लाइफस्टाइल

Thyroid Awareness Month 2024 : थायरॉइडवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतील ‘हे’ पदार्थ, आजच करा आहारात समावेश

आहारात काही पदार्थांचा समावेश करून तुम्ही थायरॉइडच्या समस्येपासून आराम मिळवू शकता.

Aishwarya Musale

थायरॉईडची पातळी नियंत्रित करण्यासाठी योग्य आहार घेणे खूप महत्वाचे आहे. शरीरात थायरॉईड संप्रेरकाची पातळी कमी किंवा जास्त असल्यास शरीराच्या अनेक कार्यांवर त्याचा परिणाम होतो. थायरॉईडची पातळी कमी किंवा जास्त असल्यामुळे वजन, पचन, ऊर्जा आणि मासिक पाळी यावरही परिणाम होतो.

थायरॉईड टाळण्यासाठी वेळोवेळी थायरॉईड फंक्शन टेस्ट करून घेणे महत्त्वाचे आहे. याशिवाय ज्यांना थायरॉईड आहे त्यांनी आपल्या आहारात काही विशेष बदल करावेत. त्यामुळे थायरॉईडची पातळी योग्य राहते.

कोमट पाण्यात तूप

कोमट पाण्यात तूप मिसळून प्यायल्याने फायदा होतो. थायरॉईडमुळे चयापचय मंद होतो, त्यामुळे पचन कठीण होते. चयापचय वाढवण्यासाठी आणि शरीराला शक्ती देण्यासाठी, सकाळी रिकाम्या पोटी 1 चमचे तूप 1 ग्लास पाण्यात मिसळून प्या.

कोथिंबीरीचे पाणी प्या

कोथिंबीरचे पाणी पिणे देखील थायरॉईडमध्ये फायदेशीर आहे. हे शरीर डिटॉक्सिफाय करते आणि पचन सुधारते. या पाण्याने थायरॉइडचे असंतुलन सुधारता येते. मधुमेह, कोलेस्ट्रॉल आणि वजन कमी करण्यास मदत करते. रात्री कोथिंबीर पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी प्या.

ब्राझील नट्स खा

थायरॉईडमध्ये ब्राझील नट खाणे आवश्यक आहे. ब्राझील नट हे सेलेनियम समृद्ध अन्न आहे. हे थायरॉईड कार्य सुधारते. यामध्ये असलेले सेलेनियम थायरॉईड हार्मोन सक्रिय करण्यास मदत करते. हे थायरॉईडचे ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण करते. थायरॉईडची पातळी नियंत्रित करण्यासाठी या गोष्टींचा आहारात समावेश करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT