सध्याच्या काळात प्रत्येक जण फिटनेस फ्रीक असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे अनेक जण नियमितपणे व्यायाम करतात. सोबतच काही जण ठराविक डाएटदेखील फॉलो करतात. मात्र, बऱ्याचदा काही कारणास्तव वर्कआऊट करण्यात खंड पडतो. विशेष म्हणजे एकदा या वर्कआऊटमध्ये गॅप पडला की पुन्हा व्यायाम करताना अनेक अडचणी येतात. यात कंटाळा येणं, शरीर व्यवस्थितरित्या साथ न देणं अशा समस्या निर्माण होतात. त्यामुळेच मोठ्या गॅपनंतर पुन्हा वर्कआऊट करत असला तर काही नियम पाळणं गरजेचं आहे. हे नियम कोणते ते पाहुयात. (these things when you start exercising after long break health)
१. आळस झटका -
मोठ्या गॅपनंतर कोणत्याही कामात ठराविक काळाचा गॅप पडल्यानंतर ते काम पुन्हा करताना प्रचंड कंटाळा येतो. परंतु, जर तुम्हाला फिट व्हायचं असेल तर हा आळस झटकून टाकावा लागेल. अनेक जण सुरुवातीच्या काळात कंटाळा करतात ज्यामुळे काम करण्याचा उत्साह निघून जातो. मात्र, हळूहळू व्यायाम करायला सुरुवात करा. ज्यामुळे पुढे कंटिन्यू व्यायाम करणं तुम्हाला शक्य होईल.
२. योगासने -
कोणत्याही प्रकारचा व्यायाम सुरु करण्यापूर्वी तुमचं मानसिक स्थैर्य असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे व्यायाम सुरु करण्यापूर्वी २० मिनिटे योगासने करा. तसंच सुरुवातीच्या काळात अवघड व्यायाम केला तर त्याचा शरीरावर ताण येऊ शकतो. त्यामुळे सुरुवात लहान लहान योगासनांपासून करा.
३. आहार-
पुन्हा एकदा व्यायाम सुरु केल्यानंतर तुमच्या आहारातदेखील काही बदल करावे लागतात. यात फिटनेस रिझल्ट लवकर हवा असेल तर आहारात डाएट फूड, ज्युस, पालेभाज्या यांचा समावेश करण्यास सुरुवात करा.
४. संयम-
कोणतीही गोष्ट एका रात्रीत घडत नसते. त्यामुळे फिटनेस मिळवण्यासाठीही थोडा संयम ठेवा. एखाद्या दिवशी व्यायाम केल्यावर तुम्ही लगेच बारीक किंवा जाड होणार नाही. त्यासाठी तुम्हाला काही महिने मेहनत घ्यावी लागेल. त्यानंतरच तुम्हाला अपेक्षित असलेला रिझल्ट मिळेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.