Blood Sugar sakal
लाइफस्टाइल

Health Care News: उपाशी पोटी ही पाने चावा, दिवसभर कंट्रोलमध्ये राहील Blood Sugar

मधुमेह हा झपाट्याने वाढणारा आजार आहे आणि भारतात सर्वाधिक रुग्ण आहेत.

Aishwarya Musale

मधुमेहाच्या बाबतीत, रक्तातील साखरेचे प्रमाण लक्षणीय वाढते. काही वेळा जेवण केल्यांनतर ब्लड शुगर झपाट्याने वाढू लागते. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी आहार आणि जीवनशैलीवर नियंत्रण ठेवावे लागेल. मिठाई खाण्यास सक्त मनाई आहे. पण काही आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहेत ज्यांचे सेवन रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

यापैकी काही जादुई पाने आहेत, ज्यांचे सकाळी लवकर सेवन केल्यास दिवसभर रक्तातील साखरेची पातळी कायम राहते. चला जाणून घेऊया ती कोणती पाने आहेत जी मधुमेह विरोधी आहेत.

1. इन्सुलिन प्लांट - इन्सुलिन प्लांटच्या पानांमध्ये मधुमेह विरोधी गुणधर्म असतात, म्हणून त्याला इन्सुलिन प्लांट म्हणतात. हे इन्सुलिन वाढवत नसले तरी रक्तातील साखर नक्कीच कमी करते. इन्सुलिन प्लांटला फेयरी कॉस्टस, स्पायरल फ्लॅग, चामाकोस्टस कस्पिडॅटस, क्रेप जिंजर, केमुक, कुमुल, कीकंद, पक्रमुला, पुष्करमुला या नावांनी देखील ओळखले जाते.

एनसीबीआय जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, अभ्यासात असे आढळून आले आहे की रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी इंसुलिन प्लांटचा वापर केला जातो.

2. आंब्याची पाने- TOI च्या वृत्तानुसार, आंब्याच्या पानांमध्ये देखील मधुमेहविरोधी गुणधर्म असतात. जर तुम्ही सकाळी आंब्याची पाने चघळली तर तुमची रक्तातील साखर दिवसभर वाढत नाही. त्याचबरोबर आंब्याचा पानांचा चहा पिऊ शकता. 15 मिनिटे उकळवा, थंड करा आणि रिकाम्या पोटी प्या. दिवसभर साखर वाढणार नाही.

3. कडुलिंबाची पाने- कडुलिंबाची पाने कडू असली तरी रक्त शुद्ध करतात. कडुलिंबाची पाने केवळ रक्त शुद्ध करत नाहीत तर रक्तातील साखर देखील काढून टाकतात. कडुनिंबाच्या पानांमध्ये फ्लेव्होनॉइड्स, ट्रायटरपेनॉइड्स, अँटी-व्हायरल कंपाऊंड्स आणि ग्लायकोसाइड्स सारखे घटक आढळतात जे रक्तातील साखर नियंत्रित करण्यात आश्चर्यकारक काम करतात.

4. जांभळाची पाने- जांभळामध्ये मधुमेहविरोधी गुणधर्म असतात, तुम्हाला याची माहिती असेलच पण जांभळाची पाने चघळल्याने रक्तातील साखरही नियंत्रित राहते. जर तुम्ही पाने चावू शकत नसाल तर पाण्यात उकळून, गाळून चहाप्रमाणे प्या. हा चहा प्यायल्याने रक्तातील साखरेचे व्यवस्थापन होण्यास मदत होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ''कानाखाली द्या पण व्हिडीओ काढू नका'' केडिया प्रकरणावर राज ठाकरेंनी मनसैनिकांना कोणता संदेश दिला?

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

SCROLL FOR NEXT