Parenting Tips esakal
लाइफस्टाइल

Parenting Tips : होमवर्क करताना मुले चिडचिड करतात? मग, ‘या’ टिप्सच्या मदतीने लावा अभ्यासाची गोडी

मुलांचा होमवर्क करवून घेणे हे पालकांसाठी फार अवघड काम असते.

Monika Lonkar –Kumbhar

Parenting Tips : मुलांचा होमवर्क करवून घेणे हे पालकांसाठी फार मोठे अवघड काम असते. कारण, होमवर्क न करण्यासाठी मुलांकडे असंख्य कारणे असतात. त्यामुळे, मुलांना त्यांचा होमवर्क करायला लावण्यासाठी पालकांना बरीच मेहनत करावी लागते.

अनेक वेळा मुले अभ्यास करायचा म्हटले की, चिडचिड करतात. त्यांना होमवर्क नकोसा वाटतो. या परिस्थितीमध्ये त्यांची चिडचिड वाढते, त्यांचा हट्टीपणा आणखी वाढतो. मुलांनी होमवर्क न केल्याने पालकांना चिंता वाटणे स्वभाविक आहे.

आज आम्ही खास पालकांसाठी काही टिप्स घेऊन आलो आहोत. या टिप्समुळे मुलांना अभ्यासाची गोडी देखील लागेल आणि होमवर्क करताना मुले चिडचिड देखील करणार नाहीत. चला तर मग जाणून घेऊयात या टिप्स.

या टीप्सच्या मदतीने मुलांना लावा अभ्यासाची गोडी

फ्रेंडली वातावरण

अनेकदा मुले त्यांना पालक ओरडतील किंवा रागावतील या भीतीने होमवर्क करायला तयारच होत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये पालकांनी आपल्या मुलांसाठी घरात फ्रेंडली वातावरण तयार करायला हवे. जेणेकरून मुले सहज अभ्यास करायला तयार होऊ शकतील.

टाईम मॅनेजमेंट महत्वाचे

टाईम मॅनेजमेंट हे अतिशय महत्वाचे आहे. मुलांसाठी देखील हे महत्वाचे आणि तितकेच फायदेशीर आहे. यामुळे, मुलांना वेळेचे महत्व कळण्यास मदत होऊ शकेल.

पालक म्हणून तुम्ही मुलांना हे समजवायला हवे की, कोणत्या कामाला कधी प्राधान्य द्यायचे आहे? त्याप्रमाणे मुलांना याचे महत्व कळेल आणि त्यामुळे, त्यांचा अभ्यासाचा ताण कमी होईल.

मुलांचा होमवर्क हा वेगवेगळ्या गटांमध्ये विभागून द्या. प्रत्येक विषयाचा प्राधान्यक्रम ठरवा. यामुळे, मुलांचा फोकस ही वाढेल.

ब्रेक आवश्यक

काही पालक मुले शाळेतून घरी आले की, त्यांना लगेच अभ्यासाला बसवतात, आणि होमवर्क पूर्ण करण्यास सांगतात. असे अजिबात करू नका, यामुळे, मुलांची चिडचिड आणखी वाढेल आणि मुलांवर दबाव येईल.

मुले शाळेतून घरी आल्यानंतर त्यांना काहीसा ब्रेक द्या. या ब्रेकमुळे त्यांना रिफ्रेश व्हायला मदत होईल. त्यांचा मूड ठीक होईल. त्यानंतर, त्यांना होमवर्क करू द्या. होमवर्क करताना सतत त्यांच्या सोबत थांबू नका. मुलांना जेव्हा गरेज लागेल किंवा जेव्हा ते आवाज देतील तेव्हाच त्यांना मदत करायला जा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

Rahul Narwekar : अलिबागमध्ये नेमकं काय घडलं होतं? राहुल नार्वेकरांनी सांगितला घटनाक्रम; संजय राऊतांनाही दिलं आव्हान

Beed News : बीडमध्ये ‘लेडी बाऊन्सर्स’ची एन्ट्री; बिल्डरभोवती महिला सुरक्षेची कडेकोट फौज! जमिनीच्या वादानंतर घेतला अनोखा निर्णय

SCROLL FOR NEXT