Travel Tips esakal
लाइफस्टाइल

Travel Tips : सोलो ट्रिपला जाताय? मग, 'या' गोष्टी बॅगेत पॅक करायला विसरू नका

फिरायला जायला तर सगळ्यांनाच आवडते. मात्र, तुम्ही कधी एकटे फिरायला गेले आहात का? सोलो ट्रिपला जाण्याची एक वेगळीच मजा असते.

Monika Lonkar –Kumbhar

Travel Tips : फिरायला जायला तर सगळ्यांनाच आवडते. मात्र, तुम्ही कधी सोलो ट्रिपला गेले आहात का? सोलो ट्रिपला जाण्याची एक वेगळीच मजा असते. आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत की, ज्यांना एकटे फिरायला आवडते. हे लोक स्वत:ची मस्त कंपनी एंन्जॉय करतात.

जेव्हा तुम्ही एकटे फिरायला जाता, तेव्हा आसपासचा परिसर एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची संधी तुम्हाला मिळते. यासोबतच तुम्ही बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टींचा आनंद देखील घेऊ शकता आणि काही साहसी गोष्टी ही करू शकता.

मात्र, जेव्हा तुम्ही एकटे फिरायला जाता तेव्हा, त्या ट्रिपची संपूर्ण तयारी तुम्हाला करावी लागते. खास करून बॅग पॅकिंग करणे. जेव्हा तुम्ही एकटे फिरायला जाता तेव्हा, बॅगेत कोणत्या महत्वाच्या गोष्टी पॅक कराव्यात याची माहिती तुम्हाला असायला हवी.

जेणेकरून प्रवासादरम्यान तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागणार नाही. आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला सोलो ट्रिपला गेल्यावर बॅगेत कोणत्या महत्वपूर्ण गोष्टी पॅक कराव्यात? त्याबद्दल सांगणार आहोत.

महत्वाच्या कागदपत्रांची झेरॉक्स

जेव्हा तुम्ही एकटे फिरायला जाता, तेव्हा तुम्हाला तुमच्या वैयक्तिक ओळखपत्राची गरज केव्हाही पडू शकते. त्यामुळे, प्रवासात महत्वाच्या कागदपत्रांची झेरॉक्स सोबत ठेवायला विसरू नका. एखादा फोटो, आधारकार्डाची झेरॉक्स किंवा इतर महत्वाच्या कागदपत्रांची एक प्रत नक्की सोबत ठेवा. यासोबतच या कागदपत्रांच्या सॉफ्ट कॉपीज तुमच्या फोन आणि ई-मेलमध्ये जरूर ठेवाव्यात. कारण, याची तुम्हाला कधी ही गरज पडू शकते.

सेफ्टी किट

जर तुम्ही सोलो ट्रिपला जात असाल तर बॅग पॅकिंग करताना सोबत सेफ्टी किट ठेवायला विसरू नका. हे सेफ्टी किट तुमच्या प्रवासातील सुरक्षिततेसाठी अतिशय महत्वाचे आहे. या सेफ्टी किटमध्ये तुम्ही ट्रॅव्हल लॉकपासून ते टॉर्च, कात्री, फोन चार्जर, शिट्टी आणि चिकटपट्टी, पेन, डायरी नक्की सोबत ठेवा.

या गोष्टी तुम्हाला ट्रीपदरम्यान सुरक्षित ठेवायला मदत करतात आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी मदत करतात. त्यामुळे, तुमच्या ट्रॅव्हल बॅगमध्ये हे सेफ्टी किट ठेवायला विसरू नका.

आवश्यक औषधे

जेव्हा तुम्ही एकटे फिरायला जाता, तेव्हा तुम्ही तुमच्या आरोग्याची देखील काळजी घेणे महत्वाचे आहे. प्रवासादरम्यान काही आरोग्याच्या समस्या उद्भवल्यास तिथे लगेच दवाखाना किंवा मेडिकल उपलब्ध असेलच याची काही खात्री नसते. त्यामुळे, तुमच्यासोबत आवश्यक औषधांचे किट नक्की ठेवा.

बॅग पॅकिंग करताना हे किट ठेवायला विसरू नका. यामध्ये तुम्हाला आवश्यक वाटणारी औषधे आणि गोळ्या तुम्ही सोबत ठेवू शकता. जेणेकरून तुम्हाला तुमची काळजी घेणे सोपे जाईल आणि  तुम्ही प्रवासाचा आनंद देखील घेऊ शकाल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Crime : तुकाराम मुंढेंचा सर्वात मोठा दणका! संभाजीनगर शॉक; प्रसिद्ध 'आईच्या गावात' अन् 'यल्ला यल्ला' हॉटेलला टाळे

Women T20 World Cup : भारतीय संघात बदलाचे वारे; वर्ल्ड कप अपयशानंतर वेगवान हालचाली!

Latest Marathi News Live Update : रत्नागिरी-पावसाचा आजपासून तीन दिवस आँरेज अलर्ट

Petrol-Diesel Price: Nayara नंतर सरकारी कंपन्यांचे आजचे दर जाहीर! महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल आता किती रुपयांना?

Lohagad Fort : लोहगड किल्ल्याची बदनामी थांबवावी; स्थानिक नागरिकांसह शिवप्रेमींची मागणी

SCROLL FOR NEXT