parenting tips esakal
लाइफस्टाइल

Parenting Tips : मुले सुस्त झाली आहेत? अ‍ॅक्टिव्ह बनवण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

बाहेर खेळायला जाण्यापेक्षा मुले मोबाईलमध्ये गेम खेळण्यात व्यस्त झाली आहेत.

Monika Lonkar –Kumbhar

Parenting Tips : मुलांचे आरोग्य आणि त्यांची जीवनशैली यांबद्दल अनेक पालक चिंतेत असतात. मागील काही वर्षांमध्ये मोबाईल आणि इंटरनेटचे जाळे विस्तारल्यामुळे अनेक मुलांना मोबाईलची वाईट सवय लागली आहे. बाहेर खेळायला जाण्यापेक्षा मुले मोबाईलमध्ये गेम खेळण्यात व्यस्त झाली आहेत. ही अतिशय चिंतेची बाब आहे त्यामुळे, पालकांना काळजी वाटणे स्वभाविक आहे.

परंतु, अशा काही फन अ‍ॅक्टिव्हिटीज आहेत, ज्यामुळे तुमची मुले देखील अ‍ॅक्टिव्ह होण्यास मदत होईल. या अ‍ॅक्टिव्हिटीजमुळे मुलांचा व्यायाम ही होईल आणि त्यांची जीवनशैली बदलण्यास मदत ही होईल.

आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्सबद्दल सांगणार आहोत. ज्यामुळे, तुमची मुले अ‍ॅक्टिव्ह होण्यास मदत मिळेल. चला तर मग जाणून घेऊयात त्या टिप्स.

स्किपिंग

तुमचा मुलगा किंवा मुलीला ५ वर्षे पूर्ण झाली असतील किंवा ५ वर्षांपेक्षा जास्त वय असेल तर त्यांना दोरीच्या उड्या मारायला आवडेल. दोरीच्या उड्या अर्थात स्किपिंग हा एक चांगला व्यायाम प्रकार देखील आहे.

स्किपिंग केल्यामुळे मुलांची उंची वाढण्यास मदत होते आणि मुलांमध्ये उत्साह देखील संचारतो. स्नायू आणि हाडांच्या बळकटीसाठी स्किपिंग करणे ही एक चांगली अ‍ॅक्टिव्हिटी आहे. यामुळे, मुले अ‍ॅक्टिव्ह होण्यास मदत मिळेल.

स्विमिंग

स्विमिंग करायला अनेक मुलांना आवडते. पाण्यात खेळायला आणि पाण्यात पोहायला मुलांचा क्वचितच नकार असतो. त्यामुळे, तुमच्या मुलांना जर पोहण्याची आवड असेल तर त्यांना नक्कीच स्विमिंगच्या क्लासला लावा, किंवा त्यांना पोहायला शिकवा. पोहणे हा एक चांगला व्यायामप्रकार देखील आहे. स्विमिंगमुळे स्नायूंना बळकटी मिळण्यास मदत होते आणि शरीराचा चांगला व्यायाम होतो.

ट्रेकिंग

मोकळ्या हवेत जायचे असेल तर ट्रेकिंग शिवाय दुसरा उत्तम पर्याय नाही. अनेक मुलांना ट्रेकिंगला जायला आवडते. जर त्यांना ही आवड नसेल तर पालकांनी ही आवड निर्माण करणे गरजेचे आहे. यासाठी तुम्ही एखादा छान ट्रेकिंगचा प्लॅन करा आणि मुलांना घेऊन जा.

ट्रेकिंग हा एक चांगला व्यायाम देखील आहे. मुलांचा विकेंड सेलिब्रेट करण्यासाठी ट्रेकिंग हा चांगला पर्याय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT