Makeup Tips esakal
लाइफस्टाइल

Makeup Tips : मेकअप करूनही चेहरा निस्तेज दिसतो? मग, फॉलो करा 'हे' आय मेकअप लूक्स

Makeup Tips : मेकअप हा महिलांचा अतिशय जिव्हाळ्याचा आणि प्रेमाचा विषय आहे. कोणताही कार्यक्रम, लग्न, पार्टी किंवा डेट नाईट असो. यासाठी महिला मेकअप करण्याला अधिक प्राधान्य देताना दिसतात.

Monika Lonkar –Kumbhar

Makeup Tips : मेकअप हा महिलांचा अतिशय जिव्हाळ्याचा आणि प्रेमाचा विषय आहे. कोणताही कार्यक्रम, लग्न, पार्टी किंवा डेट नाईट असो. यासाठी महिला मेकअप करण्याला अधिक प्राधान्य देताना दिसतात. मेकअपमध्ये आजकाल अनेक नवनवीन ट्रेंड येत आहेत. हे मेकअप ट्रेंड्स अनेक महिला फॉलो करतात.

हे सतत बदलणारे मेकअप ट्रेंड्स फॉलो करताना, ते स्टेप बाय स्टेप करण्यावर अनेक महिलांचा भर असतो. मात्र, अनेकदा मेकअप करूनही चेहरा हा निस्तेज दिसतो. हे असे का होते? असा प्रश्न ही महिलांना पडतो.

खरं तर मेकअप लूकमध्ये तुमच्या डोळ्यांचा मेकअप हा सर्वात जास्त महत्वाचा ठरतो. जर तुम्ही डोळ्यांचा मेकअप व्यवस्थित केला नसेल, तर मग कदाचित तुमचा चेहरा डल किंवा निस्तेज दिसू शकतो. परंतु, आता तुम्ही चिंता करू नका, कारण आज आम्ही तुम्हाला काही मेकअप टीप्स देणार आहोत. ज्यांच्या मदतीने तुमचा मेकअप लूक आणखी सुंदर दिसू शकतो.

असा करा डोळ्यांचा मेकअप

डोळ्यांचा मेकअप करताना अनेक महिला केवळ काजळ, आयलायनर आणि मस्कारावर भर देतात. मात्र, यासोबचतच तुम्ही आयशॅडोजचा ही वापर करायला हवा. या सर्व मेकअप टिप्स फॉलो करूनही जर तुमचा चेहरा निस्तेज दिसत असेल तर तुमच्या डोळ्यांचा मेकअप योग्य प्रकारे डिफाईन करणे, महत्वाचे आहे.

यासाठी तुम्ही वॉटरलाईन आणि डोळ्यांच्या अप्पर लॅश लाईनवर टाईट लायनिंग करण्याचा प्रयत्न करा. यासाठी तुम्ही काजळ पेन्सिलचा ही वापर करू शकता.

डोळ्यांचा बोल्ड लूक आहे महत्वाचा

जर तुम्हाला तुमच्या डोळ्यांना बोल्ड लूक द्यायचा असेल तर, डोळ्यांवर काळ्या रंगाचा वापर करताना योग्य ती काळजी घ्या. कारण, डोळ्यांवर काळ्या रंगाचे मेकअप प्रॉडक्ट्स वापरताना थोडी जरी चूक झाली तर तुमचा मेकअप लूक पूर्णपणे खराब दिसू शकतो. यासाठी काजळ पेन्सिलचा वापर हा डोळ्यांच्या पापण्यांवर करताना स्मजर ब्रशची मदत घ्या.

यासोबतच डार्क ब्राऊन कलरने डोळ्यांजवळ ब्लेंड करा. यामुळे, तुमच्या डोळ्यांना सुंदर बोल्ड लूक मिळण्यास मदत होईल. यात काही शंका नाही. डोळ्यांना बोल्ड लूक मिळाल्यामुळे तुमचा चेहरा आणखी खुलून दिसेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नगराध्यक्षांची निवड जनतेतूनच! दिवाळीतच वाजणार निवडणुकांचा बिगुल; पहिल्या टप्प्यात नगरपालिका किंवा झेडपी, पंचायत समित्यांची निवडणूक

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा हेल्दी एग रोल, पाहा रेसिपीचा Video

आजचे राशिभविष्य - 03 ऑक्टोबर 2025

अग्रलेख : अस्वस्थ स्वातंत्र्ययोद्धा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 03 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT