लाइफस्टाइल

Health Care News : थायरॉईडच्या रुग्णांनी चुकूनही करू नये 'या' पदार्थांचे सेवन, आरोग्यावर होतील वाईट परिणाम

थायरॉईडच्या रुग्णांनी चुकूनही करू नये 'या' पदार्थांचे सेवन..

Aishwarya Musale

बिघडलेली जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे थायरॉईडची समस्या सामान्य झाली आहे. स्त्री असो वा पुरुष, प्रत्येकजण या आजाराने त्रस्त आहे. थायरॉईडचे दोन प्रकार आहेत. हायपरथायरॉईड आणि हायपोथायरॉईड. दोन्ही परिस्थिती तुमच्यासाठी गंभीर असू शकतात. जर तुम्ही थायरॉईडचे रुग्ण असाल आणि त्यावर नियंत्रण ठेवायचे असेल तर तुम्ही हे पदार्थ खाताना काळजी घ्यावी.

सोया किंवा सोया प्रोडक्ट

थायरॉईड रुग्णांनी सोया किंवा सोया प्रोडक्ट खाणे टाळावे. थायरॉईड असलेल्या रुग्णांनी आहारात सोया पदार्थांचाही समावेश करू नये. सोयाबीनमध्ये फायटोस्ट्रोजेन आढळते, जे थायरॉईड संप्रेरकांसाठी धोकादायक मानले जाते. तेव्हा थायरॉईडच्या रुग्णांनी कमी प्रमाणात सोयाबीनचे सेवन करावे, तसेच यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

क्रूसिफेरस भाजी

थायरॉईडच्या रुग्णांनी केल, ब्रोकोली, फ्लॉवर, कोबी आणि पालक यांचे सेवन करू नये. त्यात गोइट्रोजेन्स देखील आढळतात जे थायरॉईड ग्रंथीच्या कार्यात अडथळा आणतात.

साखर

थायरॉईडच्या रुग्णांनी साखरेचे जास्त सेवन टाळावे. यामुळे शरीरात जळजळ होते आणि थायरॉईड हार्मोन्स नीट बाहेर पडत नाहीत. त्याच वेळी, चयापचय देखील मंदावते, ही थायरॉईड रुग्णांसाठी चिंतेची बाब आहे.

दूध

दूध कॅल्शियम युक्त असले तरी दुधाचे सेवन टाळावे. त्यामुळे थायरॉईड औषधाचा प्रभाव कमी होऊ शकतो. दूध प्यायले तरी औषध आणि दूध पिण्यात चार तासांचे अंतर असावे. थायरॉईडच्या रुग्णांनी चुकूनही कॉफीचे सेवन करू नये. कॉफीमुळे ताणतणाव कमी होऊन फ्रेश वाटत असले तरी थायरॉईडच्या रुग्णांनी कॉफीचे सेवन कमी करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचा जोर कायम, 'या' जिल्ह्यांवर अतिवृष्टीचे मोठे संकट; हवामान विभागाने जारी केला अलर्ट

Paithan Accident: पेट्रोल भरण्यासाठी कार वळवली, पण क्षणात काळाचा घाला; पाचोडजवळ कंटेनरच्या धडकेत दोघे ठार, एक जण गंभीर

करकायदा : रिट्स, इन्व्हिट्सवरील लाभांश करमुक्त

स्मार्ट माहिती : आयटी व्यवस्थापन आणि गुंतवणूकदार यांच्यात दरी

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या पत्राने कोंडी फुटली; झारखंडमध्ये सरकार-विद्यार्थी आंदोलकांमध्ये आज निर्णायक चर्चा

SCROLL FOR NEXT