Lip care tips Sakal
लाइफस्टाइल

Lip Care: थंडीमध्ये काळ्या ओठांचं टेन्शन विसरा; जाणून घ्या सोपा मार्ग

Lip Care Tips: हिवाळ्यात ओठांवर काळे डाग दिसतात. अशा परिस्थितीत त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी नैसर्गिक सिरम लावणं खूप महत्वाचे आहे.

सकाळ डिजिटल टीम

Lip Care Tips: हिवाळ्यात स्किन टॅनिंगची समस्या होत नाही, पण त्वचा कोरडी होते आणि त्वचेला जोरात चोळले तर त्वचेवर ओरखडे उठतात, ज्याचे नंतर काळे डाग बनतात. विशेषतः हिवाळ्यात ओठांवर काळे डाग दिसतात. अशा परिस्थितीत, त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी नैसर्गिक सिरम लावणं खूप महत्वाचे आहे. आज आपण हिवाळ्यात सुंदर ओठांसाठी बीटरूट सीरम कसा बनवायचं ते सांगणार आहोत. (Beetroot serum for beautiful Lips in Winter)

बीटाचे सीरम बनवण्यासाठी लागणारं साहित्य (Ingredients for making Beetroot Serum):

एक चतुर्थांश बीट

थोडे कोरफड गर (Alovera Gel)

1 व्हिटॅमिन ई कॅप्सूल

सीरम कसं बनवायचे? (How to make Beetroot serum?):

बीट किसून त्याचा रस काढा. यानंतर त्यात कोरफड जेल आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल घालून चांगले मिसळा. त्यानंतर हवाबंद डब्यात ठेवा. रात्री झोपण्यापूर्वी कापूस किंवा बोटांच्या मदतीने संपूर्ण चेहऱ्यावर लावा. दुसऱ्या दिवशी सकाळी पाण्याने चेहरा धुवा. हा उपाय काही दिवस करा. तुम्हाला फरक दिसेल. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही त्यात टी ट्री ऑइलचे ५-६ थेंब टाकू शकता. यामुळे पिंपल्सचा त्रास होत नाही आणि त्वचाही चमकदार राहते.

बीटाच्या सीरमचे फायदे (Benefits of Beetroot Serum):

बीटरूटच्या फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, 100 ग्रॅम बीटरूटमध्ये 43 मिलीग्राम कॅलरीज, 0.2 ग्रॅम फॅट, साखर 6.8 ग्रॅम, प्रोटीन 1.6 ग्रॅम, कॅल्शियम 16 ​​मिलीग्राम, लोह 0.80 मिलीग्राम आणि इतर अनेक घटक असतात. बीटरूटमध्ये आढळणारे अँटी-ऑक्सिडेंट शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतात. याशिवाय बीटरूट त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Auction live : भारतीय मिचेल स्टार्क! ३० लाखांवरून पोहोचला थेट ८.४० कोटी; कोण आहे Auqib Nabi? पाहा गोलंदाजीचा Video

Stock Market Today : शेअर बाजार लाल रंगात बंद; रुपयाच्या कमजोरीने बाजारात दबाव; वेदांताचे शेअर्स मात्र तेजीत!

Sugar-Free Gajar Gulab Jamun: हिवाळ्यात हेल्दी डिझर्टचा परफेक्ट पर्याय; झटपट बनवा गाजराचे शुगर-फ्री गुलाबजाम

IPL 2026 Auction: काव्या मारनला हवा होता फिरकीपटू, पण राजस्थान रॉयल्सने ७.२० कोटी मोजून मारली बाजी; ठरला महागडा भारतीय

मंत्री कोकाटेंना दणका! २ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, जिल्हा न्यायालयानेही निर्णय ठेवला कायम

SCROLL FOR NEXT