Scrubs For Oily Skin esakal
लाइफस्टाइल

Scrubs For Oily Skin : तेलकट त्वचेमुळे त्रस्त आहात? मग तांदूळ आहे मदतीला! जाणून घ्या ‘हे’ होममेड स्क्रब्स

तेलकट त्वचेमुळे चेहऱ्यावर पुरळ, काळे डाग आणि ब्लॅकहेड्स येण्याचा धोका देखील संभवतो.

सकाळ डिजिटल टीम

Oily Skin Scrubs : तेलकट त्वचेच्या अनेक समस्या असतात. तेलकट त्वचेमुळे चेहऱ्यावर पुरळ, काळे डाग आणि ब्लॅकहेड्स येण्याचा धोका देखील संभवतो. त्यामुळे, ज्यांची तेलकट त्वचा आहे, त्यांना त्वचेची खास काळजी घ्यावी लागते. तेलकट त्वचेच्या या समस्या दूर करण्यासाठी अनेक जण स्किनकेअर प्रॉडक्ट्सचा आधार घेतात.

मात्र, केमिकलयुक्त प्रॉडक्ट्स वापरण्यापेक्षा जर तुम्ही घरगुती होममेड स्क्रब्सची मदत घेतली तर याचे नक्कीच फायदे तुम्हाला मिळू शकतील. हे घरगुती स्क्रब्स तेलकट त्वचा स्वच्छ करतात आणि त्वचा निरोगी ठेवण्यास मदत ही करतात.

तेलकट त्वचा स्वच्छ करण्यासाठी त्वचेतील मृत पेशी आणि अतिरिक्त तेल काढून टाकण्याची गरज असते. हे घरगुती स्क्रब्स या कामी आपली मदत करतात. शिवाय, त्वचेचे नुकसान होण्यापासून संरक्षण देखील करतात. आज आपण अशाच काही घरगुती स्क्र्ब्सबद्दल जाणून घेणार आहोत जे खास तेलकट त्वचेसाठी बनवण्यात येतात.

लिंबू-साखरेचे स्क्रब

लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असते. ज्यामुळे, त्वचेला भरपूर फायदे मिळतात. लिंबामुळे त्वचा फ्रेश आणि ग्लोईंग दिसते. लिंबाच्या रसामध्ये असलेला एन्झाईम घटक हा त्वचेतील छिद्रांना घट्ट करण्याचे काम करते. यामुळे त्वचेतील अतिरिक्त तेल निघून जाण्यास मदत होते.

हे स्क्रब तयार करण्यासाठी १ चमचा लिंबाचा रस घ्या, त्यामध्ये २ चमचे ब्राऊन शुगर आणि १ चमचा मध मिक्स करा. आता हे सर्व मिश्रण एकत्र करा, तुमचे स्क्रब तयार आहे. या स्क्रबने चेहरा १० मिनिटे स्क्रब करा, नंतर चेहरा पाण्याने धुवून टाका.

संत्र्याचे स्क्रब

तेलकट त्वचेसाठी संत्रा हे अतिशय फायदेशीर आहे. संत्र्यामध्ये असलेले पोषक घटक हे त्वचेमध्ये तयार होणाऱ्या तेलाला नियंत्रित करतात. शिवाय, त्वचेवर उजळपणा देखील येतो.

संत्र्याचे स्क्रब तयार करण्यासाठी १ चमचा संत्र्याच्या सालीची पावडर घ्या. त्यात १ चमचा मध आणि १ चमचा हळद घ्या, आता हे सर्व मिश्रण एकत्र करा. तुमचे स्क्रब तयार आहे. या स्क्रबने चेहरा १० मिनिटे स्क्रब करा आणि नंतर पाण्याने धुवून टाका. अधिक चांगल्या परिणामांसाठी हे स्क्रब आठवड्यातून २ वेळा करा.

तांदळाचे स्क्रब

तेलकट त्वचेतील मृत पेशी काढून टाकण्याचे काम तांदूळ करते. तांदूळ हे त्वचेसाठी अतिशय चांगल्या प्रकारे काम करते. तांदळाला सौम्य एक्सफोलिएंट म्हणून ही ओळखले जाते.

हे स्क्रब बनवण्यासाठी १ चमचा तांदूळ किंवा तांदळाचे पीठ घ्या. त्यामध्ये १ चमचा बेकिंग सोडा घाला. आता तुमचे फेस स्क्रब तयार आहे. आता चेहऱ्यावर ५ मिनिटे या स्क्रबने छान स्क्रबिंग करा. त्यानंतर, चेहरा धुवून टाका. आठवड्यातून २ वेळा त्वचेवर तांदळाने स्क्रबिंग जरूर करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Employee: सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना ३१ मार्च २०२७ पर्यंत स्थगिती; केंद्राचे सर्व राज्यांना निर्देश

Pune Mulshi Bhalgudi fire News: भालगुडीतील लव्हाळवाडीत आठ घरांना भीषण आग; आठ कुटुंबे उघड्यावर, पावसाळ्यापूर्वी घरकुल व तातडीच्या मदतीची मागणी

PSL 2026: अपमानाचे घोट गिळत, बाबर आझम पेटला, १२ चेंडूंत कुटल्या ५२ धावा; मेंडिसचे शतक अन् समदच्या ३३३ च्या स्ट्राईक रेटने धावा...

Pune Voter Mapping: वडगाव शेरीत सव्वा लाख मतदारांचे मॅपिंग पूर्ण; उर्वरित मतदारांना SIR मोहिमेत लवकर सहभागी होण्याचे आवाहन

Pune Garbage News: घनकचरा विभागातील ‘क्रीम पोस्टिंग’ला लगाम? पुणे महापालिकेत एका ठेकेदाराला ५०० टनांपेक्षा जास्त क्षमतेचे कचरा प्रकल्प न देण्याचा प्रस्ताव

SCROLL FOR NEXT