Holi  google
लाइफस्टाइल

Holi Festival : होळी खेळल्यानंतर अशी आंघोळ कधी केलीय का ? नसेल केली तर यावर्षी करा

कडुनिंबाची १०-२० पाने घ्या. एक वाडगाभर पाणी घ्या. त्या पाण्यात पाने स्वच्छ करून घ्या. स्वच्छ कराव्या लागतील.

नमिता धुरी

मुंबई : होळी खेळताना आपण कसलाही विचार करत नाही. हवे तसे रंग एकमेकांना लावतो. यामुळे त्वचेचा संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे होळी खेळल्यानंतर आंघोळ करताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

काय कराल ?

आंघोळीच्या पाण्यात हळद घाला

हळदीमध्ये अॅण्टिऑक्सिडंट्स असतात जे त्वचेच्या आरोग्यासाठी चांगले असतात. त्यामुळे एक बादली भरून पाणी घ्या. त्यात १ चमचा हळद घाला. या पाण्याने आंघोळ केल्यास त्वचेवरील जंतू नाहीसे होतील. हेही वाचा - बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

कडुनिंबाची पाने मिसळा

आपण आपल्या आंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची पाने ठेवू शकता कारण कडुनिंबामध्ये नैसर्गिक अँटी-बॅक्टेरियल, अँटी-मायक्रोबियल आणि अँटी-फंगल असे गुणधर्म असतात. जर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची पाने वापरत असाल तर ते खूप फायदेशीर ठरू शकते आणि आपण संसर्ग टाळू शकता.

कडुनिंबाची १०-२० पाने घ्या. एक वाडगाभर पाणी घ्या. त्या पाण्यात पाने स्वच्छ करून घ्या. स्वच्छ कराव्या लागतील. ही पाने पाण्यात उकळवून घ्या.

यानंतर, गॅस बंद करा आणि नंतर ते थंड करत ठेवा. नंतर ते आंघोळीच्या पाण्यात मिसळा आणि आंघोळ करा.

अॅपल सायडर व्हिनेगर घाला

Apple सायडर व्हिनेगर घातलेल्या पाण्याने आंघोळ करणे त्वचेसाठी देखील फायदेशीर ठरू शकते कारण हे पाणी केवळ आंघोळीनंतर रंग काढून टाकणार नाही तर त्वचेच्या संसर्गापासून आपले संरक्षण करेल.

१ बादली पाणी आणि ५ चमचे अॅपल सायडर व्हिनेगर घ्या. पाण्यात व्हिनेगर घाला आणि त्याने आंघोळ करा. हे पाणी वापरण्यापूर्वी आपण डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.

नीट आंघोळ न केल्यास काय होईल ?

होळी खेळताना अनेक प्रकारचे रंग आपण एकमेकांना लावतो. बऱ्याचशा रंगांमध्ये घातक रसायने मिसळलेली असतात. ही रसायने त्वचेसाठी घातक ठरू शकतात.

यामुळे त्वचेला पुरळ येणे, जळजळ होणे अशा समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे होळी खेळण्याआधी आंघोळ केली नाही तरी चालेल पण खेळल्यानंतर मात्र पुरेशा पाण्यात आणि पुरेसा वेळ घेऊन आंघोळ करणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bernard Julien Passes Away : वर्ल्ड कप विजेत्या अष्टपैलू खेळाडूचे निधन; फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाच्या डोक्याचा वाढवलेला ताप

Nagarparishad Reservation 2025 : स्थानिक स्वराज्य संस्थेचं आरक्षण जाहीर! राज्यातील ६७ नगरपरिषदा ओबीसीसाठी, तर २३ एसी-एसटीसाठी राखीव, ओबीसी महिलांना किती?

Samsung Galaxy च्या तीन नव्या सिरीज लाँच; 7 हजारपेक्षा कमी किंमतीत 5G स्मार्टफोन, दमदार फीचर्स अन् जबरदस्त ऑफर्स..

CJI B. R.Gavai : सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश बी.आर गवई यांच्यावर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न, आरोपी म्हणाला, सनातन धर्म जर...

Video: 'तुझं हे जे सुरुये ते बंद कर' निक्कीने आरबाजला झापलं! म्हणाली...'बाहेर काय सुरुये हे तुला...'

SCROLL FOR NEXT