लाइफस्टाइल

New Year Resolution 2024 : नवीन वर्षात स्वतःसाठी करा हे संकल्प, चैतन्य आणि आनंदाने भरून जाईल आयुष्य

नवीन वर्षामध्ये यशस्वी आणि निरोगी राहण्यासाठी करा हे संकल्प

Aishwarya Musale

नवीन वर्ष सुरू होणार आहे आपण सगळेच त्यासाठी काहीना नवीन वर्षाचे प्लॅन्स ठरवत असतो, येत्या वर्षात मी रोज व्यायाम करेल, रोज पुस्तकं वाचेल, दर आठवड्याला फॅमिली सोबत फिरायला जाईल, बाहेरच कमी खाईल, वजन कमी करेल हे आणि असे अनेक.पण सगळेच पूर्ण होतात असं नाही.

दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही. आपल्या नियंत्रणात असे काही घटक आहेत जे आपले आयुष्य वाढविण्यात आणि आपले आरोग्य सुधारण्यास मदत करू शकतात.

1. हिरव्या भाज्या आणि फळे

अन्नाचा थेट परिणाम आरोग्यावर होतो, अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की हिरव्या भाज्या आणि हंगामी फळे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत, याचा थेट परिणाम वयावर होतो. जर आपण वनस्पती-आधारित आहाराबद्दल बोललो तर त्यात फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, शेंगा आणि काजू यांचा समावेश होतो.

दैनंदिन जीवनात या गोष्टींचा समावेश करणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. या पदार्थांमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि फायबरसारखे पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात, जे जवळजवळ सर्व आरोग्याशी संबंधित आजारांसाठी फायदेशीर असतात. वनस्पती-आधारित आहार घेतल्याने हृदयरोग, कर्करोग, मधुमेह आणि लठ्ठपणा यांसारख्या अनेक आजारांचा धोका कमी होतो.

2. वजनावर लक्ष ठेवा

वयानुसार शरीराचे वजन असणे हे निरोगी राहण्यासाठी खूप उपयुक्त आहे. लठ्ठपणा ही एक अशी समस्या आहे जी शरीरात अनेक नवीन समस्यांना जन्म देते. उदाहरणार्थ, हार्मोनल असंतुलन, हृदयरोग, उच्च रक्तदाब, साखर आणि कर्करोग यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. OBCT केवळ शारीरिक त्रास देत नाही तर मानसिकरित्या देखील प्रभावित करते. वजन संतुलित राखण्यासाठी, निरोगी आहार घेणे आणि नियमित व्यायाम करणे महत्वाचे आहे.

3. नियमित व्यायाम करा

व्यायाम हा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे यात शंका नाही. नवीन वर्षात उत्तम आरोग्यासाठी सर्वात मोठा संकल्प केला पाहिजे तो म्हणजे दररोज नियमित व्यायाम करणे.

दररोज योगासने करणे केवळ शारीरिक आरोग्यासाठीच फायदेशीर नाही तर मानसिक ताणतणावांवरही फायदेशीर आहे. व्यायामामुळे हृदयाचे आरोग्य, रक्तदाब, शुगर, कॅन्सर, लठ्ठपणा, तणाव इत्यादीपासून बचाव होतो.

4. धुम्रपान करू नका

“धूम्रपान आरोग्यासाठी हानिकारक आहे आणि त्यामुळे अनेक रोगांचा धोका वाढतो”, ही टॅग लाइन तुम्ही अनेकदा ऐकली असेल. पण ते पाळणे फार कठीण होऊन बसते. धुम्रपान हे शरीरात अनेक आजार आणणारी गोष्ट आहे. धूम्रपानामुळे हृदयविकार, फुफ्फुसाचा कर्करोग, तोंडाचा कर्करोग, पोटाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग असे घातक आजार होतात.

आतापर्यंत धुम्रपानावर अनेक अभ्यास करण्यात आले आहेत, जवळपास प्रत्येक अभ्यासात असे आढळून आले आहे की ते आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. त्यामुळे तुम्ही दीर्घकाळ धुम्रपान करत असलात तरीही नवीन वर्षात तुम्ही नवीन संकल्प केलात, तरीही तुम्हाला आरोग्यविषयक फायदे मिळू शकतात.

5. लोकांशी कनेक्टेड राहा

सामाजिक संबंध म्हणजे आपल्या सभोवतालच्या लोकांशी चांगले संबंध असणे. उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी हे महत्त्वाचे आहे. एखादी व्यक्ती आपल्या सभोवतालच्या लोकांशी आणि नातेवाईकांशी चांगले संबंध ठेवून तणावमुक्त राहते. एका अभ्यासानुसार, सामाजिकरित्या जोडलेले लोक एकटे राहणाऱ्या लोकांपेक्षा जास्त काळ जगण्याची शक्यता जास्त असते.

6. स्क्रीन वेळ मर्यादित करा

आजच्या टेक्नोलॉजीच्या जगात स्क्रीन टाइम सेट करणे आवश्यक आहे. यापासून दूर राहण्यासाठी स्वतःला इतर क्रियाकलापांमध्ये गुंतवून ठेवा.

7. वाचनाची सवय लावा

वर्षभर ठराविक पुस्तकांचे वाचन करण्याचे ध्येय निर्धारित करा, यामुळे तुमचा दृष्टीकोन विस्तृत होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs RCB Live: विराट कोहलीला काही कळण्यापूर्वीच चेंडूने उडवला त्रिफळा; ९ वर्षानंतर ओढावली नामुष्की, प्रिंस यादवने केली हवा Video

DMK-AIDMKने सत्तास्थापनेचा प्रयत्न केल्यास १०८ आमदार राजीनामे देतील; TVKच्या इशाऱ्याने खळबळ

Education Appointment: डेक्कन कॉलेजच्या कुलपतीपदी डॉ. भूषण पटवर्धन; पाच वर्षांच्या कार्यकाळास मान्यता

पुण्यात लक्झरी कार डिलिव्हरीचा विक्रम! कंपनीच्या कर्मचाऱ्यांना करोडोंची भेट; ११ लक्झरी Volvo XC90 कार्स सुपूर्द

Pune Juvenile Theft: मौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा अल्पवयीन वारजे पोलिसांच्या जाळ्यात; दहा दुचाकी जप्त

SCROLL FOR NEXT