच्या ड्रॉपर बॉटलचा वापर करा.

  • या सीरमचा वापर करण्यापूर्वी चेहरा छान स्वच्छ करा.

  • त्यानंतर, या फेस सीरमचे ३-४ थेंब चेहऱ्यावर लावून छान मसाज करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: वाल्मिक कराड पुन्हा करु शकतो जामिनासाठी अर्ज; जाणून घ्या काय आहे तरतूद?

Latest Marathi News Live Update : पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवणार - प्रफुल पटेल

IND vs ZIM, T20 WC: आफ्रिकेच्या विजयाने टीम इंडियाचा भार हलका केला! झिम्बाब्वेविरुद्ध संघ प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करून उतरला

Baramati News : बारामती नगरपरिषदेच्या पहिल्याच बैठकीत नगरसेवक आक्रमक...

Pachod Theft : चोरट्यांनी बनविले शेतकऱ्यांना 'लक्ष्य'! पाणी असूनही पिकांची होरपळ; दोनशेवर शेतकऱ्यांच्या विद्यूत पंपाचे केबल रात्रीतून लंपास

SCROLL FOR NEXT