Iron Rich Juice esakal
लाइफस्टाइल

Iron Rich Juice : रक्तातील लोहाचे प्रमाण कमी झाले आहे का ? बीट आहे मदतीला! जाणून घ्या ‘हे’ हेल्दी ज्यूस

रक्तातील लोहाचे प्रमाण कमी करण्यासाठी आपण योग्य आहार घेणे गरजेचे आहे.

सकाळ डिजिटल टीम

आपल्या शरिराला सुदृढ ठेवण्यासाठी आपण अनेक गोष्टींचा आहारामध्ये समावेश करतो. या आहारामध्ये आपण लोहयुक्त खाद्पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे. कारण, आजकाल रक्तातील लोहाचे प्रमाण कमी होण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे.

रक्तातील लोहाचे प्रमाण कमी करण्यासाठी आपण योग्य आहार घेणे गरजेचे आहे. जर रक्तात लोहाचे प्रमाण कमी असेल तर ही तुमच्यासाठी धोक्याची घंटा असू शकते. कारण, यामुळे तुम्हाला अनेक समस्या भेडसावू शकतात.

रक्तातील लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही काही हेल्दी ड्रिंक्सचा आहारात समावेश नक्की करू शकता. कोणते आहे हे हेल्दी ड्रिंक्स ? चला तर मग जाणून घेऊयात.

केळी आणि काकडी

केळी आणि काकडी हे दोन्ही घटक आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. हे दोन्ही घटक लोहाचे प्रमुख स्त्रोत म्हणून ओळखले जातात. या दोन्ही घटकांचा रस तुम्ही स्वतंत्रपणे किंवा एकत्रितपणे पिऊ शकता. या दोन्ही घटकांचा ज्यूस आरोग्यासाठी अतिशय लाभदायी आहे. काकडी आणि केळी आपल्या शरिरातील रक्त शुद्ध करण्यास ही मदत करतात.

बीट ज्यूस

बीटाचे सॅलेड, बीटाचा ज्यूस याचा आहारात अवश्य समावेश करा. बीटामध्ये भरपूर प्रमाणात लोह आढळून येते. बीटाचा ज्यूस जर तुम्ही आठवड्यातून ३ वेळा जरी प्यायला तरी लोहाची कमतरता दूर होण्यास मदत होईल. तसेच, बीट ज्यूस प्यायल्याने रक्त देखील शुद्ध होते. बीट ज्यूस आपले शरीर डिटॉक्स करण्यात आणि त्वचा ग्लोईंग करण्यात मदत करू शकते.

अननस आणि पालक

लोहाचा प्रमुख स्त्रोत म्हणून अननस आणि पालकला ओळखले जाते. या दोन्ही घटकांमध्ये लोहाचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे, हो दोन्ही घटक एकत्र करून त्याचा ज्यूस प्यायल्यास रक्तातील लोहाची पातळी वाढण्यास नक्कीच मदत होईल.

आवळ्याचा ज्यूस

आवळ्यामध्ये अनेक पोषकघटकांचा समावेश असतो. त्यामुळे, आवळ्याचा ज्यूस पिण्याचा सल्ला डॉक्टर आवर्जून देतात. अनेक आजारांवर आवळ्याच ज्यूस हा लाभदायी आहे. लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी आणि बॉडी डिटॉक्स करण्यासाठी आवळ्याचा ज्यूस फायदेशीर आहे. आठवड्यातून किमान २ वेळा आवळ्याच ज्यूस अवश्य प्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Harbour Line: मुंबईकरांचा खोळंबा! हार्बर लाईनवरील Up-Down दोन्ही मार्ग बंद; हजारो प्रवासी स्टेशनवर अडकले

Pune Railway Station: पुणे स्थानकावर रविवारी ‘मेगाब्लॉक’; पुणे-दौंड लोहमार्गावरील कामासाठी रेल्वे प्रशासनाचा निर्णय

Jalgaon MPSC Exam : जळगावात MPSC परीक्षेसाठी कडक सुरक्षा, लागू झाली 'ही' नियमावली; कॉपीमुक्त अभियानासाठी प्रशासन ॲक्शन मोडमध्ये!

Shocking : भारतीय क्रीडाविश्वात शोककळा... आशियाई सुवर्णपदक विजेत्या जसपाल राणा यांचे निधन, घडवलेत मनू भाकरसह अनेक खेळाडू

Latest Marathi News Live Update : हार्बर लाईनवरील रेल्वे वाहतूक विस्कळीत

SCROLL FOR NEXT