Parenting Tips esakal
लाइफस्टाइल

Parenting Tips : मुलांचा आत्मविश्वास कमी झाला आहे? मग, ‘या’ टीप्सची घ्या मदत

लहान मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे गरेजेचे असते.

Monika Lonkar –Kumbhar

Parenting Tips : लहान मुले जर लाजाळू असतील किंवा कुणासमोर येण्यास किंवा कुणासोबत बोलण्याचे टाळत असतील, तर पालकांना याबद्दल चिंता वाटते. ही चिंता वाटणे स्वभाविक आहे. अशी मुले पटकन कुणाकडे जात नाहीत, त्यांना बोलण्यास संकोच वाटतो.

तसेच, घरातील सदस्यांना सोडून इतर व्यक्तींसोबत बोलण्यास अशी मुले संकोच करतात. या परिस्थितीमध्ये खरं तर मुलांमध्ये आत्मविश्वासाची कमतरता असते किंवा त्यांचा आत्मविश्वास कमी झालेला असतो.

त्यामुळे, अशा परिस्थितीमध्ये पालकांनी मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे गरेजेचे असते. त्यासाठी आज आम्ही काही टीप्स सांगणार आहोत. कोणत्या आहेत त्या टीप्स? चला तर मग जाणून घेऊयात.

स्वावलंबी बनवा

तुमच्या मुलाचा किंवा मुलीचा स्वत:वरचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्यांना स्वत:ची कामे स्वत: करायला लावा. मुलांना दुसऱ्यांवर अवलंबून रहायला शिकवू नका. त्यांना स्वावलंबी बनवा. या छोट्या-मोठ्या कामांतून त्यांनी स्वत:ची कामे स्वत: केल्यामुळे त्यांचा स्वत:वरचा विश्वास वाढेल आणि त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होऊ शकेल.

शिकवण

लहान मुलांना आपण अभ्यास, खेळ यातील गोष्टी शिकवतो. मात्र, यासोबतच त्यांना योग्य वागणूक आणि व्यवहाराची देखील शिकवण द्यावी. याचा मुलांना फायदा नक्कीच होईल.

त्यासोबतच घरातील मोठ्या व्यक्तींसोबत, नातेवाईकांसोबत आणि आसपास राहणाऱ्या लोकांसोबत कसे वागावे, त्यांचा आदर कसा करावा? याची शिकवण मुलांना द्यावी. यामुळे, मुले सभोवतालच्या वातावरणात पटकन मिसळतील आणि त्यांना भीती ही वाटणार नाही. उलट त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल.

पर्सनल ग्रुमिंग महत्वाचे

लहान मुलांना स्वच्छतेबद्दल समजावून सांगावे. त्यांना स्वच्छतेचे महत्व समजून सांगताना त्यांना स्वत:ची स्वच्छता कशी करावी? याबद्दल देखील सांगावे. घरातील कचरा साफ करण्यास सांगावे, त्याची किंवा तिची स्वत:ची स्वच्छता जसे की रोजच्या रोज ब्रशिंग करणे, आंघोळ करणे इत्यादी गोष्टी सांगाव्यात.

या गोष्टी त्याच्या त्याला करायला लावा. या पर्सनल ग्रुमिंगमुळे मुलांमध्ये आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लवकर सुधारणा करा! मुख्यमंत्र्यांची नगर विकास खात्याच्या कामावर नाराजी, फडणवीस अन् शिंदे यांच्यात ऑल इज नॉट वेल?

Mumbai Metro: बेस्टनंतर मेट्रोचा पुढाकार! गणेशोत्‍सवात रेल्‍वे मध्यरात्रीपर्यंत धावणार; पहा वेळापत्रक

Ganesh Festival 2025 : धूप-अत्तराचा गंध, सोबतीला भक्तिभावाचा आनंद; गणेशोत्सवानिमित्त भाविकांकडून पूजा साहित्य संचाला विशेष मागणी

Crime News : नाशिकमध्ये गटबाजीचा राडा; माजी नगरसेवक उद्धव निमसेंसह 20 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Jalna Water Supply: लघुपाटबंधारे विभाग, मनपाच्या गोंधळाने दुरुस्तीकडे दुर्लक्ष; ‘घाणेवाडी’च्या सुरक्षा भिंतीचे निखळले पिचिंग

SCROLL FOR NEXT