Winter Baby Care  esakal
लाइफस्टाइल

Winter Baby Care : थंडीत आजारांपासून मुलांना ठेवा दूर; 'या' टीप्सच्या मदतीने घ्या काळजी

थंडीमध्ये लहान मुलांची खास काळजी घ्यावी लागते.

Monika Lonkar –Kumbhar

Winter Baby Care : भारतात आता हळूहळू थंडी वाढली आहे. अनेक राज्यांमध्ये कडाक्याची थंडी पडली आहे. हिवाळ्यात खास करून आरोग्याची काळजी घ्यावी लागते. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व जण या दिवसांमध्ये आजारी पडतात.

सर्दी, खोकला आणि फ्लू (Cold, cough and flu) सारख्या संसर्गजन्य आजारांपासून दूर राहण्यासाठी लहान मुलांची खास काळजी घ्यावी लागते. कारण, लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते. त्यामुळे, त्यांना या आजारांची लागण लगेच होते.

थंडीच्या दिवसात लहान मुलांची खास काळजी घेण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही टीप्स सांगणार आहोत. त्या टीप्सची मदत घेऊन तुम्ही लहान मुलांची काळजी घेऊ शकता. कोणत्या आहेत त्या टीप्स? चला तर मग जाणून घेऊयात.

ऊबदार मोजे आणि वॉटरप्रूफ शूज

लहान मुलांना पायांमध्ये शूज घालायची सवय नसते. घरात किंवा आसपासच्य भागात मुले अनवाणीच खेळत असतात. अशावेळी त्यांना वॉटरप्रूफ शूज घालायला द्या. त्यांच्या पायात ऊबदार मोजे घाला. यामुळे, त्यांच्या पायांचे थंडीपासून संरक्षण होईल.

(Protection of feet from cold)

घरातही लहान मुलांच्या पायांमध्ये ऊबदार मोजे घालायला विसरू नका. घरातील फरशीवर थंडावा असतो, अशा स्थितीमध्ये जर मुले घरात मोजे न घालता वावरत असतील तर थंडाव्यामुळे मुलांना ताप येण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे, यापासून बचाव करण्यासाठी ऊबदार मोजे आणि वॉटरप्रूफ शूज मुलांना अवश्य घाला.

मल्टीपल लेअर्समध्ये मुलांना घाला कपडे

थंडीच्या दिवसात लहान मुलांची काळजी घेण्यासाठी त्यांना टी-शर्ट घालायला सांगतो आणि मग त्यावर जॅकेट किंवा स्वेटर घातले जाते. फक्त एवढचं करून त्यांची काळजी घेणे हे चुकीचे आहे. कारण, यामुळे, मुले लगेच आजारी पडण्याचा धोका असतो.

या दिवसांमध्ये लहान मुलांना मल्टीपल लेअर्समध्ये कपडे घालावेत. ज्यामुळे, त्यांचे थंडीपासून संरक्षण होईल आणि त्यांना ऊब ही मिळू शकेल. यासाठी मुलांना चार-पाच थर असलेले कपडे घालायला द्या. जेणेकरून त्यांना ऊब मिळेल आणि ते आजारी पडणार नाहीत.

(Wear clothes in multiple layers)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलने जिंकलं 'दिल'! ऐतिहासिक कामगिरी अन् इंग्लंडला न पेलवणारे लक्ष्य; भारताच्या १०००+ धावा

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

Aurangabad Murder Case : काकाच्या प्रेमात पडलेल्या महिलेने ४० लाख अन् प्लॉट हडपण्यासाठी काढला पतीचा काटा!

IND vs ENG 2nd Test: इंग्लंडच्या खेळाडूने रिषभ पंतला दाखवलं 'आमिष'; आपल्या पठ्ठ्याने काय उत्तर दिले पाहा, Viral Video

SCROLL FOR NEXT