breakup  
लाइफस्टाइल

ब्रेकअप करण्यापूर्वी 'या' मुद्द्यांवर करा पार्टनरसोबत चर्चा

पार्टनरसोबत करा 'या' मुद्द्यांवर चर्चा

शर्वरी जोशी

नात्यात गैरसमज, मतभेद निर्माण झाले की ते नातं तुटायला फार वेळ लागत नाही. अनेकदा नात्यातील दुरावा वाढला की कपल्स ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतात. परंतु, या काळात मनात अनेक प्रश्नांचं काहू माजलेलं असतं. असंख्य विचार मनात घोळत असतात. त्यामुळे ब्रेकअप करण्यापूर्वी पार्टनरसोबत बसून काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणूनच, ब्रेकअप करण्यापूर्वी पार्टनरसोबत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा करावी ते जाणून घेऊयात. ( things to discuss with your partner before breakup ssj93)

१. बोलण्याची पद्धत -

नात्यात दुरावा येण्याचं सर्वात मोठं आणि महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे बोलण्याची चुकीची पद्धत. बऱ्याचवेळा काही जण आपल्या पार्टनरसोबत व्यवस्थितरित्या बोलत नाही. वारंवार त्यांचा अपमान करणं, टोमणे मारणं असे प्रकार घडतात. ज्यामुळे पार्टनर दु:खी होतो. परिणामी, नात्यात दुरावा यायला लागतो. त्यामुळे ब्रेकअप करण्यापूर्वी दोघांमधील संवाद कशा पद्धतीचे होते यावर चर्चा करायला हवी. कोणत्या गोष्टींमध्ये मिस कम्युनिकेशन झालं हे एकमेकांना सांगायला हवं. कदाचित या मुद्द्यावर चर्चा केल्यानंतर पार्टनरला त्याची चूक समजेल व मोडकळीस आलेलं नातं पुन्हा एकदा नव्याने सुरु होईल.

२. चांगल्या गोष्टींचं कौतुक करा -

नात्यात वितुष्ट आल्यामुळे भलेही तुमचा ब्रेकअप होत असेल. परंतु, एवढ्या वर्षांच्या सहवासात तुम्हाला पार्टनरची एखाद दुसरी गोष्ट तर नक्कीच आवडली असेल. त्यामुळे शेवटच्या काळात पार्टनरच्या चांगल्या वागण्याचं कौतुक करा, त्याची कोणती गोष्ट, क्वालिटी तुम्हाला आवडली होती ते त्याला सांगा.

३. ब्रेकअपविषयी व्यक्त व्हा -

सहाजिकच आहे वैचारिक मतभेद किंवा अन्य कारणामुळे तुमच्या नात्यात वितुष्ट आलं असेल व तुम्ही ब्रेकअपच्या निर्णयापर्यंत पोहोचता. ब्रेकअप करत असताना पार्टनरसोबत सतत वाद होत असतात. परंतु, ब्रेकअपचा निर्णय फायनल झाल्यावर या मुद्द्यावर शांतपणे पार्टनरसोबत बोला. पार्टनरची कोणती गोष्ट तुम्हाला खटकली ते मोकळेपणाने त्यांना सांगा.

४. नात्याकडून कोणत्या अपेक्षा होत्या ते सांगा -

कोणतंही नवं नातं जोडल्यानंतर त्या नात्याकडून काही ना काही अपेक्षा या प्रत्येकाच्याच असतात. त्यामुळे तुमच्या नेमक्या कोणत्या अपेक्षा होत्या ते पार्टनरला सांगा. या नात्यातून तुम्हाला पैसा, स्टेबिलिटी की सन्मान कोणत्या गोष्टीची अपेक्षा होती हे स्पष्टपणे सांगा.

५. पार्टनरचं म्हणणं ऐकून घ्या -

पार्टनरला भेटल्यानंतर एकमेकांचं म्हणणं नीट ऐकून घ्या. बऱ्याचदा वाद झाल्यावर आपण आपले दोष दुसऱ्यांच्या माथी मारत असतो. परंतु, अशी चूक कधीच करु नका. पार्टनरचं म्हणणं काय आहे ते नीट ऐकून घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT