लाइफस्टाइल

Winter Tips : हिवाळ्यात मुलांना बाहेर खेळायला जाण्यापासून रोखू नका; 'या' गोष्टी फॉलो करा अन् बिंधास्त राहा

हिवाळ्यात मुलांची अशी घ्या काळजी आणि विविध आजारांपासून ठेवा दूर

Aishwarya Musale

हिवाळा सुरू झाला आहे. ऋतू बदलला की त्याचे परिणाम मोठ्या माणसांच्या आरोग्यावर होतात तसेच किंवा कधीकधी त्यापेक्षा लवकरच लहान मुलांच्या आरोग्यावर होतात. त्यामुळे त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. 

थंडीची चाहूल लागताच लहान मुले आजारी पडण्याचाही ट्रेंड सुरू झाला आहे. या हिवाळ्यात तुमचे मूल खेळण्यासाठी बाहेर पडल्यावर आजारी पडू नये, अशी तुमची इच्छा असेल, तर तुम्हाला काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागेल.

व्यवस्थित कपडे घाला

लहान मुले जरी बाहेर खेळायला जात असतील तर त्यांच्या कपड्यांची विशेष काळजी घ्यावी. जर त्यांनी नीट कपडे घातले नाहीत तर ते आजारी पडू शकतात. त्यांना लोकरीचे कपडे घालण्याचा प्रयत्न करा. मुलांना कानटोपी घालण्याची सवय लावा.

शूज घाला

थंड पायांमुळे मुले लवकर आजारी पडतात. अशा परिस्थितीत मुलांना चप्पल नव्हे तर शूज घालायला लावावेत. जर तुम्ही तुमच्या मुलाला मोजे घालून शूज घालायला लावले तर तो आजारी पडणार नाही. मुलांना एक ऐवजी दोन मोजे घालण्याचा प्रयत्न करा. त्यांना पाण्यापासून दूर राहण्यास सांगा.

खेळण्याची वेळ शेड्यूल करा

मुलांसाठी खेळणे खूप महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत तुम्ही त्यांना घरात ठेवू शकत नाही. मात्र, थंडीच्या दिवसात त्यांना संध्याकाळी ऐवजी दुपारी खेळायला पाठवा. संध्याकाळी तापमान वाढते आणि त्यामुळे तुमची मुले आजारी पडू शकतात. दिवसा सूर्यप्रकाशामुळे त्यांना थंडी जाणवत नाही.

या गोष्टींची घ्या काळजी -

मुलांना थंड पेय देऊ नका आणि त्यांना बाहेरील अन्नापासून दूर ठेवा.

जर मुलाला ताप असेल तर तापमान वाढू देऊ नये. 100 च्या वर ताप आल्यावर किंवा जास्त खोकला येताच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

मुलांच्या खाण्यापिण्याच्या सवयींवर जास्तीत जास्त लक्ष द्या आणि त्यांना घरचेच पोषक आहार देण्याचा प्रयत्न करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Census: जनगणनेसाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याला पुण्यात शिवीगाळ, मुलाला मारहाण; ⁠कर्मचारी संघटनेचा इशारा

NEET Paper Leak: नीट पेपर फुटीच्या प्रकरणात पंतप्रधानांनी घातलं लक्ष; 'पीएमओ'तील अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, आता हवाई दलाची घेणार मदत...

Ratnagiri Weather : रत्नागिरीत पुढील 3 दिवस कसं असेल हवामान? समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर, दिवसभर ढगाळ वातावरण

Property Tax : मिळकतकर वसुलीने गाठला १००० कोटीचा टप्पा

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT