couple esakal
लाइफस्टाइल

यशस्वी लग्नासाठी दोघांच्या वयामध्ये हवं किती अंतर?

भक्ती सोमण-गोखले

प्रत्येक कपल्ससाठी वयातले अंतर हे वेगवेगळ्या प्रकारे कार्य करते. काहींना 2 वर्षांचे अंतर योग्य वाटते. तर काहींना 10 वर्षांचेही अंतर चालते. पण बऱ्याच लोकांना त्यांच्यापेक्षा वयाने मोठा असलेला जोडीदार आवडतो. हे ज्याला जसे आवडते त्यावर अवलंबून आहे. पण, अनुरूपतेसह प्राधान्याला महत्व देत बहुतेक यशस्वी विवाहांमध्ये वयाचे अंतर असते. काहींसाठी वयाचा मुद्दा हा अडथळ्याचा असू शकतो. त्यामुळेच लग्न करण्याआधी जोडप्यांसाठी वयाचे वेगवेगळे अंतर कसे असू शकते, हे जाणून घेणे महत्वाचे आहे.

couple

5 ते 7 वर्षांचे अंतर

या वयातील अंतर असलेल्या जोडप्यांमध्ये कमी भांडणे, गैरसमज आणि वाद होतील, जोडप्यांमधील एक जण अधिक समंजस असल्याने टोकाचे वाद झाले तरी लग्न तुटण्यापासून वाचवतील. 5 ते 7 वर्षातील अंतर हे खूपच आदर्श आहे. कारण ते जोडप्यांना स्थैर्य आणि एकमेंकाचा दृष्टीकोन जवळून समजून घेण्यास मदत करतील.

10 वर्षांचे अंतर

जोडीदारामध्ये 10 वर्षांचे अंतर असलेले बरीच लग्ने झाली आहेत. ज्यात पती-पत्नीमध्ये पुरेसे प्रेम आणि समज असते. जेव्हा त्यांच्या आयुष्यातील ध्येये, महत्वाकांक्षा आणि दृष्टीकोन याबद्दल स्पष्ट असून एकच असतात, तेव्हा या 10 वर्षांच्या अंतराचा फारसा फरक पडत नाही. तरी काही सामान्य कपल्ससाठी हे त्रासदायकही असू शकते. काहींचे नाते ताणलेले असते. काहीवेळा वयाने मोठा असलेला जोडीदार अधिक परिपक्व असल्याने त्याच्याशी जुळवून घेण्यात दुसऱ्या पार्टनरला अडचणी येऊन समस्या येऊ शकतात.

20 वर्षांचे अंतर

लग्न झालेल्या जोडप्यांसाठी हे अंतर योग्य नाहीचय. पण अशी अनेक लोकप्रिय जोडपी आहे त्यांच्यात 20 वर्षांचे अंतर आहे. हे अंतर खूप जास्त आहे. ध्येय, महत्त्वाकांक्षा आणि मतांमध्ये खूपच मोठ्ठा फरक असतो. या जोडप्यांत मुलं होण्याची गरज सर्वात महत्वाची असू शकते. कारण वय जास्त असलेल्या जोडीदाराला लवकरात लवकर मुल व्हावं असं वाटत असेल पण दुसरा पार्टनर त्यासाठी फारसा उत्सुक नसल्याची शक्यता असते. त्यांच्या विचारसरणीतही खूप मोठा फरक असल्याने हाही दोष आहे.

वयाचे अंतर महत्वाचे आहे का?

सर्वसाधारणपणे विचार करता होय, सध्याचे जग हे क्षणाक्षणाला बदलत आहे. त्यामुळे लोकांच्या मतांमध्ये मोठ्या प्रमाणात मतभेद निर्माण होत आहेत. विवाहात समस्या येऊन तो अल्पायुषी ठरू शकतो. म्हणजेच वयात अंतर जास्त असेल तर जोडप्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. वयात साधारण 2 ते 5 वर्षांचे अंतर चांगले ठरू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT