Hair Split Ends
Hair Split Ends  esakal
लाइफस्टाइल

Hair Split Ends : हिवाळ्यात केसांमध्ये वारंवार फाटे फुटतात? मग, ‘या’ होममेड हेअर मास्कची घ्या मदत

Monika Lonkar –Kumbhar

Hair Split Ends : हिवाळ्यात वातावरणातील बदलाचा आरोग्यावर आणि त्वचेवर अधिक परिणाम होतो. परंतु, त्वचा आणि आरोग्यासोबतच केसांवर ही याचा विपरीत परिणाम होतो. कोरड्या आणि थंड हवेमुळे केसांच्या समस्या सुरू होतात.

केस गळणे, केस तुटणे, केसांना फाटे फुटणे आणि केस अकाली पांढरे होणे इत्यादी समस्या सुरू होतात. केसांची वाढ सुरू झाली की, केसांना फाटे फुटू लागतात. परंतु, हे फाटे फुटण्याचे प्रमाण वाढले की, केस अतिशय खराब दिसू लागतात.

केसांचे फाटे फुटण्यामागे अनेक कारणे असू शकतात. मात्र, केसांना फाटे फुटल्यावर त्यावर उपाय काय करावा? असा महिलांना प्रश्न पडतो. मात्र, आज त्यावर आम्ही खास उपाय सांगणार आहोत. केसांना वारंवार फाटे फुटल्यावर तुम्ही घरगुती हेअर मास्कची मदत घेऊ शकता. चला तर मग जाणून घेऊयात या घरगुती हेअर मास्कबद्दल.

कोरफड हेअर मास्क

कोरफडमध्ये मोठ्या प्रमाणात पोषकघटकांचा समावेश आढळून येतो. या पोषकघटकांमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि बी१२ चा समावेश आढळून येतो. त्यामुळे, कोरफड ही आपल्या आरोग्यासाठी त्वचेसाठी, केसांसाठी आणि आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.

कोरफड हेअर मास्क बनवण्यासाठी १ वाटी कोरफड जेल घ्या. या जेलमध्ये ३-४ चमचे दही मिसळा. तुमचा हेअर मास्क तयार आहे. हा हेअर मास्क आता केसांवर अर्ध्या तासासाठी लावा. त्यानंतर, केस स्वच्छ पाण्याने धुवा.

या हेअर मास्कमुळे केसांना फाटे फुटण्याची समस्या दूर होण्यास मदत होईल. त्यासोबतच फ्रिझी केसांची समस्या दूर होईल.

मेथी दाण्यांपासून बनवा हेअर मास्क

मेथी दाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात पोषकतत्वांचा समावेश आढळून येतो. हे मेथी दाणे आपण अनेकदा स्वयंपाकघरात देखील वापरतो. अनेक रेसिपीजमध्ये मेथी दाण्यांचा वापर केला जातो.

मेथी दाण्यांची पावडर ही केसांच्या अनेक समस्या दूर करण्यास फायदेशीर ठरते. मेथीमध्ये प्रथिने, लोह आणि झिंकचा समावेश आढळून येतो. हे घटक केसांना पोषण देतात. त्यामुळे, कोरड्या केसांची, फ्रिझी केसांची आणि केसांमध्ये फाटे फुटण्याची समस्या दूर होण्यास मदत होते.

मेथीच्या दाण्यांचा हेअर मास्क बनवण्यासाठी मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर, सकाळी उठल्यावर त्याची मिक्सरला बारीक पेस्ट तयार करा. आता या पेस्टमध्ये मध मिसळा तुमचा हेअर मास्क तयार आहे. हा हेअर मास्क केसांवर २५-३० मिनिटांसाठी लावा. त्यानंतर, केस धुवून टाका.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: "केजरीवालांना स्वतंत्र कोठडी अन् साधा कूलरही नाही"; आतिषी यांचा राज्यपालांवर हल्लाबोल

Uddhav Thackeray: फडणवीसांच्या जवळच्या व्यक्तीनं उद्धव ठाकरेंकडं भेटीसाठी मागितली वेळ?; निकालापूर्वीच मोठी घडामोड

Pune Lok Sabha Election Results : कोरेगाव पार्क परिसरात उद्या वाहतुकीत बदल; कोणते आहेत पर्यायी मार्ग, जाणून घ्या..

Hardik Pandya Natasa Stankovic : ट्रोलिंगवर सहानभुतीचा उतारा.. हार्दिकनं मुद्दाम पसरवली घटस्फोटाची अफवा?

Uddhav Thackeray: ...तर ते CCTV फुटेज बाहेर काढावे लागेल, उद्धव ठाकरेंवरील आरोपाने राजकारण ढवळून निघणार

SCROLL FOR NEXT