Parenting Tips  esakal
लाइफस्टाइल

Parenting Tips : वारंवार समजावून देखील मुले वाद घालतात?मग, 'या' ट्रिक्सचा वापर करून मुलांना लावा वळण

अनेकदा पालकांच्या अतिलाडामुळे मुले जास्त हट्टी आणि जिद्दी होतात.

Monika Lonkar –Kumbhar

Parenting Tips : आपला मुलगा किंवा मुलगी हे समजूतदार असावेत. असे प्रत्येक पालकाला वाटत असते. त्यासाठी, मुलांना योग्य वळण आणि मुलांना योग्य संस्कार देण्याचे काम पालक करत असतात.

मात्र, अनेकदा पालकांच्या अतिलाडामुळे मुले जास्त हट्टी आणि जिद्दी होतात. मग, कोणत्याही गोष्टीवरून वाद घालणे? चिडचिड करणे आणि उगाचच रडणे अशा गोष्टींवरून घरात वाद निर्माण होतो.

अशावेळी मग त्यांना कसे शांत करावे? त्याला आणि तिला कसे समजावून सांगावे? असा प्रश्न पालकांना पडतो.

अनेकदा तर किती वेळा जरी समजावून सांगितले तरी देखील मुले ऐकत नाहीत. अशामुळे घरातील वातावरण ही बिघडते. मुलांना समजावण्यासाठी आणि त्यांना योग्य वळण लावण्यासाठी काही ट्रिक्स आज आम्ही सांगणार आहोत.

चिडचिडेपणा होण्यामागचे कारण जाणून घ्या

कधीकधी मुलांना ज्या गोष्टींचा त्रास होतो किंवा ज्या गोष्टींमुळे त्रास होतो, ते त्यांच्या चिडण्यामागचे कारण नसते. अनेकदा काही शारीरीक आणि मानसिक समस्यांमुळे देखील मुलांचा चिडचिडेपणा वाढतो.

त्यांना या गोष्टींचा त्रास होतो आणि त्या भावना व्यक्त करता येत नसल्यामुळे ही मुलांची चिडचिड वाढू शकते, हे पालकांनी लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे, अशा परिस्थितीमध्ये पालकांनी मुलांच्या चिडण्यामागचे खरे कारण आहे? ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

मुलांसोबतचे नाते घट्ट करा

मुलांसोबतचे नाते घट्ट करण्यासाठी मुलांना पुरेसा वेळ देणे महत्वाचे आहे. पालकांनी मुलांसोबत संवाद साधायला हवा, त्यांच्या आवडीचे खेळ खेळायला हवेत. या गोष्टींमुळे मुलांमधील हट्टीपणा, चिडचिडेपणा कमी होण्यास मदत होते, आणि मुलांचे पालकांसोबतचे नाते घट्ट होते.

मुलांची प्रत्येक डिमांड पूर्ण करू नका

मुलांना एखादी गोष्ट हवी असल्यास ते त्याची डिमांड पालकांकडे करू लागतात. त्या गोष्टीचा हट्ट धरतात आणि रडतात. अशावेळी पालकांनी त्यांच्यावर लगेच चिडता कामा नये. अशा परिस्थितीमध्ये मुलांना काहीवेळ एकटे सोडा, त्यांच रडण थांबल्यावर ते शांत झाल्यावर पालकांनी त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे.

तसेच, ती गोष्ट तुला नाही मिळू शकत ती का गरजेची नाही किंवा ती नंतर तुला मिळेल याबद्दल मुलांना समजावून सांगण्याचा प्रयत्न पालकांनी करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT