Skin Care Tips esakal
लाइफस्टाइल

Skin Care Tips : प्रदूषणापासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी ‘या’ स्किनकेअर टिप्स करा फॉलो

हवेतील वाढते प्रदूषण आणि कडाक्याची थंडी त्वचेचे सौंदर्य हिरावून घेते.

Monika Lonkar –Kumbhar

Skin Care Tips : हवेतील वाढते प्रदूषण आणि कडाक्याची थंडी आपल्या त्वचेचे सौंदर्य हिरावून घेते. त्यामुळे, थंडीच्या दिवसांमध्ये आरोग्यासोबतच त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे. दिवाळीनंतर वायू प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. याचा आपल्या त्वचेवर वाईट परिणाम होण्याची शक्यता असते.

त्यामुळे, या प्रदूषणापासून त्वचेची खास काळजी घेणे गरजेचे आहे. हवेतील प्रदूषणामुळे त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे, या त्वचेच्या समस्या टाळण्यासाठी आणि प्रदूषणापासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी काही स्किनकेअर टिप्स फॉलो करणे महत्वाचे आहे. चला तर मग जाणून घेऊयात या स्किनकेअर टीप्स.

हवेतील प्रदूषणापासून त्वचेचा बचाव करण्यासाठी या टिप्स करा फॉलो :

डबल क्लिजिंग आवश्यक

स्किनकेअर रूटीनमध्ये फक्त फेसवॉश केला म्हणजे चेहरा स्वच्छ झाला असे होत नाही. त्वचेसाठी डबल क्लिजिंग करणे तेवढेच आवश्यक आहे. सुरूवातीला माईल्ड ऑईल किंवा क्लिझिंग मिल्कने त्वचेचा मसाज करा.

त्यानंतर, फेसवॉशचा वापर करून चेहरा चांगल्या प्रकारे स्वच्छ करून घ्या. डबल क्लिजिंगमुळे त्वचेवर चिटकलेले धूलिकण निघून जाण्यास मदत होते.

सनस्क्रिन लावायला विसरू नका

उन्हात बाहेर पडताना सनस्क्रिन लावायला कधीच विसरू नका. सनस्क्रिनमुळे त्वचेचे सूर्याच्या तीव्र अतिनील किरणांपासून संरक्षण केले जाते. सन टॅनिंग, रॅशेस इत्यादी समस्यांपासून दूर राहण्यासाठी सनस्क्रिनचा अवश्य वापर करावा. प्रदूषणापासून त्वचेचा बचाव करण्यासाठी सनस्क्रिन लावणे फायदेशीर आहे.

अ‍ॅंटीऑक्सिडंन्ट्सचे सेवन करा

त्वचेला हवेच्या प्रदूषणापासून वाचवण्यासाठी अ‍ॅंटीऑक्सिडंन्ट्सने समाविष्ट असणाऱ्या खाद्यपदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. त्यामुळे, त्वचेतील आर्द्रता टिकून राहण्यास मदत होते. फ्री रॅडिकल्सच्या समस्येपासून ही यामुळे आराम मिळतो. प्रदूषणापासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी अ‍ॅंटीऑक्सिडंन्ट्सने युक्त असलेल्या फळांचा आहारात अवश्य समावेश करा.

हायड्रेटेड रहा

शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाली की, त्याचा परिणाम त्वचेवर ही होतो. यामुळे, त्वचा कोरडी पडू लागते, निस्तेज दिसू लागते. त्यामुळे, त्वचेची काळजी घेण्यासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. त्यामुळे, शरीर नेहमी हायड्रेटेड ठेवा.

पाणी पिण्यासोबतच तुम्ही कोरफडीचा रस आणि आवळ्याचा रस ही पिऊ शकता. यामुळे, त्वचेची योग्य काळजी घेतली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Road Accidents Reduction : २०३० पर्यंत रस्ते अपघात ५० टक्क्यांनी कमी होणार? ; राज्यसभेत गडकरींनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

Pune Mumbai Expressway Traffic : द्रुतगती मार्गावरील अपघाताचा फटका; पुणे-बंगळूर महामार्गावर अवजड वाहतूक ठप्प

T20 World Cup: इशान किशनच ओपनर! सूर्याचा विश्वास पठ्ठ्याने सार्थ ठरवला, 7 Six अन् फिफ्टी; संजूचे स्थान धोक्यात

Pune Crime : मैत्रिणीला फोन केल्याच्या वादातून तरुणावर कोयत्याने हल्ला

Jan Arogya Yojana : राज्‍यातील उपकेंद्र, प्राथमिक आरोग्‍य केंद्रातही महात्‍मा फुले योजना; आता बाह्यरुग्ण विभागातील उपचारही मिळतील मोफत

SCROLL FOR NEXT