Tea For Headache  esakal
लाइफस्टाइल

Tea For Headache : डोकेदुखीमुळे त्रस्त आहात? मग, प्या 'हे' खास प्रकारचे चहा, मिळेल आराम

Tea For Headache : डोकेदुखी ही खरं तर एक सामान्य समस्या आहे. ही समस्या अनेक कारणांमुळे उद्भवू शकते. आपण बऱ्याचदा या समस्येला सामोरे जातो.

Monika Lonkar –Kumbhar

Tea For Headache : डोकेदुखी ही खरं तर एक सामान्य समस्या आहे. ही समस्या अनेक कारणांमुळे उद्भवू शकते. आपण बऱ्याचदा या समस्येला सामोरे जातो. रोजची कामावर जाण्याची धावपळ, नातेसंबंध, करिअर, अभ्यास आणि पैशांची चिंता इत्यादी कारणांमुळे डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.

या डोकेदुखीमुळे अनेकांची झोप उडते. त्यामुळे, यावर वेळीच उपचार नाही केले, तर ही डोकेदुखी आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. ही डोकेदुखी दूर करण्यासाठी मग, अनेकजण औषधे आणि गोळ्यांचा आधार घेतात. ज्यामुळे, तुम्हाला तात्पुरता फरक पडतो.

मात्र, वारंवार यावर गोळ्या-औषधे घेतल्याने याचे दुष्परिणाम देखील होऊ शकतात. डोकेदुखीची ही समस्या दूर करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायांची मदत घेऊ शकता. आज आम्ही तुम्हाला अशाच काही खास चहांबद्दल सांगणार आहोत. जे प्यायल्याने तुमची डोकेदुखीपासून सुटका होऊ शकते. कोणते आहेत हे चहा? चला तर मग जाणून घेऊयात.

आल्याचा चहा

आल्यामध्ये मोठ्या प्रमाणात अँटी-इंफ्लेमेंटरी गुणधर्म आढळून येतात. ज्यामुळे, आपली डोकेदुखी दूर होण्यास मदत होऊ शकते. जेव्हा तुम्हाला डोकेदुखीचा त्रास जाणवेल तेव्हा, हा आल्याचा गरमागरम चहा अवश्य प्या. यामुळे, तुम्हाला आराम मिळेल आणि तणाव दूर होण्यास मदत होईल. (Ginger Tea)

लव्हेंडर टी

लव्हेंडर टी चा सुगंध हा तुमचा ताण-तणाव दूर करण्यास मदत करतो. त्यामुळे, या चहाचे सेवन केल्याने, तुमचे मन शांत राहते आणि डोकेदुखीपासून तुम्हाला आराम देखील मिळतो. त्यामुळे, डोकेदुखीचा त्रास संभवल्यास हा लव्हेंडर टी अवश्य प्या. (Lavender Tea)

कॅमोमाईल टी

कॅमोमाईल हा अँटीऑक्सिडंट्सचा समृद्ध स्त्रोत आहे. त्यामुळे, याचा चहा देखील आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. या चहामध्ये असे गुणधर्म आढळून येतात. जे आपली डोकेदुखी, ताण-तणावाची सुट्टी करतात आणि आपल्याला आराम मिळवून देतात.

हा चहा प्यायल्याने आपले मन शांत राहते आणि आपल्याला चांगली झोप देखील लागते. त्यामुळे, जर तुम्हाला ताण-तणावाची समस्या किंवा डोकेदुखीची समस्या भेडसावत असेल, तेव्हा या कॅमोमाईल टी चे अवश्य सेवन करा. यामुळे, तुम्हाला आराम मिळेल, यात काही शंका नाही. (Chamomile Tea)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Himalayan Climate Change: हिंदुकुश हिमालयात हिमसाठ्यात घट; सलग चौथ्या वर्षी नीचांक, गंगा खोऱ्यात मात्र बर्फाचे प्रमाण अधिक..

Shahuwadi Crime News : शाहूवाडीत धक्कादायक प्रकार! लग्नाचे आमिष दाखवून वसीमने ५ वर्षे अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार

शक्तिपीठ महामार्गामुळे दर वाढणार, जमीन खरेदी करायला लावून फसवणूक; खरातचा स्वत:च्या CAलाच पावणेनऊ कोटींचा गंडा

AI and post‑2000 era : दोन हजारोत्तरी काळ, डिजिटल क्रांती आणि एआयचा उदय; बदलत्या जगातल्या आपल्या जाणिवांचा वेध

Facebook Fraud Marriage : फेसबुकवरून ओळख, अनाथ मुलीशी लग्न लावून देण्याचा विश्वास; रायगडचे कुटुंब कोल्हापुरात आलं अन् घडलं भलतचं...

SCROLL FOR NEXT