new year 2024 esakal
लाइफस्टाइल

Fitness Tips : न्यू इयर पार्टीचा आनंद घ्यायचा असेल तर फिट राहण्यासाठी ‘या’ टिप्स करा फॉलो

आपण सर्वजण आता २०२३ च्या अखेरच्या टप्प्यात आहोत. अवघ्या २ दिवसांनी आपण नवीन वर्षात पदार्पण करणार आहोत. त्यामुळे, सध्या सर्वत्र नवीन वर्षाच्या पार्टीचा माहोल पहायला मिळतोय.

Monika Lonkar –Kumbhar

Health Care : आपण सर्वजण आता २०२३ च्या अखेरच्या टप्प्यात आहोत. अवघ्या २ दिवसांनी आपण नवीन वर्षात पदार्पण करणार आहोत. त्यामुळे, सध्या सर्वत्र नवीन वर्षाच्या पार्टीचा माहोल पहायला मिळतोय. अनेकदा असा आनंद साजरा करताना आपण वेगळ्याच मूडमध्ये असतो, तेव्हा आपल्याला निरोगी लाईफस्टाईलचा विसर पडतो.

या पार्टीच्या माहोलमध्ये आणि आनंदाच्या भरात मग अनहेल्दी फूड खाल्ले जाते. व्हेज-नॉनव्हेजमधील असंख्य पदार्थांसोबतच कोल्डड्रिंक्स, अल्कोहोल अशा अनेक घटकांचा त्यात समावेश होतो. त्यामुळे, तुमचा फिटनेस कमी होण्याची शक्यता असते. जर तुम्हाला या पार्टींचा आनंद घ्यायचा असेल तर, तुम्ही फिट राहणे गरजेचे आहे. त्यासंदर्भातील टिप्स आज आपण जाणून घेऊयात.

भरपूर चाला

फिट राहण्यासाठी चालणे हे अतिशय फायद्याचे आहे. पार्टीला जाण्याच्या काही दिवस आधी तुम्ही शक्यतो वाहन चालवणे टाळायला हवे. त्याऐवजी, तुम्ही चालायला हवे. जास्तवेळ बसूण राहणे टाळा आणि चालायला सुरूवात करा. यामुळे, तुमच्या शरीराची चयापचय क्रिया सुधारेल आणि कॅलरीज देखील बर्न्स होण्यास मदत होईल आणि तुम्ही फिट राहण्यास मदत होईल.

एक्सरसाईज रूटीनमध्ये करा बदल

जर तुम्ही नियमितपणे योगा, विविध प्रकारचे व्यायाम किंवा जिममध्ये वर्कआऊट करत असाल तर ते करत रहा. मात्र, एक्सरसाईज रूटीनमध्ये जरा बदल करा. जर तुम्ही जिममध्ये हेव्ही वर्कआऊट करत असाल तर ते करू नका. त्याचे प्रमाण कमी करा. जास्त प्रमाणात वर्कआऊट किंवा व्यायाम करणे टाळा. त्याऐवजी तुम्ही जेवण झाल्यानंतर ३० मिनिटे चाला.

शरीराला ठेवा हायड्रेटेड

शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी तुम्ही भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. तुमच्या दिवसाची सुरूवात करताना किमान २ ग्लास पाणी प्या. चहा किंवा कॉफी ऐवजी हर्बल चहा पिण्यावर भर द्या. पार्टीच्या दरम्यान, जास्तीत जास्त हेल्दी फूड खाण्याचा प्रयत्न करा. अनहेल्दी फूडचे कमी प्रमाणात सेवन करण्याचा प्रयत्न करा.

नारळ पाणी आणि फळांचा ज्यूस याचा समावेश आहारात करा. पार्टी दरम्यान तुमचे शरीर हायड्रेटेड राहील याची सतत काळजी घ्या. त्यामुळे, पार्टी करताना काही खाण्यापूर्वी २ कप गरम पाणी किंवा ग्रीन टी प्या. पार्टीत मॉकटेल किंवा कॉकटेल प्यायल्यानंतर पाणी अवश्य प्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishwas Nangre Patil Fact Check : 'भाकरी करपली नाहीच' आयपीएस विश्वास नांगरे पाटलांनी कविता लिहली की नाही?, महाराष्ट्र सरकारकडून फॅक्ट चेक

INDIA SQUAD VS AFGHANISTAN: भारताच्या संघात गुजरात टायटन्सची प्लेइंग इलेव्हन... वन डेत ४, तर कसोटीत ७ खेळाडू

Mumbai Water Supply: मुंबईकरांचं पाणी महागणार! बीएमसी मोठा निर्णय घेणार; किती टक्क्यांनी दर वाढणार?

Shaktipeeth Highway protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात एल्गार; ७८ गावातील शेतकरी ९ जूनला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार

BAN vs PAK 2nd Test: फिफ्टी हो गई, अब ड्रामा शुरू हो जाएगा! मोहम्मद रिझवानचे live मॅचमध्ये लिटन दाससोबत जोरदार भांडण Video

SCROLL FOR NEXT