Spinach face packs esakal
लाइफस्टाइल

Spinach face packs : थंडीमध्ये त्वचा कोरडी पडलीय? पालक आहे मदतीला! जाणून घ्या ‘हे’ फेसपॅक्स

थंडीमध्ये आहारासोबतच त्वचेची आणि केसांची देखील खास काळजी घ्यावी लागते.

Monika Lonkar –Kumbhar

Spinach face packs for skin : देशभरात आता कडाक्याच्या थंडीला सुरूवात झाली आहे. या थंडीच्या दिवसांमध्ये आहारासोबतच त्वचेची आणि केसांची देखील खास काळजी घ्यावी लागते. हिवाळ्यामध्ये पालक ही पालेभाजी मार्केटमध्ये सहज उपलब्ध होते.

पालकची भाजी ही आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी अतिशय फायदेशीर मानली जाते. थंडीमध्ये पालकचे सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी लाभदायी असते. पालकमध्ये मोठ्या प्रमाणात पोषकघटकांचा समावेश आढळून येते. त्यामुळे, आरोग्यासोबतच पालकचे त्वचेसाठी देखील अनेक फायदे आहेत.

पालकमुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. थंडीमध्ये त्वचा अनेकदा कोरडी पडते. ही समस्या दूर करण्यासाठी तुम्ही पालकची मदत घेऊ शकता आणि पालकचा फेसपॅक त्वचेवर लावू शकता. चला तर मग जाणून घेऊयात त्वचेसाठी फायदेशीर असणाऱ्या पालकचे फेसपॅक्स कोणते ?

पालक आणि दूध

पालकची काही पाने घ्या. ती स्वच्छ धुवा आणि मिक्सरमध्ये त्या पानांची बारीक पेस्ट तयार करा. आता या पेस्टमध्ये २ चमचे दूध आणि १ चमचा मध मिसळा. आता हे संपूर्ण मिश्रण एकत्र करा, तुमचा फेसपॅक तयार आहे. हा फेसपॅक चेहऱ्यावर १५ मिनिटे लावा आणि नंतर चेहरा धुवून टाका. या फेसपॅकमुळे त्वचा हायड्रेट राहण्यास मदत मिळेल आणि त्वचेवर छान ग्लो येईल.

पालक, हळद आणि चंदन

हा फेसपॅक तयार करण्यासाठी पालकाची काही पाने धुवून घ्या. ही पाने मिक्सरमधये बारीक करा त्याची छान पेस्ट तयार करा. या पेस्टमध्ये १ चमचा हळद आणि चंदन मिसळा आता तुमचा फेसपॅक तयार आहे. हा फेसपॅक चेहऱ्यावर १५ मिनिटे ठेवा. त्यानंतर, चेहरा धुवा. या फेसपॅकमुळे पुरळांची आणि काळ्या डागांची समस्या दूर होण्यास मदत होऊ शकेल.

पालक आणि बेसन

पालकची ४-५ पाने धुवून घ्या. या पानांची बारीक पेस्ट तयार करा. या पेस्टमध्ये २ चमचे बेसन, १ चमचा लिंबाचा रस आणि २ चमचे मध आणि चिमूटभर हळद त्यात मिसळा. हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करा आणि चेहऱ्यावर १५-२० मिनिटांसाठी हा फेस पॅक लावा. त्यानंतर, कोमट पाण्याने चेहरा धुवा. या फेसपॅकमुळे चेहऱ्यावर ग्लो येण्यास मदत होईल आणि चेहरा हायड्रेटेड राहिल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शक्तीचा महाराष्ट्राच्या किनारपट्टीला धोका नाही, पण मराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता; IMDने दिला इशारा

Crime News: अमेरिकेतील डल्लासमध्ये भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या; हैदराबादच्या चंद्रशेखर पोलच्या मृत्यूने भारतात हळहळ

Latest Marathi News Live Update: पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर, ८ प्रभागांची नावे बदलली

Sakal Premier League : 5 नोव्हेंबरपासून 'सकाळ प्रिमिअर लीग'चा थरार; विजेत्या संघाला तीन लाखांचा पुरस्कार, ३२ संघ होणार सहभागी

PMC Elections : कोठे तक्रारींची दखल; कोठे राजकीय सोय, अंतिम प्रभागरचना जाहीर; इच्छुकांच्या नजरा आरक्षणाच्या सोडतीकडे

SCROLL FOR NEXT