Mosquitoes  sakal
लाइफस्टाइल

Mosquitoes Home Remedies: पावसाळ्यात डासांपासून मिळवा सुटका; ‘हे’ घरगुती उपाय ठरतील गुणकारी

पावसाळा सुरू झाला आहे. अनेकांना हा ऋतू खूप आवडतो.

Aishwarya Musale

पावसाळा सुरू झाला आहे. अनेकांना हा ऋतू खूप आवडतो. पावसाळा आला की सगळीकडे हिरवळ असते. हा पाऊसही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आला आहे. चांगला पाऊस झाला की भातासारखी अनेक पिके घेतली जातात. मात्र, पावसाळ्यात नागरिकांना काही समस्यांना सामोरे जावे लागते.

या मोसमात डासांचा प्रादुर्भाव वाढतो. घराभोवती, नाल्यांमध्ये दिवसभर डासांचा वावर असतो. अनेक वेळा परिस्थिती अशी होते की लोकांचे झोपणेही कठीण होऊन जाते. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की डासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावेत.

1. शेणाच्या पोळीचा वापर : डास चावल्यामुळे मलेरियासारखे अनेक आजार होण्याचा धोका असतो. यापासून सुटका मिळवण्यासाठी शेणाची पोळी जाळून टाकावी. यानंतर त्यामध्ये कडुलिंबाची पाने आणि कापूर टाकून जाळून टाका. त्याचा धूर निघू लागल्यावर घराच्या चारही कोपऱ्यांमध्ये ठेवा. काही वेळाने त्याचा धूर घरात पसरतो, सर्व दरवाजे, खिडक्या व्यवस्थित बंद करा. यानंतर तुम्हाला घरात डास दिसणार नाहीत.

2. निलगिरी आणि लिंबू तेल लावा: आजही खेड्यापाड्यातील लोक झोपण्यापूर्वी अनेक प्रकारचे तेल लावतात. त्यामुळे डास कमी चावतात. असे एक तेल म्हणजे निलगिरी आणि लिंबू तेल. हे दोन्ही एकत्र करून अंगावर लावल्यास डास चावत नाहीत.

3. लसणाचा रस लावा: लसणाच्या वासाने डास पळून जातात. म्हणूनच झोपण्यापूर्वी लसूण बारीक करून त्याचा रस काढून शरीरावर लावा. यापासून डास पळून जातील. त्यांच्यापासून मुक्ती मिळेल.

4. पुदिना वापरा: पुदिन्याच्या वासाने डास दूर पळतात. पुदिन्याच्या पानांचा अर्क खोलीत शिंपडा किंवा झोपण्यापूर्वी हा अर्क अंगावर लावा. यापासून डास पळून जातील. रात्री तुम्ही आरामात झोपाल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT