लाइफस्टाइल

Diabetes Symptoms: पायांवर अशी लक्षणं दिसत असतील तर सावधान! ही डायबिटीजची सुरुवात असू शकते

पायांवर दिसतात मधुमेहाची ‘ही’ लक्षणे; दुर्लक्ष न करता लवकर करा ब्लड शुगर टेस्ट

Aishwarya Musale

मधुमेह (Diabetes) हा मुख्यत: धकाधकीच्या जीवनशैलीमुळं होणारा आजार मानला जातो. हा आजार पूर्वी वृद्धांना होत असे, मात्र गेल्या काही काळात तरुण वर्गही या आजाराला झपाट्याने बळी जात असल्याचे दिसून आलं आहे. मधुमेह हा एक असा आजार आहे जो शरीराच्या सर्व अवयवांना हळूहळू बाधित करत जातो. साधारणपणे मधुमेहाचे दोन प्रकार असतात: टाइप-१ मधुमेह आणि टाइप-२ मधुमेह.

तुम्ही मधुमेहाचे रुग्ण नसाल तर तुम्हाला त्याचा धोका आणि लक्षणांबद्दल तेवढी माहिती नसते. पण जेव्हा तुम्हाला मधुमेह होतो तेव्हा आपल्या शरीरात अनेक लक्षणे दिसू लागतात. जसे की, लघवी करताना जळजळ होणे, डोळ्यांखाली सूज येणे, सतत लघवी होणे, अंगाला खाज सुटते अशी काही लक्षणे आढळतात. पण तुम्हाला माहित आहे का, पायांवर देखील मधुमेहाची लक्षणं दिसून येतात. जी वेळीच ओळखणे गरजेचे आहे.

पाय सुन्न पडणे आणि मुंग्या येणे

जर तुमचे पाय सुन्न पडत असेल किंवा मुंग्या येत असतील तर हे मधुमेहाचे लक्षण असू शकते. मधुमेहामध्ये, उच्च रक्तातील साखर नसांना नुकसान करते, ज्यामुळे पाय सुन्न होणे आणि मुंग्या येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

सूज येणे

कोणत्याही कारणाशिवाय पायांना सूज येणे हे देखील मधुमेहाचे लक्षण असू शकते. सूज, विशेषत: घोट्याच्या आणि पायाच्या खालच्या भागांमध्ये, हे सूचित करू शकते की तुमच्या शरीरात रक्त परिसंचरण योग्यरित्या होत नाही.

कोरडी त्वचा

मधुमेहाने ग्रस्त लोकांची त्वचा अनेकदा कोरडी आणि निर्जीव होते. जर तुम्हाला तुमच्या पायांना सतत खाज सुटणे आणि कोरडेपणा जाणवत असेल तर हे मधुमेहाचे लक्षण असू शकते.

पाय दुखणे

जेव्हा तुम्ही मधुमेहाचे बळी ठरता तेव्हा तुम्हाला ‘डायबेटिक न्यूरोपॅथी असू शकते. ही एक वैद्यकीय स्थिती आहे ज्यामध्ये नसा खराब होतात, ज्यामुळे पाय खूप दुखतात आणि सूजतात, कधीकधी पाय सुन्न देखील होतात.

नखांचा रंग बदलतो

जेव्हा मधुमेहाचा त्रास होतो तेव्हा आपल्या पायाच्या नखांचा रंग बदलतो, आपली नखं जी सामान्यतः गुलाबी असतात ती अचानक काळी पडू लागतात. हे लक्षण तुम्ही हलक्यात न घेता त्वरित ब्लड शुगर टेस्ट करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: टिकणारे आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरूच: मनोज जरांगे- पाटील; प्रमाणपत्र रद्द करून जातीयवादी भूमिका

Nagpur Crime: नागपुरात संतापजनक प्रकार! १६ वर्षीय मुलीला डांबून मारहाण, सिगारेटचे चटके दिल्याचा आरोप

AUS vs BAN 1st Test: बांगलादेशचे निर्विवाद वर्चस्व; पण, मिचेल स्टार्कने नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड, ऑस्ट्रेलियन गोलंदाज 'डाव्यां'मध्ये सरस

Latest Marathi News Live Update : पुण्यात वारजे कर्वेनगर भागात पडलेल्या प्रचंड खड्डे दुरुस्ती साठी मनसे तर्फे वारजे क्षेत्रीय प्रमुखांना तुकाराम मुंडे यांची प्रतिमा भेट

स्टार प्रवाहच्या लोकप्रिय मालिकेचा प्रवास संपला; समोर आला भावुक करणारा अंतिम प्रोमो, कधी दिसणार शेवटचा भाग?

SCROLL FOR NEXT