Hair Care Tips esakal
लाइफस्टाइल

Hair Care Tips : कोरड्या केसांमुळे लूक खराब झालाय? मग, 'या' होममेड हेअर मास्कची घ्या मदत

हिवाळ्यात आरोग्यासोबतच आपल्याला त्वचेची आणि केसांची खास काळजी घ्यावी लागते. या थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा कोरडी होण्यासोबतच तुमचे केस देखील कोरडे होतात.

Monika Lonkar –Kumbhar

Hair Care Tips : हिवाळ्यात आरोग्यासोबतच आपल्याला त्वचेची आणि केसांची खास काळजी घ्यावी लागते. या थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा कोरडी होण्यासोबतच तुमचे केस देखील कोरडे होतात. मग, या कोरड्या केसांमुळे तुमचा संपूर्ण लूकच खराब दिसू लागतो.

केस कोरडे झाल्यामुळे केसांमध्ये गुंता मोठ्या प्रमाणात होऊ लागतो. शिवाय, या कोरडेपणामुळे टाळूला खाज येणे, केस गळणे इत्यादी समस्यांना तोंड द्यावे लागते. केसांमध्ये कोरडेपणा निर्माण झाल्यामुळे केसांच्या या सगळ्या समस्या सुरू होतात. या समस्यांपासून सुटका करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायांची मदत घेऊ शकता.

यासाठी तुम्ही घरच्या घरी काही हेअर मास्क बनवू शकता. या हेअर मास्कमुळे केसांमधील कोरडेपणा निघून जाण्यास नक्कीच मदत होईल. कोणते आहेत हे हेअर मास्क? चला तर मग जाणून घेऊयात.

कोरफड आणि नारळाचे तेल

कोरफड आणि नारळाचे तेल हे आपल्या केसांसाठी अतिशय फायदेशीर आहे. कोरफडमध्ये व्हिटॅमिन ई मोठ्या प्रमाणात आढळून येते. या व्हिटॅमिनमुळे केसांचे योग्य प्रकारे पोषण होते आणि केस हायड्रेटेड राहण्यास मदत होते. यासोबतच नारळाचे तेल देखील केसांसाठी अतिशय लाभदायी मानले जाते.

कोरफड आणि नारळाच्या तेलाचा हेअरमास्क बनवण्यासाठी सर्वात आधी कोरफडचा गर घ्या किंवा कोरफड जेल घ्या. त्यामध्ये, आता नारळाचे तेल मिसळा. आता तुमचा हेअर मास्क तयार आहे. या हेअर मास्कच्या मदतीने केसांना छान मसाज करा. ३० ते ४० मिनिटांनंतर केस स्वच्छ पाण्याने धुवून टाका. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही या हेअर मास्कमध्ये व्हिटॅमिन ई च्या कॅप्सूल देखील मिसळू शकता.

दही आणि अंडे

त्वचेला आणि केसांना योग्य प्रकारे पोषण देण्यासाठी आणि त्यांना हायड्रेटेड ठेवण्यासाठी दही अतिशय फायदेशीर आहे. दह्यामुळे केस मऊ राहण्यास देखील मदत होते. अंड्यामुळे केसांना छान चमक मिळते.

दही आणि अंड्याचा हा हेअरमास्क बनवण्यासाठी सर्वात आधी एका बाऊलमध्ये दही घ्या. या दह्यामध्ये अंड्याचा पांढरा भाग मिसळा. आता या मिश्रणात लिंबाचा रस पिळा. त्यामुळे, केसांमधील कोंडा दूर होण्यास मदत होईल. आता हा हेअर मास्क केसांना लावा. त्यानंतर, ३०-३५ मिनिटांनंतर केस धुवून टाका. दही आणि अंड्याचा हा हेअर मास्क केसांना योग्य पोषण मिळवून देतो आणि कोरड्या केसांची समस्या दूर करण्यास मदत करतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT