tiktok
tiktok esakal
लाइफस्टाइल

मानवी हाडं व कवटी ऑनलाईन विकणारा एक Tik Toker!

सकाळ डिजिटल टीम

आजपर्यंत आपण टिकटॉकवर लोकांच्या विविध कला म्हणजेच नृत्य, अभिनय, करामत, कर्तब अशा बऱ्याच गोष्टी पाहिल्या असतील, परंतु आपणास त्याच टिकटॉकवर जर कोणी मानवी हाडं आणि कवटी विकत असेल तर आपल्याला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. जॉन-पिचाया फेरी, हा तरूण जो (TikTok) वर (JonsBones) म्हणून ओळखला जातो, तो चक्क ऑनलाईन मानवी शरीरातील हाडं विकतो. हो हे खरं आहे. एकदा वाचाच...

फेरी न्युयोर्क शहरात राहतो, जिथे तो आपला ऑनलाइन व्यवसाय चालवतो. असे म्हणतात की, त्याचे ग्राहक "प्रयोगशाला, विद्यापीठांपासून ते कलाकारांपर्यंत आहेत. एवढचं नाही, तर कुत्र्यांना प्रशिक्षण देणाऱ्या शोध आणि बचाव पथकांसाठी देखील तो ही मानवी हाडे विकतो.

२१ वर्षीय तरुणाने एबीसी वृत्तवाहिनीला एका मुलाखतीत सांगितले की, ही हाडे वैद्यकीय शिक्षणासाठी वापरली जातात." तसेच जॉन म्हणतो की, याचा सप्लाय संशोधन संस्था, संग्रहालये आणि विद्यापीठांना केला जातो, परंतु वैद्यकीय क्षेत्रातून त्याच्या या व्यवसायाला आक्षेप देखील करण्यात येतो.

त्याच्या व्यवसायाची मुख्य दोन उद्दिष्टे म्हणजे अस्थिशास्त्र सुलभ करणे आणि अंधश्रध्दा म्हणून न पाहता उद्योगाला चालना मिळणे" त्यानंतर त्याचे टिकटॉकवरील अकाऊंट व्हायरल झाले आहे आणि त्याला 500,000 पेक्षा जास्त फॉलोअर्स आणि 22 मिलीयन्स लाइक्स मिळाले आहेत.

फेरी हा बाजारात एकमेव हाड विक्रेता नसताना, त्याच्या टिकटॉक व्हिडिओंमुळे त्याच्या अस्थिशास्त्राबद्दल - हाडांच्या शरीरशास्त्राचा अभ्यास - तसेच त्याच्या कंपनीची नैतिकता तसेच त्याच्या अस्थी उद्योगाबद्दल चर्चा सुरू झाली आहे. न्यूयॉर्क चिरोप्रॅक्टिक कॉलेजमधील सहाय्यक प्राध्यापक रॉबिन वेकफिल्ड मर्फी, जे मानवी अवशेषांचा अभ्यास करतात, ज्यांना टिकटॉकवर बोन्सँडबोटनी 85 म्हणून ओळखले जाते, त्यांनी फेरीच्या व्यवसायावर टीका केली आहे.

"मानवी अवशेष कधीही विकले जाऊ नयेत. संस्था आणि संशोधकांना संशोधनासाठी मानवी मृतदेह मिळवण्याचे वैध, नैतिक मार्ग आहेत आणि ते शवदान देण्याच्या कार्यक्रमांद्वारे आहेत," असे ते म्हणाले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'जिरेटोप देणाऱ्याला डोकं नाही अन् घालून घेणाऱ्यालाही डोकं नाही'; उद्धव ठाकरेंचा भर पावसात हल्लाबोल

Swati Maliwal: स्वाती मालिवाल प्रकरण तापणार; दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल

RCB vs DC Stale Food : कर्नाटक क्रिकेट असोसिएशनच्या अडचणीत वाढ; आरसीबी - दिल्ली सामन्यात शिळं जेवण दिल्याप्रकरणी FIR दाखल

Nor’westers: 'कालबैसाखी'च्या अभ्यासासाठी भारताचा पहिला प्रोजेक्ट लवकरच कार्यरत; जीवितहानी टळणार?

Petrol, Diesel Rates : पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त? सरकारचा 'टॅक्स'संदर्भात मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT