Yoga for Children esakal
लाइफस्टाइल

Yoga for Children : लहान मुलांसाठी फायदेशीर आहेत ‘ही’ योगासने, निरोगी आरोग्यासोबतच वाढेल अभ्यासातील एकाग्रता

Yoga for Children : लहान मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आणि त्यांची अभ्यासातील एकाग्रता वाढवण्यासाठी योगा फायदेशीर ठरतो. आज आपण लहान मुलांसाठी लाभदायी असणाऱ्या काही योगासनांबद्दल जाणून घेणार आहोत.

Monika Lonkar –Kumbhar

Yoga for Children : मानसिक आणि शारिरीक आरोग्यासाठी योगा हा अतिशय फायदेशीर आहे. नियमित योगा केल्याने आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात. शरीर लवचिक होते आणि मानसिक आरोग्य उत्तम राहते. मात्र, या सगळ्यासोबत संतुलित आहार देखील तितकाच महत्वाचा आहे. व्यायाम, योगा किंवा शारिरीक हालचाल यासोबत संतुलित आहार घेतला तुमचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते.

योगा हा केवळ प्रौढांनी किंवा तरूणांनी करावा, असे काही नाही. लहान मुले देखील योगा करू शकतात. योगा नियमितपणे केल्याने याचे अनेक फायदे लहान मुलांना मिळतात. शरीर लवचिक आणि चपळ होते. एकाग्रता वाढण्यास मदत होते. शिवाय, मानसिक आरोग्य चांगले राहते. असे अनेक फायदे योगामुळे होतात.

लहान मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आणि त्यांची अभ्यासातील एकाग्रता वाढवण्यासाठी योगा फायदेशीर ठरतो. आज आपण लहान मुलांसाठी लाभदायी असणाऱ्या काही योगासनांबद्दल जाणून घेणार आहोत. कोणती आहेत ही योगासने? चला तर मग जाणून घेऊयात.

वृक्षासन

अभ्यासाचा ताण-तणाव दूर करण्यासाठी आणि मानसिक शांतीसाठी हे योगासन अतिशय फायदेशीर आहे. लहान मुलांनी या योगासनाचा नियमितपणे सराव करावा. आता काही दिवसांनी लहान मुलांच्या परीक्षा देखील सुरू होतील किंवा काहींच्या सुरू ही झाल्या असतील.

अशा परिस्थितीत तणावमुक्त राहण्यासाठी हे योगासन उपयुक्त आहे. यासोबतच शरीराच्या इतर समस्या दूर करण्यासाठी आणि एकाग्रता वाढवण्यासाठी लहान मुलांनी या योगासनाचा सकाळी जरूर सराव करावा.

ताडासन

अनेकदा असे होते की, काही लहान मुलांचे अभ्यासात मन लागत नाही. त्यांना सतत खेळावेसे वाटते. मात्र, अभ्यासासाठी एकाग्रता अतिशय आवश्यक आहे. मुलांचे मन एकाग्र करण्यासाठी पालकांनी मुलांना ताडासन या योगासनाचा जरूर सराव करायला लावावा.

ताडासन केल्याने एकाग्रता तर वाढतेच शिवाय, मुलांची श्वास घेण्याची क्षमता देखील वाढते. ताडासनाचा नियमितपणे सराव केल्याने शरीराची ऊर्जा पातळी वाढण्यास ही मदत होते. मुलांचा मूड सुधारण्यासाठी देखील हे योगासन लाभदायी आहे. विशेष म्हणजे या योगासनाचा नियमितपणे सराव केल्याने लहान मुलांची उंची वाढण्यास देखील मदत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Malegaon News : मालेगाव महापौरपदाचे आरक्षण ठरणार गेमचेंजर; शिवसेनेची ताकद वाढणार की इस्लाम पक्षाची चाल यशस्वी होणार?

Viral Video : भाकरी मिळाली नाही,पठ्ठ्याने काचेची बाटलीच चावून खाल्ली; तुमचाही डोळ्यांवर विश्वास बसणार, पाहा व्हिडिओ

ChatGPT India Ban : भारतात चॅटजीपीटी बंद होणार, अमेरिकेच्या टॅरिफ झटक्यानंतर आता AI वापरलाही फटका? ट्रम्प यांच्या चाणक्याची खेळी

IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताच्या वनडे अन् टी२० संघाची घोषणा; अमरावतीच्या खेळाडूला ७ वर्षांनी संधी

Whatsapp मध्ये होतोय मोठा बदल! येत आहे Youtube सारखं फीचर; काय आहे अन् कसं वापरायचं? पाहा

SCROLL FOR NEXT