inner wear google
लाइफस्टाइल

बॉडी शेपमध्ये ठेवायचीये? वॉर्डरोबमध्ये ठेवा ही पाच अंतर्वस्त्र

सकाळ डिजिटल टीम

हिवाळ्यात नेहमीच्या कपड्यांबरोबर स्वेटर, जॅकेट तसेच इतर हिवाळ्यातील कपड्यांनी तुमचा वॉर्डरोब भरलेला असतो. मात्र त्याचवेळी अंतर्वस्त्रांकडे जास्त लक्ष दिलं जात नाही. पण हेच कपडे तुमच्या पर्सनालिटीसाठी महत्वाचे मानले जातात. हिवाळ्यात विविध प्रकारचे अंतर्वस्त्र पहायला मिळतात. रंग, आकार आणि डिझाईनमध्ये तुम्हाला विविध व्हरायटी बघायला मिळतात. हिवाळ्यात अंतर्वस्त्रांचे सेट तुम्ही त्या त्या कपड्यांवर घालू शकता. जाड कोट किंवा जॅकेट घालताना अनेक वेळा आपल्याला शेपची खूप काळजी वाटत असते, पण ही अंतर्वस्त्रे घातल्याने तुम्हाला त्या अडचणी येत नाही.

पॅडेड ब्रा- हिवाळ्यात नेहमीची ब्रा घालून योग्य शेप दिसत नाही. फिटेड स्वेटर, जॅकेटमध्ये हाच प्रोब्लेम येतो. ते दिसायलाही चांगले वाटत नाही. अशावेळी नॉन पॅडेड ब्रा ऐवजी पॅडेड ब्रा निवडा. ही ब्रा तुम्हाला शेपनुसार परफेक्ट लूक देते. जर तुम्ही तुमच्या शेपबद्दल गोंधळत असाल, किंवा तुम्हाला जास्त नक्षीकाम आवडत नसेल, तर पॅडेड ब्रा वापरणे योग्य ठरेल. परफेक्ट शेपसह तसाच लूक मिळण्यासाठी ती उपयोगी पडेल.
सीमलेस ब्रा- बॉडी-हगिंग स्वेटर, टॉप किंवा बॉडीकॉन ड्रेसवर तुम्हाला परफेक्ट लुक हवा असेल तर तुम्ही सीमलेस ब्रा घालू शकता. हिवाळ्यात महिलांना पोशाखात बोल्ड लूक कॅरी करता येत नाही, पण, तुम्ही तुमच्या आउटफिटसोबत योग्य ब्रा घातल्यास तुमच्या शरीराचा आकार चांगला दिसेल. पॅडेड ब्रा तुमचा शेप सुधारण्यास योग्य असतात,, तर सीमलेस ब्रा बोल्ड लुक देतात. मात्र, ती खरेदी करताना गुणवत्ता आणि डिझाइन या दोन्ही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे.
बॉय शॉर्ट्स- हिवाळ्यात बॉय शॉट्स कपडे घालणे बेस्ट आहे. हे शॉट्स तुम्ही वुलन पायजम्याबरोबर घालू शकता. महिलांना झोपताना आरामदायक कपडे घालणे आवडते. अशावेळी बॉय शॉट्स तुमच्यासाठी योग्य पर्याय आहे. हे शॉट्स पॅंटीसारखेच असतात. ते तुम्ही हिवाळ्यात मोठ्या पॅंटबरोबर कॅरी करू शकता.
वेलवेट पायजमा- थंडीत झोपताना अनेकजण जाड गोधडी घेऊन झोपतात. त्याच्यात त्यांना चांगली उब मिळते. म्हणून मग ते लोकरीचे कपडे वापरत नाहीत. त्यामुळे तुम्ही कलरफूल वेलवेट नाईटवेअर वापरू शकता. हे कपडे सामान्य कपड्यांपेक्षा हलके असले तरी आरामदायक असतात. हे घातल्यानंतर तुम्हाला उकडत नाही. वेलवेट फेब्रिकचे रंग वायब्रेंट असल्याने दिसायलाही छान वाटतात. जर तुम्हाला नेहमीच फॅशनेबल राहणे आवडत असेल तर तुम्ही हे कपडे घालायला हवे.
स्टॉकिंग्स-हिवाळ्यात पायांना थंडी लागत असल्याने अनेक मुली शॉर्ट कपडे वापरत नाहीत. त्यामुळे अनेकजमी पेंट, जीन्स, ट्राऊजर घालणे पसंत करतात, पण सतत हे कपडे घालून कंटाळा येतो. जर असे होत असेल तर तुम्ही आवडीच्या रंगाचे स्टॉकिंग्स घालून शॉर्ट ड्रेस कॅरी करू शकता. टाईट स्टॉकिंग्स ड्रेसवर दिसायाला अगदी छान दिसतात. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कलरफूर, प्रिंट असलेले स्टॉकिंग्स वापरू शकता. ड्रेस किंवा स्कर्टवरही ते वापरू शकता. हे घालणे अतिशय सोपे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

पानिपताच्या लढाईनंतर या पेशव्याचं प्रेत विजयचिन्ह म्हणून अफगाणी सैनिक नेणार होते ! इतिहासातील अवघड प्रसंग

Photos : अंतराळातून दिसले पृथ्वीवर कोसळणाऱ्या प्रकाशस्तंभाचे अद्भुत दृश्य; शास्त्रज्ञही थक्क, पाहा आश्चर्यकारक फोटो..

Solapur News: 'मंगळवार, बुधवारी शाळा राहणार बंद'; वाढीव टप्पा अनुदानासाठी शिक्षक संघाचा निर्णय, नंतर मुंबईत आंदोलन

SCROLL FOR NEXT