Hair Care Tips esakal
लाइफस्टाइल

Hair Care Tips : हिवाळ्यात कलर केलेल्या केसांची अशी घ्या काळजी, फॉलो करा ‘या’ टिप्स

केस कलर केल्यानंतर केसांची योग्य प्रकारे काळजी देखील घ्यावी लागते.

Monika Lonkar –Kumbhar

Hair Care Tips : आजकाल केसांना छान लूक मिळावा यासाठी अनेक महिला आणि तरूणी केस कलर करताना दिसत आहेत. तरूणाईमध्ये तर जणू केस कलर करण्याची क्रेझच निर्माण झाली आहे. केस कलर केल्यानंतर व्यक्तिमत्वाला एक छान लूक मिळण्यास मदत होते.

मात्र, केस कलर केल्यानंतर केसांची योग्य प्रकारे काळजी देखील घ्यावी लागते. हिवाळ्याला नुकतीच सुरूवात झाली आहे आणि सणासुदीचे दिवस देखील आहेत.

जर तुम्ही या थंडीच्या दिवसांमध्ये केस कलर केले असतील तर ते कोरडे होऊ नये म्हणून काही गोष्टी फॉलो करणे गरजेचे आहे. अन्यथा केस कोरडे होण्याचा धोका नाकारता येत नाही.

आज आम्ही तुम्हाला खास कलर केलेल्या केसांसाठी हिवाळ्यात कशी काळजी घ्यायची? त्याबद्दल सांगणार आहोत.

केस कलर केल्यानंतर अशा प्रकारे घ्या केसांची काळजी :

गरम पाण्याने केस धुवू नका

कलर केल्यानंतर केस चुकूनही गरम पाण्याने धुवू नका. केस गरम पाण्याने जर धुतले तर केस आणखी कोरडे आणि कमजोर होण्याची शक्यता असते. या शिवाय, केसांच्या मूळांवर ही यामुळे परिणाम होतो आणि केसांचा रंग खराब होतो. त्यामुळे, हिवाळ्यात कलर केलेले केस धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर करू नका.

३ दिवस केस धुवू नका

कलर केलेल्या केसांचा रंग टिकवून ठेवण्यासाठी ३ दिवस अर्थात ७२ तासांपर्यंत तरी केस धुवू नका. जर केस लगेच धुतले तर केसांच्या क्युटिकल्सचे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे, केस कलर केल्यानंतर ते लगेच धुणे टाळा.

जर तुम्ही चुकूनही केस लगेच धुतले तर, केसांना दिलेल्या रंगाचा टोन बदलू शकतो. त्यामुळे, केस कलर केल्यानंतर लगेच केस धुवू नका.

केसांना लावा कलर प्रोटेक्टेड शॅंम्पू

केसांना कलर प्रोटेक्टेड शॅंम्पू लावल्याने केसांना लावलेला रंग टिकून राहण्यास मदत होते. तसेच, स्काल्पची नैसर्गिक पीएचची पातळी कायम टिकून राहते. जर तुम्ही कलर प्रोटेक्टेड शॅंम्पू न वापरता जर इतर कोणतेही शॅंम्पू वापरले तर केसांना हानी पोहचू शकते. त्यामुळे, केस कलर केल्यानंतर केसांना कलर प्रोटेक्टेड शॅंम्पू लावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut PC : रामदास कदमांचा धक्कादायक दावा, ठाकरे गटाने दिलं प्रत्युत्तर; नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

Mumbai News: मुंबईतील तरुण समुद्रात अडकला... एका घड्याळामुळे कसा वाचला जीव? थरारक प्रसंग वाचा...

IND vs WI 1st Test Live: अरे आताच फिफ्टी झाली होती, कशाला घाई केली! Shubman Gill चा चुकीचा फटका अन् विंडीजला मिळाली विकेट

RBI Monetary Policy: रिझर्व्ह बँकेने घेतला मोठा निर्णय; शेअर्स तारण ठेवून 1 कोटी रुपयांचे कर्ज घेता येणार

Deepak Borhade: दीपक बोऱ्हाडेंचे उपोषण तूर्त स्थगित; धनगर आरक्षणाचा लढा, शासनासोबत चर्चा सुरू ठेवण्याचा निर्धार

SCROLL FOR NEXT