Lehenga Tips esakal
लाइफस्टाइल

Lehenga Tips : संगीत फंक्शनसाठी लेहेंगा खरेदी करण्यापूर्वी फॉलो करा ‘या’ खास टीप्स

संगीत फंक्शनसाठी मुली खास करून लेहेंगा परिधान करायला पसंती देतात.

Monika Lonkar –Kumbhar

Lehenga Tips : लग्न सोहळ्यापूर्वी अनेक फंक्शन्स पार पडतात. त्यामध्ये, मेहंदी, संगीत आणि हळद यांचा समावेश होतो. यातील प्रत्येक फंक्शनसाठी नवरा-नवरीसोबतच दोन्ही कुटुंबीय देखील मोठी तयारी करतात.

संगीत फंक्शनसाठी मुली खास करून लेहेंगा परिधान करायला पसंती देतात. संगीत नाईटमध्ये डिझायनर लेहेंगा घालून त्यावर मस्त डान्स परफॉर्मन्स ही आवर्जून दिला जातो. त्यामुळे, हा लेहेंगा खास असावा असे प्रत्येक वधूला वाटते.

परंतु, संगीत फंक्शनसाठी खास लेहेंगा खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घेणे महत्वाचे आहे. संगीत फंक्शनसाठी लेहेंगा खरेदी करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी फॉलो करायला हव्यात? आणि कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी? या संदर्भातल्या खास टीप्स आम्ही शेअर केल्या आहेत.

वजनाने हलका असलेला लेहेंगा निवडा

संगीत फंक्शनसाठी जो लेहेंगा तुम्ही निवडाल तो जास्त हेव्ही असता कामा नये. लेहेंगा खरेदी करताना तो जास्त हेव्ही वर्क असलेला खरेदी करू नका, त्याऐवजी वजनाने हलका असलेला लेहेंगा खरेदी करा.

जॉर्जेट आणि ऑर्गेंन्झा या फॅब्रिक्सचा लेहेंगा खरेदी करण्यावर भर द्या. कारण, या फॅब्रिकमधील लेहेंग्यामध्ये तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल आणि तुम्हाला डान्स करायचा असेल तरी काही अडचण येणार नाही. त्यामुळे, चुकूनही हेव्ही वर्क असलेले जसे की, सिक्विन्स, मोती, जरदोसी वर्क असेलेले लेहेंगे संगीत फंक्शनसाठी खरेदी करू नका.

लेहेंग्यावरील दुपट्टा जास्त हेव्ही नको

लेहेंग्यावरील दुपट्टा हा अधिक आकर्षक असावा मात्र, तो हेव्ही असता कामा नये. हेव्ही दुपट्टा असेल तर तुम्हाला तो वारंवार सांभाळत बसावे लागेल. शिवाय, तुमचा डान्स परफॉर्मन्स असल्यावर डान्स करताना तो दुपट्टा सारखा मध्येमध्ये येत राहील.

त्यामुळे, ही गडबड टाळण्यासाठी तुम्ही लाईटवेट दुपट्ट्याची निवड करा. जेणेकरून तुम्हाला डान्स करताना कोणतीही अडचण येणार नाही.

दुपट्ट्याची करा अनोखी स्टाईल

संगीत नाईटसाठी जर तुम्हाला लेहेंग्याला स्टायलिश लूक द्यायचा असेल तर दुपट्ट्याची मदत घ्यायला विसरू नका. हा दुपट्टा तुम्ही कशा प्रकारे स्टाईल करता ? यावर तुमचा लेहेंगा लूक अवलंबून असतो.

नेहमीच्या स्टाईलमध्ये दुपट्टा कॅरी करण्यापेक्षा तुम्ही दुपट्टा कॅप सारखा किंवा जॅकेट प्रमाणे स्टाईल करा. यामुळे, तुमच्या संगीत नाईटच्या लेहेंगा लूकला चारचॉंद लागतील यात काही शंका नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना मोठा धक्का ! ९२ लाख महिलांची नावे वगळली; 'ही' मोठी कारणे आली समोर

Mumbai News: एकुलती एक मुलगी, १६ वर्षे कोमात, ३७ लाख भरपाई देण्याचे आदेश; वेदनांची भरपाई पैशात होणार नाही !

Adani समूह आता स्मार्ट मीटर कंपनी विकत घेण्याच्या तयारीत; 1500 कोटींची डील होण्याची शक्यता...

Latest Marathi News Live Update : तामिळनाडूमध्ये गोवंश हत्याबंदी लागू करण्याच्या मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्देशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

Pune News: दूषित पाण्यामुळे आरोग्याशी खेळ! कात्रजमध्ये पाणीपुरवठा विभागाचा गोंधळ; जलवाहिनीच्या गळतीमुळे पाणीटंचाई आणि दूषित पाणी

SCROLL FOR NEXT