Parenting Tips esakal
लाइफस्टाइल

Parenting Tips : घरातून काम करताना मुलांची देखभाल करण्यासाठी फॉलो करा ‘या’ खास टिप्स

एका बाजूला घरून काम करत असताना मुलांची देखभाल आणि दुसऱ्या बाजूला घरातील कामे करताना नोकरदार महिलांची तारेवरची कसरत होते.

सकाळ डिजिटल टीम

आजकाल अनेक कंपन्यांनी ‘वर्क फ्रॉम होम’ ची सुविधा कर्मचाऱ्यांना देण्यास सुरूवात केली आहे. काही कंपन्यांमध्ये तर ही सुविधा कायम स्वरूपी करण्यात आली आहे. जर तुम्ही वर्किंग वुमन असाल आणि तुम्हाला लहान मुलगा किंवा मुलगी असेल तर तुम्हाला त्यांची देखभाल करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते.

एका बाजूला घरून काम करत असताना मुलांची देखभाल आणि दुसऱ्या बाजूला घरातील कामे करताना नोकरदार महिलांची तारेवरची कसरत होते. असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. अशावेळी मग या सर्व गोष्टी मॅनेज कशा कराव्या ? असा ही प्रश्न त्यांना पडतो.

परंतु, तुम्हाला काळजी करण्याचे कारण नाही, कारण आज आम्ही तुम्हाला ‘वर्क फ्रॉम होम’ करत असताना वर्किंग महिलांनी लहान मुलांची देखभाल कशी करावी ? याच्या काही टिप्स सांगणार आहोत.

खास टिप्स खालीलप्रमाणे -

  • सर्वात महत्वाचा टास्क म्हणजे जेवण बनवणे. तुमच्या कामाची शिफ्ट सुरू होण्यापूर्वी आणि तुमचा मुलगा-मुलगी झोपलेले असताना जेवण बनवण्याचे काम लवकर संपवा. त्यासोबतच इतर छोटी-मोठी कामे करा. मुलांना जे खायला आवडते ते खाद्यपदार्थ बनवून ठेवा. जेणेकरून नंतर तुम्हाला या कामांचा लोड येणार नाही.

  • तुमच्या मुलांना कामामध्ये सहभागी करून घ्यायला विसरू नका. कामामध्ये मुलांना गुंतवून ठेवून त्यांना जबाबदारी आणि आत्मविश्वास अनुभवण्यास तुम्ही मदत करू शकता.

  • लहान मुलांना घरातील छोटी कामे करायला द्या. जसे की, त्यांची खेळणी त्यांना जागेवर ठेवण्यास सांगा. त्यांची अभ्यासाची पुस्तके, इतर गोष्टी आवरून जागेवर ठेवण्यास तुम्ही सांगू शकता. यामुळे, मुलांना कामाचे वळण लागण्यास ही मदत होऊ शकते.

  • तुमची कामाची शिफ्ट सुरू झाल्यावर लहान मुले जर घरी असतील त्यांना शाळेला सुट्टी असेल तर काही सोपे बसून खेळण्याजोगे खेळ खेळायला त्यांना सांगा किंवा गोष्टीची पुस्तके त्यांना वाचायला द्या.

  • कॅरम, बुद्धिबळ किंवा इतर छोटे-मोठे खेळ, खेळणी किंवा चित्रे काढण्यास किंवा रंगवण्यास मुलांना सांगा. यामुळे मुलांना शिकायला ही मिळेल आणि मुले त्यामध्ये गुंतून राहतील.

  • लहान मुलांना घरातील सदस्यांसोबत आणि नातेवाईक यांच्यासोबत वेळ घालवण्याची संधी द्या. यामुळे, तुमची मुले तुम्हाला काम करताना त्रास देणार नाहीत आणि त्यांना इतरांसोबत वेळ घालवता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: थीम केक ठरला जीवघेणा! तीन वर्षांच्या चिमुकलीच्या पोटात धातूच्या पिना; ठाण्यातील खळबळजनक घटना

Satara PNG Gas: साताऱ्यात ऊर्जा क्रांती! ४०० घरांमध्ये पाइप गॅस पोहोचला, १० हजार घरांना मिळणार मोठा दिलासा

फसव्या जाहिराती, निकृष्ट दर्जा! सौंदर्यप्रसाधनांवर FDAची कारवाई; गैरप्रकार सहन केला जाणार नाही, तुकाराम मुंढेंचा इशारा

Sindhudurg Rain Update : सिंधुदुर्गकरांनो, आणखी वाट पाहावी लागणार! मॉन्सून पूर्णपणे मंदावला; पाहा पुढील 4 दिवसांचा अंदाज, शेतीची कामे रखडली

Fifa World Cup 2026 : जपानी फॅन्स मॅचनंतर स्टेडियममधील कचरा का उचलतात? त्या तरूणीनं 'Meiwaku' बद्दल सांगितलं, जाणून घ्या काय आहे ते?

SCROLL FOR NEXT