Keratin Hair Treatment esakal
लाइफस्टाइल

Keratin Hair Treatment : केराटिन ट्रीटमेंटनंतर केसगळती वाढलीय? मग, फॉलो करा 'या' टिप्स

Keratin Hair Treatment : ही ट्रीटमेंट केल्यानंतर काही काळ तुमचे केस सरळ, चमकदार आणि दाट दिसतात. मात्र, दीर्घकाळापर्यंत तुम्हाला याचे अनेक दुष्परिणाम देखील दिसू शकतात.

Monika Lonkar –Kumbhar

Keratin Hair Treatment : आजकाल केसांवर विविध प्रकारच्या ट्रीटमेंट्स केल्या जातात. जगभरातील महिलांचा हेअर ट्रीटमेंट करण्यावर मोठ्या प्रमाणात भर दिसून येतोय. चमकदार आणि स्मूथ केसांसाठी तरूणी या ट्रीटमेंट्सवर हजारो पैसे खर्च करतात. केराटिन, स्मूथनिंग आणि स्ट्रेटनिंगसारख्या केसांच्या ट्रीटमेंट्सचा जणू आता ट्रेंडच आला आहे. या ट्रीटमेंटची मागणी देखील दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

खर तर या ट्रीटमेंट केल्यानंतर काही काळ तुमचे केस सरळ, चमकदार आणि दाट दिसतात. मात्र, दीर्घकाळापर्यंत तुम्हाला याचे अनेक दुष्परिणाम देखील दिसू शकतात. या दुष्परिणामांपैकी सर्वात सामान्य म्हणजे मोठ्या प्रमाणात केस गळती होण्याची समस्या होय.

केराटिन हेअर ट्रीटमेंट केल्यानंतर महिलांचे केस मोठ्या प्रमाणात गळतात. तुम्ही देखील या समस्येने त्रस्त असाल तर आज खास तुमच्यासाठी आम्ही काही टिप्स सांगणार आहोत. या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला केसगळतीवर नियंत्रण मिळवता येईल.

ओल्या केसांवर ब्रश किंवा कंगवा फिरवू नका

केराटिन ट्रीटमेंट केलेल्या केसांची खास काळजी घेणे गरजेचे आहे. जर तुमचे केस ओले असतील तर त्यावर कोणत्याही ब्रश किंवा कंगव्याचा वापर करणे टाळा. यामुळे, केस अधिक तुटण्याची शक्यता असते.

कारण, केराटिन ट्रीटमेंट केल्यामुळे तुमचे केस पूर्वीपेक्षा नाजूक आणि कमकुवत झालेले असतात. त्यामुळे, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही सर्वात आधी केस व्यवस्थित कोरडे करून घ्या. त्यानंतर, केसांवर कंगवा फिरवा. यामुळे, केस तुटण्याचे प्रमाण कमी होईल आणि केसगळती नियंत्रणात राहील.

हिटिंग टूल्स पूर्णपणे टाळा

केसांना स्टाईल करण्यासाठी वापरले जाणारे हिटिंग टूल्स जसे की, ब्लो ड्रायर, कर्लिंग, स्ट्रेटनर इत्यादी हिटिंग टूल्सचा केसांवर वापर करणे टाळा. यामुळे, तुमचे केस जास्त कोरडे होतील आणि तुटतील. त्यामुळे, या साधनांचा वारंवार वापर करणे पूर्णपणे टाळा. या हिटिंग टूल्सचा वापर केल्याने तुमचे केस अधिक कमकुवत होतात आणि केस मोठ्या प्रमाणात गळतात.

जेव्हा तुम्ही केसांवर केराटिन, स्मूथनिंग करता, तेव्हा केस जास्त गरम होण्याच्या प्रक्रियेतून जातात. ज्यामुळे, केसांचे अधिक नुकसान होते, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही केराटिन ट्रीटमेंटनंतर केसांवर हिटिंग टूल्सचा वापर करू नये. जर हे तुम्ही फॉलो केले तर केसगळती नियंत्रणात येण्यास मदत होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड पोलिसांच्या कारखाली अन्... विधानभवनात मध्यरात्री रंगले अटकनाट्य

Purandar Airport : पुरंदर विमानतळासाठी पॅकेज निश्‍चित; संमतीने जागा देणाऱ्यांना दहा टक्के भूखंड आणि चारपट रक्कम

Satara Accident: 'कांबिरवाडीतील अपघातात वाण्याचीवाडीचा दुचाकीस्वार ठार'; डंपरला पाठीमागून दुचाकीची जाेरदार धडक

Deepti Sharma: दीप्ती शर्माचे निर्णायक अर्धशतक; पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा इंग्लंडवर विजय

Robbery gang Arrested : 'पर्यटकांना लुटणारी टोळी जेरबंद'; फलटण ग्रामीण पोलिसांकडूनअवघ्या आठ तासांत पर्दाफाश

SCROLL FOR NEXT