World Diabetes Day 2023 esakal
लाइफस्टाइल

World Diabetes Day 2023 : डायबिटीजला नियंत्रित ठेवण्यासाठी रोज करा ‘ही’ योगासने

मधुमेहाला नियंत्रित ठेवण्यासाठी आपण योग्य आहार आणि व्यायाम करणे गरजेचे आहे.

Monika Lonkar –Kumbhar

World Diabetes Day : भारतात डायबिटीजच्या रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे, या आजाराचा धोका दूर करण्यासाठी आपण योग्य आहार आणि व्यायाम करणे गरजेचे आहे. डायबिटीज हा एक प्रकारचा मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे. त्यामुळे, यावर वेळीच नियंत्रण नाही मिळवले, तर आरोग्याच्या इतर समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.

आज जागतिक मधुमेह दिन आहे. लोकांमध्ये मधुमेहाबाबत जागृती निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या World Diabetes Day च्या निमित्ताने आपण मधुमेहाला नियंत्रित ठेवणाऱ्या योगासनांबद्दल जाणून घेणार आहोत.

मधुमेहाला दूर ठेवणारी योगासने खालीलप्रमाणे

ताडासन

  • हे योगासन करण्यासाठी सर्वात आधी उभे रहा आणि तुमच्या दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवा.

  • आता तुमचे खांदे रूंद ठेवून ताठ मान करा.

  • श्वास घेत दोन्ही हात समोर आणून बोटे एकमेकांमध्ये चिकटवा.

  • आता दोन्ही हातांचे पंजे बाहेरच्या दिशेला ताणून धरा.

  • त्यानंतर, कोपर सरळ ठेवून श्वास घ्या आणि दोन्ही हात डोक्याच्या वर न्या.

  • त्यानंतर, पुन्हा श्वास घेत दोन्ही पायांच्या टाचा वर करा.

  • या स्थितीमध्ये तुमचे दोन्ही हात वरच्या बाजूला खेचा आता तुमच्या शरीराला ताण जाणवेल.

  • नंतर, श्वास सोडत पायांच्या टाचा जमिनीवर ठेवा आणि दोन्ही हात खाली घ्या.

मंडूकासन

  • सर्वात आधी वज्रासनाच्या स्थितीमध्ये या.

  • आता दोन्ही हातांचे अंगठे हातांच्या पंज्यामध्ये घेऊन हाताची मुठ बंद करा.

  • आता श्वास घेऊन दोन्ही हातांच्या मुठी एकत्रितपणे जोडून पोटाजवळ न्या.

  • आता बेंबीजवळ नेऊन दोन्ही मुठींनी बेंबी दाबण्याचा प्रयत्न करा.

  • आता श्वास सोडत कंबरेपासून पुढे वाकून तुमची नजर समोर ठेवा.

  • त्यानंतर, पुन्हा एकदा श्वास घेऊन सरळ बसा.

पादहस्तासन

  • सर्वात आधी दोन्ही पाय जोडून सरळ उभे रहा.

  • आता श्वास घ्या आणि दोन्ही हात वरती न्या.

  • त्यानंतर, श्वास सोडत कंबरेपासून पुढच्या बाजूला वाका.

  • आता दोन्ही हात पायांच्या दोन्ही बाजूला जमिनीवर समांतर ठेवण्याचा प्रयत्न करा.

  • त्यानंतर, श्वास घेत हळुवारपणे हात वर करा आणि सरळ उभे रहा.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पक्षात खदखद! नेतृत्वावर थेट प्रश्न अन्...; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भावनिक पोस्ट चर्चेत, काय म्हणाले?

जमीन, जागेची खरेदी-विक्री आता कोणत्याही तालुक्यात! खरेदी-विक्री व्यवहारातून राज्याच्या तिजोरीत ५८,६७३ कोटी; ३१ मार्चपर्यंत सुट्टीतही सुरु राहणार कार्यालये

सोने-चांदीच्या भावात अचानक वाढ! युद्धानंतर सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक, सोनं ५५००ने तर चांदी ११००० रुपयांनी महाग

Karad News : कऱ्हाड - चिपळुण मार्गावरील अवजड वाहतुक बंद; महामार्गाच्या कामासाठी दोन महिने वाहतुकीत बदल

खरातचं कुटुंब परदेशात पलायनाच्या तयारीत? पतीचे कोट्यवधींचे व्यवहार माहिती नाहीत, पत्नीची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT