लाइफस्टाइल

Yoga Benefits : दम्याच्या रुग्णांनी रोज करावे हे योगासन, श्वासोच्छवासाच्या समस्या होतील दूर

काही लोक दम्यासाठी घरगुती उपाय करून बघतात.

Aishwarya Musale

हिवाळ्यात अनेकांना श्वास घेण्यास त्रास होतो. याचे एक प्रमुख कारण म्हणजे प्रदूषण, ज्यामुळे आपल्या फुफ्फुसांना सूज येते आणि श्वास घेण्यास त्रास होतो. या सर्व समस्यांवर आम्ही तुम्हाला एक रामबाण उपाय सांगणार आहोत, ज्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. तसेच दिवसातून फक्त 15 मिनिटे हा उपाय केल्याने तुम्हाला आराम मिळेल आणि तो उपाय म्हणजे योग.

हस्त उत्तानासन

योग चटईवर प्रणामासन म्हणजे प्रार्थनेला जसे बसतो तसे बसा. दीर्घ श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या वर घ्या. दोन हातांमधील अंतर खांद्याच्या रुंदीपेक्षा जास्त नसावे. वरचे धड आणि डोके मागे वळवून थोडेसे वक्र करा. हात वर करणे आणि धड मागे वळवणे एकाच वेळी होईल.

भुजंगासन  

भुजंगासन दम्याच्या रुग्णांसाठी खूप चांगले आहे. या योगासनामुळे छातीतील श्वासोच्छवासाचा त्रास दूर होतो. यामुळे रक्ताभिसरण सुरळीत होण्यास मदत होते.

उस्त्रासन

उस्त्रासन करण्यासाठी सर्वप्रथम गुडघ्यावर बसावे लागते. त्यानंतर दोन्ही गुडघ्यांची रुंदी खांद्याएवढी ठेवा आणि तळवे पूर्णपणे पसरवा. पाठीचा कणा किंचित मागे वाकवा आणि दोन्ही हातांनी टाचांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करा.

विरभद्रासन

विरभद्रासनाला वॉरियर पोझ असेही म्हणतात. हे आसन करण्यासाठी उभे राहून पाठ सरळ करा. यानंतर, एक पाय पुढे पसरवा आणि तो वाकवा, तर मागचा पाय सरळ राहील. त्यानंतर दोन्ही हात खांद्यापर्यंत वर करून सरळ करा. नंतर हळूहळू श्वास घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026 : इशा सिंग अन् चीनच्या शाओनेचे समान ३८ गुण, तरीही भारतीय नेमबाजाला मिळाले रौप्यपदक; असं का?

Vinod Kambli Viral Video: विनोद कांबळी वृद्धाश्रमात असल्याचा व्हिडिओ व्हायरल; नेमकं काय घडलं? पत्नी अँड्रियाने केला मोठा खुलासा

Maharashtra Drought Relief : मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

Mumbai Malaria: मुंबईत मलेरियाचा वाढता धोका! रुग्णसंख्या ९ हजारांवर; वर्षभरात ४१ टक्क्यांनी वाढ

Latest Marathi News Live Update : तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय आज ‘मामा गोल्ड रिंग योजना’ सुरू करणार

SCROLL FOR NEXT