Mehandi Designs 2024  esakal
लाइफस्टाइल

Mehandi Designs 2024 : नव्या वर्षात 'या' मेहंदी डिझाईन्स राहणार ट्रेंडिंगमध्ये

मेहंदी हा महिलांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा आणि प्रेमाचा विषय आहे. कोणताही आनंदी प्रसंग असुद्या. मग, तो सण असेल, लग्न असेल किंवा कोणताही आनंदी प्रसंग त्या दरम्यान स्त्रिया स्वत:चा श्रृंगार करायला अधिक प्राधान्य देतात.

Monika Lonkar –Kumbhar

Mehandi Designs 2024 : मेहंदी हा महिलांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा आणि प्रेमाचा विषय आहे. कोणताही आनंदी प्रसंग असुद्या. मग, तो सण असेल, लग्न असेल किंवा कोणताही आनंदी प्रसंग त्या दरम्यान स्त्रिया स्वत:चा श्रृंगार करायला अधिक प्राधान्य देतात. या श्रृंगारामध्ये मेहंदीला अतिशय महत्वाचे स्थान आहे.

मेहंदीशिवाय महिलांचा श्रृंगार पूर्ण होत नाही, असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. लग्न आणि इतर कार्यक्रमांमध्ये महिला आवर्जून हातांवर मेहंदी काढतात. या नव्या वर्षात देखील भरपूर सणांची आणि लग्नसोहळ्यांची धामधूम असणार आहे. या वर्षात कोणत्या मेहंदी डिझाईन्स ट्रेंडमध्ये राहणार? त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

मोटिफ मेहंदी डिझाईन

२०२४ या नव्या वर्षात या मोटिफ मेहंदी डिझाईन्स अतिशय ट्रेंडमध्ये असणार आहेत. कारण, २०२३ च्या अखेरीपासूनच या प्रकारच्या मेहंदी डिझाईन्सला महिलांकडून पसंती मिळाली होती. त्यामुळे, या वर्षात तर या मेहंदी डिझाईनचा ट्रेंड राहणार यात काही शंका नाही.

मोटिफ मेहंदी डिझाईन

हेव्ही मेहंदी डिझाईन्सला उत्तम पर्याय म्हणून या प्रकारच्या मेहंदी डिझाईनची तुम्ही निवड करू शकता. ही मोटिफ मेहंदी डिझाईन हातांवर लावल्यानंतर तुमचे हात सुंदर दिसतील आणि यातील युनिक डिझाईनमुळे सर्वांचे लक्ष वेधले जाईल.

कमळ मेहंदी डिझाईन

कमळ या फूलाला हिंदू धर्मात अतिशय महत्वाचे स्थान आहे. कमळाला अतिशय पवित्र मानले जाते. कोणत्याही सणाच्या वेळी किंवा लग्नाला तुम्ही या प्रकारची कमळाची डिझाईन असलेली मेहंदी काढली तर तुमचे हात सुंदर दिसतील. शिवाय, हातांवरील मेहंदी रंगल्यानंतर तुमच्या हातांवरील ही डिझाईन अधिक खुलून दिसेल.

कमळ मेहंदी डिझाईन

कमळ मेहंदीमध्ये तुम्हाला अनेक प्रकारच्या डिझाईन्स मिळतील आणि या मेहंदीच्या डिझाईन्ससोबत तुम्ही नेट, बेल किंवा चेन डिझाईनचा वापर करू शकता.

सुंदर मेहंदी डिझाईन

सुंदर मेहंदी डिझाईन हा एक प्रकार आजकालच्या महिलांना प्रचंड आवडू लागला आहे. या प्रकारच्या मेहंदी डिझाईनमध्ये मिक्स डिझाईन्सचे प्रकार पहायला मिळतात. त्यामुळे, याला सुंदर मेहंदी डिझाईन म्हटले जाते.

सुंदर मेहंदी डिझाईन

या मेहंदीमध्ये कपड्यांवरील प्रिंटचा ही अनोख्या पद्धतीने वापर केला जातो, त्यामुळे, रंगल्यानंतर ही मेहंदी अजून खास दिसते. या मेहंदीचे स्वरूप काहीसे इराणी मेहंदीसारखे असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT