Hair Care Tips esakal
लाइफस्टाइल

Hair Care Tips : हिवाळ्यात लांब केसांची काळजी घेण्यासाठी 'या' टिप्स करा फॉलो

हिवाळ्यात केस अधिक कोरडे आणि फ्रिझी होतात.

Monika Lonkar –Kumbhar

Hair Care Tips : हिवाळा सुरू झाला की आपल्याला आरोग्याची खास काळजी घ्यावी लागते. देशातील अनेक भागांमध्ये आता कडाक्याची थंडी सुरू झाली आहे. त्यामुळे, सर्दी, खोकला, तापासोबत डेंग्यूच्या समस्या देखील वाढल्या आहेत.

थंडीच्या दिवसांमध्ये आरोग्यासोबत आपण आपल्या केसांची आणि त्वचेची देखील खास काळजी घेणे गरजेचे आहे. या दिवसांमध्ये केस अधिक कोरडे आणि फ्रिझी होतात. त्यामुळे, केसांमध्ये अधिक गुंता होण्याची शक्यता निर्माण होते.

जर तुमचे केस लांब असतील तर हिवाळ्यात केसांची खास काळजी तुम्ही घ्यायला हवी. आज आम्ही तुम्हाला खास लांब केसांसाठी फायदेशीर असणाऱ्या हेअर केअर टीप्स सांगणार आहोत.

कोरफड जेलचा करा वापर

कोरफड ही आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी अतिशय फायदेशीर आहे. कोरफडमध्ये अनेक पोषकघटकांचा समावेश आढळून येतो. त्यामुळे, कोरफडचा वापर केल्याने आपले केस आणि त्वचा मुलायम होते. शिवाय, केसांना छान चमक देखील मिळते.

कोरफड जेलचा उपाय करण्यासाठी एका बाऊलमध्ये तुमच्या केसांच्या अंदाजानुसार कोरफडीचा गर घ्या किंवा मार्केटमध्ये मिळणारी कोरफड जेल घ्या. (Use aloe vera gel)

त्यानंतर, बोटांच्या मदतीने स्काल्पमध्ये आणि केसांना ही कोरफड जेल लावा. त्यानंतर, २०-२५ मिनिटे मसाज करा. त्यानंतर, अर्ध्या तासासाठी केस तसेच ठेवा. त्यानंतर, तुमच्या आवडत्या शॅंम्पूच्या मदतीने केस धुवून टाका.

केस धुतल्यानंतर केस बिलकुल ड्रायरच्या मदतीने सुकवू नका, असे केल्याने केस अधिक कोरडे होण्याची शक्यता असते.

लाभदायी आवळा

आवळ्याला सुपरफूड असे म्हटले जाते, कारण आवळ्यामध्ये भरपूर पोषकघटकांचा समावेश आढळून येतो. आवळ्याचा आहारात समावेश केल्याने केस लांब आणि घनदाट होण्यास मदत होते. (Beneficial amla)

शिवाय, आवळा खाल्ल्याने पांढऱ्या केसांची समस्या दूर होते. कारण, आवळ्यात व्हिटॅमीन सी सारखे घटक आढळून येतात. जे केसांसाठी अतिशय लाभदायी असतात. त्यामुळे, केसांच्या समस्या दूर करण्यासाठी आवळ्याचा वापर नेहमी केला जातो.

आवळ्याचा केसांसाठी उपाय करण्यासाठी आवळा मिक्सरला बारीक करून त्याची पावडर करून घ्या. आता या पावडरमध्ये नारळाचे तेल मिसळा. या मिश्रणाची चांगली पेस्ट तयार करून ती केसांना लावा.

३०-३५ मिनिटानंतर शॅंम्पूच्या मदतीने केस धुवून टाका. अधिक चांगल्या उपायांसाठी हा उपाय आठवड्यातून २ वेळा नक्की करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT